मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

काळदुर्ग (Kaldurg) किल्ल्याची ऊंची :  1550
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: पालघर
जिल्हा : पालघर श्रेणी : मध्यम
पालघर भागात अनेक डोंगरी किल्ले आहेत. शहरी भागापासून फारसे लांब नसल्यामुळे हे किल्ले मुंबईकरांना एका दिवसात आरामात पाहता येतात. हे सर्व किल्ले ठाणे आणि जव्हारच्या सीमेवर आहेत.
14 Photos available for this fort
Kaldurg
पहाण्याची ठिकाणे :
काळदुर्गला हा टेहळणीचा किल्ला होता. किल्ला दोन स्तरांत विभागला आहे.एक गडमाथा आणि खालचे पठार. गडमाथा म्हणजे चौकोनी आकाराचा कातळकडाच आहे. या कातळामुळे हा गड लांबूनही नजरेत येतो. गडाचे क्षेत्रफळ साधारण अर्धा एकर असावे. गडमाथ्याच्या खालच्या पठारावर पाण्याचे मोठे टाके आहे. येथे एक कुंडदेखील आढळते. पठारावरुन गडमाथ्यावर जाण्यास २ ते ३ पायर्‍या आहेत. पठारावर पाण्याचे एक टाके आहे. किल्ल्यावरुन आजूबाजूच्या परिसर दिसतो.
पोहोचण्याच्या वाटा :
वाघोबा खिंड मार्गे :-
मुंबईहून विरारमार्गे पालघर गाठावे. अथवा कल्याणहून एसटीने पालघरला जावे. पालघरहून मनोरेला जाणारी बसने ८ कि.मी. वरील ’वाघोबा’ नावाच्या देवळाच्या (’वाघोबा खिंड") थांब्यावर उतरावे. येथूनच गडावर जाण्याची वाट फुटते. या ’वाघोबा’ देवळाच्या उजवीकडे जाणार्‍या वाटेने आपण गडावर पोहोचू शकतो. ’हातपंप’ ही खूण लक्षात ठेवणे. हातपंपच्या समोरुन वर जाणारी वाट पकडावी. ही वाट पुढे तीन भागांत विभागली जाते. डाव्या व उजव्या बाजूची वाट सोडून द्यावी, सरळ वर जाणार्‍या वाटेने काळदुर्ग गाठता येतो.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत…च करावी.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याची टाकी आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
वाघोबा खिंडीतून दीड तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
सर्व ऋतुत जाता येते.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: K
 कैलासगड (Kailasgad)  काळाकिल्ला (Kala Killa)  कलाडगड (Kaladgad)  कलानिधीगड (कलानंदीगड) (kalanidhigad (kalanandigad))
 काळदुर्ग (Kaldurg)  कळसूबाई (Kalsubai)  कल्याणगड (नांदगिरी) (Kalyangad(Nandgiri))  कमळगड (Kamalgad)
 कामणदुर्ग (Kamandurg)  कनकदुर्ग (Kanakdurg)  कांचन (Kanchan)  कंधार (Kandhar)
 कण्हेरगड (Kanhergad)  कन्हेरगड(चाळीसगाव) (Kanhergad(Chalisgaon))  कंक्राळा (Kankrala)  कर्‍हा (Karha)
 करमाळा (Karmala Fort)  कर्नाळा (Karnala)  कात्रा (Katra)  कावनई (Kavnai)
 केळवे किल्ला (Kelve Fort)  केळवे पाणकोट (Kelve Pankot)  केंजळगड (Kenjalgad)  खांदेरी (Khanderi)
 खारेपाटण (Kharepatan fort)  खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort))  कोहोजगड (Kohoj)  कोकणदिवा (Kokandiwa)
 कोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi)  कोंढवी (Kondhavi)  कोरीगड (कोराईगड) (Korigad)  कोर्लई (Korlai)
 कोटकामते (Kotkamate)  कुलंग (Kulang)  कुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad))  कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad)