मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

पालगड (Palgad) किल्ल्याची ऊंची :  1328
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम
छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. इतिहासात फारस काही न घडलेला हा किल्ला पालगड गावाच्या मागे दाट झाडीत उभा आहे. खेड - दापोली रस्त्यावर असलेले हे गाव साने गुरुजींच जन्मस्थान आहे. या किल्ल्याचे स्थान पाहाता याचा उपयोग टेहळणीसाठी केला गेला असावा

Palgad
28 Photos available for this fort
Palgad
पहाण्याची ठिकाणे :
१५ एकर क्षेत्रफळाच्या पसरलेल्या या किल्ल्याचे पूर्वाभिमूख प्रवेशद्वार उध्वस्त झालेले आहे, परंतू बुरुज अजून शाबुत आहेत. दरवाजाच्या उजव्या बाजूला एक तोफ आकाशाकडे तोंड करुन पूरलेली आहे. अशीच दूसरी तोफ होळीच्या माळावर व तिसरी तोफ गावात विहिरीजवळ शेतात पूरलेली आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर वाड्र्‍यांचे काही जोते आहेत. तेथून पूढे गेल्यावर एक सुकलेल टाक आहे. गडाच्या निमूळत्या होत गेलेल्या सोंडेच्या टोकाला बुरुज आहेत. गडाची तटबंदी थोड्याफार प्रमाणात शाबूत आहे. गडाच्या माचीवर वस्ती आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
१) पालगड गाव दापोलीपासून २१ किमीवर, दापोली - खेड मार्गावर आहे. पालगड माचीपर्यंत गाडी रस्ता आहे. तेथून हनूमान मंदिरा जवळून वाट किल्ल्यावर जाते.
२) खेड - जामगे रस्त्यावरील कदमवाडीतूनही किल्ला सर करता येतो.
राहाण्याची सोय :
गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
किल्ल्यावर जाण्यासाठी पालगड माचीवरुन ३० मिनीटे लागतात व पालगड गावातून १ तास लागतो.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: P
 पाबरगड (Pabargad)  पाच्छापूर किल्ला (Pachhapur Fort)  पदरगड (Padargad)  पद्‌मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa))
 पद्मगड (मालवण) (Padmagad (Malvan))  पळशीचा किल्ला (Palashi Fort)  पालगड (Palgad)  पांडवगड (Pandavgad)
 पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg)  पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort)  पन्हाळगड (Panhalgad)  परांडा (Paranda)
 पारगड (Pargad)  पारोळा (Parola)  पर्वतगड (Parvatgad)  पाटेश्वर (Pateshwar)
 पट्टागड (Patta)  पेब (विकटगड) (Peb)  पेडका (Pedka)  पेमगिरी(शहागड) (Pemgiri(Shahagad))
 पेठ / कोथळीगड (Peth (Kothaligad))  पिलीवचा किल्ला (Piliv Fort)  पिसोळ किल्ला (Pisol)  प्लस व्हॅली ट्रेक (Plus Valley)
 प्रबळगड (Prabalgad)  प्रचितगड (Prachitgad)  प्रतापगड (Pratapgad)  पुरंदर (Purandar)
 पूर्णगड (Purnagad)