मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

आजोबागड (Ajoba) किल्ल्याची ऊंची :  4511
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: बालाघाट रांग
जिल्हा : ठाणे श्रेणी : मध्यम
बालाघाटाच्या रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध अगदी कडेला असलेला " अजापर्वत " उर्फ " आजोबाचा डोंगर " एखाद्या पुराण पुरुषाप्रमाणे भासतो. घनदाट झाडाझुडुपांनी नटलेला हा आजोबाचा गड गिर्यारोहकांसाठी एक आगळे वेगळे लक्ष्यच ठरला आहे. या गडाची ३००० फूटांची उभी भिंत ही प्रस्तरारोहकांसाठी एक मोठे आव्हानच आहे.
4 Photos available for this fort
Ajoba
इतिहास :
गडाचे नाव आजोबा कसे पडले यावर एक पुराणकथा प्रसिद्ध आहे याच गडावर बसून वाल्मिकी ऋषींनी " रामायण " हा धर्मग्रंथ लिहिला. याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला. लव आणि कुश वाल्मिकी ऋषींना " आजोबा " म्हणत असत, म्हणूनच या गडाचे नाव आजोबाचा गड पडले. अशी कथा सांगितली जाते. येथे गडावर वाल्मिकी ऋषींचा आश्रम व त्यांची समाधीसुद्धा आहे.
पहाण्याची ठिकाणे :
देहेणेहून ( खाली दिलेली पहिली वाट पकडून) वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापाशी साधारणत: अर्ध्या तासात पोहचावे. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळून गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी वाट नसल्याने आपल्याला मुक्काम आश्रमातच करावा लागतो. येथे गडावर रहाण्यासाठी एक कुटी आहे. जवळच पाण्याचा झरा आहे. जर मुक्कामाचा कार्यक्रम असेल तर जेवणाची सोय आपल्याला घरूनच करून आणावी लागते. आश्रमाजवळून पुढे धबधब्याच्या वाटेने चढत गेल्यास सुमारे एक ते दीड तासानंतर वर एक गुहा लागते. येथे लवकुशाच्या पादुका खडकात कोरलेल्या आहेत. येथे डावीकडे एक पाण्याचे टाके सुद्धा आहे. या गुहेपर्यंत जाण्यासाठी लोखंडी शिड्या देखील लावल्या आहेत. याच मार्गाने आश्रमात परतावे. अशा प्रकारे मुंबईहून येणार्‍यांसाठी आजोबाचा गड एक निसर्गरम्य अशी दुर्गयात्राच ठरते.
अनेक दुर्गवीर रतनगड आजोबाचा गड ते हरिश्चंद्रगड असा ४ ते ५ दिवसांचा ट्रेक करतात.
पोहोचण्याच्या वाटा :
१) कल्याण - आसनगाव ( लोकल ट्रेनने ३५ मिनीटे ) -(रिक्षा/बसने ३ कि.मी) शहापूर -(बसने ३० कि.मी.) डोळ्खांब - (जीपने १२ कि.मी.) -देहेणे.
देहेणेहून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापर्यंत जाण्यासाठी १ ते १.५ तास लागतॊ. तिथून सीतेच्या पाळ्ण्या पर्यंत जाण्यासाठी १ ते १.५ तास लागतॊ.

२) कल्याण - मुरबाड - माळशेज - डोळखांब या मार्गाने:-
कल्याण - मुरबाड - माळशेज - डोळखांब या मार्गाने सुद्धा देहेणे गावी पोहोचता येते.

३) कसारा - घोटी - राजूर - कुमशेत मार्गे:-
गडाचा माथा पहाण्यासाठी कसारा - घोटी - राजूर - कुमशेत मार्गे जाता येते.
राहाण्याची सोय :
गडावरती रहाण्यासाठी आश्रम आहे. यात २० जणांना रहाता येते.
जेवणाची सोय :
येथे जेवणाची सोय नसल्याने जेवणाचे साहित्य आपण स्वत:च घेऊन यावे.
पाण्याची सोय :
येथे बारामाही पाण्याचा झरा सतत वाहत असतो.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
देहेणेहून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापर्यंत जाण्यासाठी १ ते १.५ तास लागतो.
सूचना :
गडावर सापांचे फार वास्तव्य असल्याने योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: A
 आड (Aad)  अचला (Achala)  अहिवंत (Ahivant)  अजिंक्यतारा (Ajinkyatara)
 अजमेरा (Ajmera)  आजोबागड (Ajoba)  अकलूजचा किल्ला (Akluj Fort)  अलंग (Alang)
 अंमळनेर (Amalner)  आंबोळगड (Ambolgad)  अंजनेरी (Anjaneri)  अंकाई(अणकाई) (Ankai)
 अंतुर (Antoor)  अर्जूनगड (Arjungad)  अर्नाळा (Arnala)  आसावा (Asawa)
 अशेरीगड (Asherigad)  औंढा (अवंध) (Aundha)  औसा (Ausa)  अवचितगड (Avchitgad)