मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

वल्लभगड (हरगापूरचा किल्ला) (Vallabhgad(Hargapur)) किल्ल्याची ऊंची :  1850
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : बेळगाव श्रेणी : मध्यम
कोल्हापूर - बेळगाव महामार्गावर संकेश्वरच्या आलीकडे ३ कि.मी वर ‘वल्लभगड’ नावाचा एक फाटा आहे. या फाट्यावरून वल्लभगडाचे दर्शन होते. महामार्गापासून डावीकडे वळल्यावर आपण थेट वल्लभगड गावातच पोहोचतो. वल्लभगड गावातून पंधरा मिनिटांत गडावर जाता येते.
16 Photos available for this fort
Vallabhgad(Hargapur)
पहाण्याची ठिकाणे :
गडाच्या बुरुजाच्या बाजूला गावदेवी मरगुबाईचे पुरातन मंदिर आहे. मंदिरासमोर दिपमाळ आहे. मुख्य प्रवेशद्वाराची कमान उत्तम स्थितीत आहे. प्रवेशद्वार छोटे परंतु गोमुखी बांधणीचे आहे. प्रवेशद्वाराच्या आत मारुतीचे प्रशस्त मंदिर लागते. गडाच्या पूर्व तटावर सिध्देश्वराचे पुरातन मंदिर आहे. या मंदिराच्या खाली मोठी गुहा आहे. तिच्यात पादुका स्थापित केलेल्या आहेत. या गुहेतून एक भुयार आरपार गेले असून ते संकेश्वरात उघडते असे म्हणतात. गडाच्या मध्यभागी चौकोनी आकाराची खोल विहिर आहे. या विहिरीत उतरण्यासाठी मारुती मंदिराच्या मागून भुयारी वाट आहे. वीस-पंचवीस पायर्‍य़ा उतरल्यानंतर एक कमान लागते. पायर्‍य़ांचा मार्ग अत्यंत भव्य आहे. आणखी पुढे गेल्यावर मोठी विहिर लागते. याच विहिरीचे पाणी नळाद्वारे गडावर खेळविले आहे. गडाची बरीच तटबंदी उध्वस्त झालेली आहे. गडाच्या उत्तरेला एक बुरुज असून तो तटबंदीच्या आत सुटा उभारलेला आहे. यावरुन गडावरील अंतर्भागात लक्ष ठेवले जायचे. गड लहान व आटोपशीर असला तरी सध्या महाराष्ट्राच्या बाहेर असलेला शिवकालीन किल्ला म्हणून याचे महत्व फार आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
कोल्हापूर - बेळगाव महामार्गावर संकेश्वरच्या अलीकडे ३ कि.मी वर ‘वल्लभगड’ नावाचा एक फाटा आहे. फाट्यावरून वल्लभगडाचे दर्शन होते. महामार्गा पासून डावीकडे वळल्यावर या फाट्यावरून दोन रस्ते फ़ुटतात. यापैकी कोणत्याही रस्त्याने गेल्यास हरगापूर (वल्लभगड) गावला वळसा घालूनच वल्लभगडावर जावे लागते. हरगापूर गावातून पंधरा मिनिटांत वल्लभगडावर जाता येते.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत:… करावी.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याचा तुटवडा आहे. गडाच्या अर्ध्या चढणीवर असलेल्या वाडीतून गडावर पाणी नेले जाते.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
गडावर जाण्यासाठी १५ मिनिटे लागतात. गड पाहाण्यासाठी लागणारा कालावधी अंदाजे १ तास.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: V
 वैराटगड (Vairatgad)  वज्रगड(वसई) (Vajragad (Vasai))  वल्लभगड (हरगापूरचा किल्ला) (Vallabhgad(Hargapur))  वर्धनगड (Vardhangad)
 वारुगड (Varugad)  वसई (Vasai)  वसंतगड (Vasantgad)  वासोटा (Vasota)
 वेताळगड (Vetalgad)  वेताळवाडी गड (Vetalwadi gad)  विजयदुर्ग (Vijaydurg)  विसापूर (Visapur)
 विशाळगड (Vishalgad)