मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

बहादुरगड (Bahadurgad) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : नगर श्रेणी : सोपी
भीमा नदीच्या तीरावर एक सुंदर किल्ला वसलेला आहे. आजही तो आपल्या गतकाळातील पाऊलखुणा जपण्याचा प्रयन्त करत आहे. याचे नाव आहे " पेडगावचा किल्ला" म्हणजेच " बहादुरगड ".
10 Photos available for this fort
Bahadurgad
पहाण्याची ठिकाणे :
पेडगावचा किल्ला हा भुईकोट किल्ला आहे. गावात शिरल्यावर किल्ल्याचे अवशेष विखुरलेले दिसतात. या किल्ल्याला एकूण दोन दरवाजे आहेत. यातील पहिला दरवाजा हा गावातच चांगल्या अवस्थेत उभा आहे. दुसरा दरवाजा हा किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला आहे. आपण गावातील दरवाज्यानेच आत शिरायचे. या दरवाज्याची कमान खूप भव्य आहे. आत शिरल्यावर ५ फुटाच्या मारुतीच्या मूर्तीचे दर्शन होते. समोरच भैरवनाथाचे मंदिर आहे. या गडाचे वैशिष्ट्ये म्हणजे इथे यादव काळात बांधलेल्या ५ मंदिरांचा समूह आहे. ही सर्व मंदिरे काळ्या पाषाणात कोरलेली आहेत. आज ही सर्व मंदिरे दुर्लक्षित अवस्थेत आहेत. भैरवनाथाचे मंदिर याच समूहापैकी एक आहे. सध्या या मंदिराला रंग दिल्याने त्याच्या मूळ सौंदर्याला धक्का लागला आहे. मंदिराच्या समोर अनेक शिल्प पडलेली दिसतात. यामध्ये काही वीरगळी आहेत, काही सतीच्या शिळा आहेत आणि शनिदेवाची मूर्ती सुध्दा आहे. मंदिराच्या समोर दिपमाळ आहे. आजुबाजुला काही तोफगोळे सुध्दा पडलेले दिसतात. हे मंदिर पाहून समोर तटबंदीकडे जाणारा रस्ता धरायचा वाटेत अनेक घरांचे, वाड्यांचे अवशेष पडलेले दिसतात.यातील काही अवशेष झाडी झुडपांमध्ये लपलेले आहेत. समोर किल्ल्यातील दोन मंदिरे दिसतात यामधील एक मंदिर आजही चांगल्या अवस्थेत उभे आहे. आत शिवलिंग आहे. याच्या समोरच तिसरे मंदिर पडलेल्या अवस्थेत आहे. मागच्या बाजूला किल्ल्याची तटबंदी आहे. समोर भीमा नदी संथपणे वाहतांना दिसते. किल्ल्याची या बाजूची तटबंदी पूर्णपणे ढासळली आहे. या मंदिराच्या एका बाजूला एका वाड्याचे अवशेष दिसतात. थोडे अंतर चालून गेल्यावर वाड्याच्या आत जाण्याचे प्रवेशव्दार लागते. इथेच औरंगजेबाचा रहाण्याचा वाडा होता. हा वाडा दोन मजली आहे. याला चुन्याचा गिलावा करण्यात आला आहे. याच ठिकाणी औरंगजेब आणि संभाजी राजांची भेट झाल्याची शक्यता वर्तविली जाते. याच्या आजुबाजुला काही छोट्या वाड्यांचे अवशेष दिसतात. हे पाहून पुन्हा वाड्याच्या प्रवेशव्दारापाशी पोहचायचं, यामधून आत शिरल्यावर समोर अनेक वाड्यांचे चौथरे दिसतात काही चौथर्‍यांवर अनेक शिल्प पडलेली आहेत. याच्या मागच्या बाजूस देवीचे मंदिर आहे. मंदिर खूप प्रशस्त आहे. संपूर्ण किल्ला फिरण्यास ३ तास पुरतात. आता बहादूरगड पाहून आपल्या समोर दोन पर्याय आहेत एक आल्यामार्गाने घरी परतायचे किंवा अष्टविनायका पैकी एक "सिध्दटेकचा गणपती" आणि राशीनचे मंदिर व हलते मनोरे पाहून माघारी यायचं.
पोहोचण्याच्या वाटा :
अहमदनगरच्या श्रीगोंद्या पासून २० कोसांवर हा बहादूरगड आहे. भीमेच्या तीरावर असणार्‍या पेडगाव या ठिकाणी बहादूरखानाने हा किल्ला बांधला आणि त्याला बहादूरगड हे नाव दिले.
राहाण्याची सोय :
किल्ल्यातील देवीच्या मंदिरात पावसाळा सोडून इतर ऋतुमध्ये १५ ते २० लोकांना राहता येते.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय स्वत:च करणे उत्तम .
पाण्याची सोय :
देवीच्या मंदिरा समोरच पाण्याचा नळ आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पुणे - दौंड मार्गे ४ तास. पुणे - भिगवण - राशीन मार्गे ५ तास लागतात.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: B
 बहादरपूर (Bahadarpur Fort)  बहादुरगड (Bahadurgad)  बाळापूर किल्ला (Balapur Fort)  बल्लाळगड (Ballalgad)
 बळवंतगड (Balwantgad)  बांदा किल्ला (Banda Fort)  बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort)  बाणकोट (Bankot)
 बारवाई (Barvai)  बेलापूरचा किल्ला (Belapur Fort)  बेळगावचा किल्ला (Belgaum Fort)  भगवंतगड (Bhagwantgad)
 भैरवगड (सातारा) (Bhairavgad (Satara))  भैरवगड(कोथळे) (Bhairavgad(kothale))  भैरवगड (मोरोशी) (Bhairavgad(Moroshi))  भैरवगड(शिरपुंजे) (Bhairavgad(Shirpunje))
 भामेर (Bhamer)  भंडारदुर्ग/भांडारदुर्ग (Bhandardurg)  भांगसी गड (भांगसाई गड) (Bhangsigad(Bhangsi mata gad))  भरतगड (Bharatgad)
 भास्करगड (बसगड) (Bhaskargad)  भवानगड (Bhavangad)  भवानीगड (Bhavanigad)  भीमाशंकर (Bhimashankar)
 भिवगड / भिमगड (Bhivgad(Bhimgad))  भोरगिरी (Bhorgiri)  भुदरगड (Bhudargad)  भूपाळगड (बाणूर गड) (Bhupalgad (Banurgad))
 भूपतगड (Bhupatgad)  भूषणगड (Bhushangad)  बिरवाडी (Birwadi)  बिष्टा (Bishta)
 बितनगड (Bitangad)