मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

भूपतगड (Bhupatgad) किल्ल्याची ऊंची :  1600
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: जव्हार
जिल्हा : ठाणे श्रेणी : मध्यम
जव्हार हे ठाणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. याच जव्हारच्या जवळ, एका दिवसात जाऊन पाहून येण्यासारखा किल्ला आहे. त्याचे नाव भूपतगड. या आदिवासी परिसरात उन्हाळ्यामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणावर जाणवते. प्राचिनकाळी डहाणू , (नाला) सोपारा बंदरांमध्ये उतरलेला माल जव्हार मार्गे गोंडा गाट, थळ घाटाने त्र्यंबकेश्वर डोंगररांग ओलांडून नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी समुद्र किनार्‍यावर डहाणूचा किल्ला, घाटाखाली भूपतगड व त्र्यंबकेश्वर डोंगररांगेत बसगड (भास्करगड), हरिहर, त्र्यंबक, त्रिंगलवाडी हे गड बांधण्यात आले.


Bhupatgad
10 Photos available for this fort
Bhupatgad
Bhupatgad
Bhupatgad
पहाण्याची ठिकाणे :
भूपतगडावर आपला प्रवेश नष्ट झालेल्या दरवाज्याच्या अवशेषामधून होतो. गडाला उत्तरेकडे व दक्षिणेकडे असे एकूण दोन दरवाजे होते. आज हे दोन्ही दरवाजे नष्ट झालेले आढळतात. प्रवेशव्दारापाशी असणारे बुरुज कसेबसे तग धरुन उभे आहेत. प्रवेशव्दारापाशी एक म्हसोबाची मूर्ती आहे. आत शिरल्यावर समोर हनुमानाची मूर्ती दिसते. गडमाथा बराच विस्तीर्ण आहे. माथ्यावर एका मोठ्या पडक्या वाड्याचे अवशेष आहेत. या वाड्याच्या भिंती अजूनही काही ठिकाणी शिल्लक आहेत. वाड्याच्या मागच्या बाजूला पाण्याचा मोठा हौद आहे. गडाच्या ४ पाण्याची खोदीव टाकी दिसतात. या टाक्यांजवळच एक कोरडा तलाव आहे. संपूर्ण गडमाथा फिरण्यास अर्धा तास लागतो. गडावरुन त्रिंगलवाडी, हरिहर, त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा असा सर्व परिसर दिसतो.
पोहोचण्याच्या वाटा :
१) मुंबईहुन - भिवंडी - वाडामार्गे अथवा कसारा - खोडाळामार्गे जव्हार (दोन्ही मार्गांनी अंतर अंदाजे १३० कि.मी.) गाठावे. जव्हारपासून १७ कि.मी अंतरावर झाप नावाचे गाव आहे. येथे २ फाटे फुटतात. या ठिकाणी उजव्या बाजूचा रस्ता झाप गावात जातो आणि सरळ जाणारा रस्ता १ किमी अंतरावर चिंचवाडी गावात जातो. या फाट्यापासून १० मिनिटांवर चिंचवाडी आहे. चिंचवाडीतून कच्च्या रस्त्याने एक टेकाड पार केल्यावर आपण भूपतगडाच्या पायथ्याशी पोहोचतो.गडाचा चिंचवाडीतून गडाचा पायथा गाठण्यास अर्धा तास पुरतो. गडाच्या पायथ्यापासून गड डावीकडे ठेवत वाट तिरपी तिरपी वर जाते. पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास सुमारे अर्धा तास लागतो.

२) मुंबईहुन पश्चिम द्रुतगती मार्गाने बोरीवली -मनोर -विक्रमगड - जव्हार (अंतर अंदाजे १४८ कि.मी.) गाठावे. जव्हारपासून १७ कि.मी अंतरावर झाप नावाचे गाव आहे. येथे २ फाटे फुटतात ऊजवी कडचा रस्ता झाप गावात जातो आणि सरळ जाणारा रस्ता १ किमी अंतरावर चिंचवाडी गावात जातो. या फाट्यापासून १० मिनिटांवर चिंचवाडी आहे. चिंचवाडीतून कच्च्या रस्त्याने एक टेकाड पार केल्यावर आपण भूपतगडाच्या पायथ्याशी पोहोचतो.गडाचा चिंचवाडीतून गडाचा पायथा गाठण्यास अर्धा तास पुरतो. गडाच्या पायथ्यापासून गड डावीकडे ठेवत वाट तिरपी वर जाते. पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास सुमारे अर्धा तास लागतो.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जव्हार मध्ये जेवणाची सोय होऊ शकते
पाण्याची सोय :
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
सूचना :
भूपतगड हा छोटासा किल्ला पाहुन झाल्यावर, स्वतःचे वाहान असल्यास १) जव्हार मधील राजवाडा , २) हनुमान पॊइंट , ३) दाभोसा धबधबा , ४)शिर्पाचा माळ (सुरतेवर स्वारीला जातांना शिवाजी महाराजांच्या सैन्याने या माळावर मुक्काम केला होता. या ठिकाणी कमान उभारुन स्मारक बनविण्यात आले आहे.) इत्यादी ठिकाण पाहाता येतील.
श्रेणी: Easy
 अकलूजचा किल्ला (Akluj Fort)  अंमळनेर (Amalner)  आंबोळगड (Ambolgad)  अर्नाळा (Arnala)
 औसा (Ausa)  बहादरपूर (Bahadarpur Fort)  बहादुरगड (Bahadurgad)  बाळापूर किल्ला (Balapur Fort)
 बल्लाळगड (Ballalgad)  बांदा किल्ला (Banda Fort)  बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort)  बेलापूरचा किल्ला (Belapur Fort)
 बेळगावचा किल्ला (Belgaum Fort)  भगवंतगड (Bhagwantgad)  भांगसी गड (भांगसाई गड) (Bhangsigad(Bhangsi mata gad))  भरतगड (Bharatgad)
 भवानगड (Bhavangad)  भूपाळगड (बाणूर गड) (Bhupalgad (Banurgad))  चाकणचा किल्ला (Chakan Fort)  कुलाबा किल्ला (Colaba)
 दांडा किल्ला (Danda Fort)  दासगावचा किल्ला (Dasgaon Fort)  दौलतमंगळ (Daulatmangal)  देवगडचा किल्ला (Devgad Fort)
 धारावी किल्ला (Dharavi Fort)  धर्मापूरी (Dharmapuri)  धारूर (Dharur)  धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi))
 दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)  डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort))  फत्तेगड / फतेदुर्ग (Fattegad)  गाविलगड (Gavilgad)
 गोवा किल्ला (Goa Fort)  इंदुरीचा किल्ला (गढी) (Induri Fort (Gadhi))  जयगड (Jaigad)  जामगावचा किल्ला (Jamgaon Fort)
 काळाकिल्ला (Kala Killa)  कंधार (Kandhar)  करमाळा (Karmala Fort)  केळवे किल्ला (Kelve Fort)
 खारेपाटण (Kharepatan fort)  खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort))  कोटकामते (Kotkamate)  लहुगड (Lahugad)
 लोंझा (Lonza)  माचणूर (Machnur)  मढचा किल्ला(वर्सोवा किल्ला) (Madh Fort (Varsova Fort))  महादेवगड (Mahadevgad)
 माहीमचा किल्ला (Mahim Fort)  माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim))  मंगळवेढा (Mangalwedha)  नगरचा किल्ला (Nagar Fort)
 नगरधन (Nagardhan)  नागलाबंदर किल्ला (Nagla bunder Fort)  नळदुर्ग (Naldurg)  नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri))
 नारायणगड (आंबोली) (Narayangad(Amboli))  नरनाळा (Narnala)  निवतीचा किल्ला (Nivati Fort)  पळशीचा किल्ला (Palashi Fort)
 पन्हाळगड (Panhalgad)  परांडा (Paranda)  पारोळा (Parola)  पिलीवचा किल्ला (Piliv Fort)
 प्रतापगड (Pratapgad)  पूर्णगड (Purnagad)  ऱाजापूरची वखार (Rajapur Fort (British warehouse))  राजकोट (Rajkot)
 रामदुर्ग (Ramdurg)  रेवदंडा (Revdanda)  रिवा किल्ला (Riwa Fort)  सामराजगड (Samrajgad)
 सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug))  सर्जेकोट (मालवण) (Sarjekot(Malvan))  साटवलीचा किल्ला (Satavali Fort)  शिवडीचा किल्ला (Sewri Fort)
 शिरगावचा किल्ला (Shirgaon)  शिवथरघळ (Shivtharghal)  सिंधुदुर्ग (Sindhudurg)  सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort)
 सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)  सुभानमंगळ (Subhan Mangal)  सुधागड (Sudhagad)  तेरेखोलचा किल्ला (Terekhol Fort)
 उदगीर (Udgeer)  वज्रगड(वसई) (Vajragad (Vasai))  वसई (Vasai)  विजयदुर्ग (Vijaydurg)
 वरळीचा किल्ला (Worli Fort)  यशवंतगड (रेडीचा किल्ला) (Yashawantgad (Redi Fort))  यशवंतगड(नाटे) (Yashwantgad(Nate))