मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

दातेगड (Dategad) किल्ल्याची ऊंची :  500
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: बामणोली, सातारा
जिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम
दातेगडावर जातांना वाटेतच एक भग्न प्रवेशद्वार लागते. या भग्न प्रवेशद्वारातून मार्ग काढल्यावर समोरच तटात खोदलेल्या १० ते १२ फुटी श्रीगणेशाच्या आणि हनुमानाच्या मूर्ती दिसतात. अशा प्रकारच्या मूर्ती फारच कमी किल्ल्यांवर आढळतात. समोरच असणार्‍या २० पायर्‍यांचा चढ चढून गेल्यावर आपण गड माथ्यावर पोहचतो. गड माथ्यावर डावीकडे वळल्यावर काही पायर्‍या खाली उतरतात. या पायर्‍या आपल्याला थेट ५० फुट खाली असणार्‍या विहिरीपाशी घेऊन जातात. ही विहिर म्हणजे वास्तुशास्त्रामधील एक अदभूत नमुना आहे. विहिरीच्या तोंडाशीच महादेवाची एक पिंड आहे. हे सर्व पाहून गडाच्या दुसर्‍या टोकाशी जावे. या ठिकाणी काही पाण्याची टाकी आढळतात. बाकी गडावर पाहण्यासारखे काही नाही. गडमाथा बराच निमुळता असल्याने फिरण्यास अर्धातास पुरतो.
पहाण्याची ठिकाणे :

पोहोचण्याच्या वाटा :
दातेगडला जाण्यासाठी कराड - कोयनानगर मार्गावरील ‘पाटण’ गाठायचे. पाटण एसटी स्थानकाच्या समोरुन चिपळूणच्या रस्त्याला लागायचे. थोड्या अंतरावरच दातेगडच्या अलीकडचा डोंगर दिसतो. या डोंगरसोंडेवरुन चढत गेल्यावर पाऊण तासात एक दर्गा लागतो, तिथून टेकडीच्या घारेवरती गेल्यावर एक घर लागते. घराचे पुढे पठार आहे, याच्या पुढे एक वाडी आहे, हीचे नाव टोळेवाडी. दर्ग्यापासून टोळेवाडीला पोहचण्यास पाऊण तास लागतो. समोरच्या टेकडीच्या पलिकडे दातेगड आहे, मध्ये दरी आहे. दरीच्या काठावरुन चालत गेल्यावर आपण गडाच्या पायथ्याशी पोहचतो. पुढे मात्र गडाच्या वर जाण्यास पायर्‍या आहेत. टोळेवाडी ते गड हे अर्ध्यातासाचे अंतर आहे. पाटण पासून गडापर्यंत रमतगमत जाण्यास अडीच तास पुरतात.
राहाण्याची सोय :
गडावर राहण्याची सोय नाही ,राहण्याची सोय पाटण मध्ये आहे.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही ,जेवणाची सोय पाटण मध्ये आहे.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
टोळेवाडीतून १ तास लागतो.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: D
 दांडा किल्ला (Danda Fort)  दासगावचा किल्ला (Dasgaon Fort)  दातेगड (Dategad)  दौलतमंगळ (Daulatmangal)
 देहेरगड (भोरगड) (Dehergad (Bhorgad))  डेरमाळ (Dermal)  देवगडचा किल्ला (Devgad Fort)  देवगिरी (दौलताबाद) (Devgiri (Daulatabad))
 ढाकचा बहिरी (Dhak-Bahiri)  धाकोबा (Dhakoba)  धारावी किल्ला (Dharavi Fort)  धर्मापूरी (Dharmapuri)
 धारूर (Dharur)  धोडप (Dhodap)  धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi))  द्रोणागिरी (Dronagiri)
 डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera))  दुंधा किल्ला (Dundha)  दुर्ग (Durg)  दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)
 डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort))