मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

विजयदुर्ग (Vijaydurg) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : सोपी
वाघोटन नदी समुद्राला ज्या ठिकाणी मिळते तिथे तीन बाजूंनी समुद्राच पाणी आणि एका बाजूने जमिनेने वेढलेल्या "घेरीया" उर्फ़ "विजयदुर्ग" किल्ला उभा आहे. १२ व्या शतकापासून अनेक राजवटी पाहिलेला हा किल्ला १७ व्या शतकात मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र होता. इ.स. १८७८ मधे खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी शास्त्रज्ञ लॉकियर याने विजयदुर्गावरुन केलेल्या निरिक्षणात "हेलियम वायूचा" शोध लागला. विजयदुर्गच्या पश्चिमेला समुद्राखाली बांधलेली संरक्षक भिंत हे एक आश्चर्य आहे. किल्ल्याजवळ मोठी जहाज (युध्द नौका) आल्यास त्यांचा तळ भिंतीला आपटून त्या नष्ट होत असत. नितांत सुंदर भौगोलिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला, विविध घटनांचा साक्षिदार असलेला विजयदुर्ग किल्ला आजही आपल्या गतवैभवाचे अवशेष अंगा खांद्यावर बाळगत उभा आहे.
stride rite printable coupons open rite aid beauty coupons
how to coupon at rite aid site rite aid coupons
8 Photos available for this fort
Vijaydurg
Map of Vijaydurg fort.
Map of Vijaydurg fort.
इतिहास :
कोल्हापूरचा शिलाहार राजा भोज याने इ.स. ११९३ ते इ.स.१२०६ हा किल्ला बांधला. पुढे यादव, विजयनगर, बहामनी, आदिलशाही या राजवटींकडे हा किल्ला होता. इ.स. १६६४ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकुन घेतला व त्याचे नाव विजयदुर्ग ठेवले. गडाला तिहेरी तटबंदी, गोमोख्ही दरवाजा इत्यादी बांधुन गड मजबूत केला. शिवाजी महाराजां नंतर सरखेल कान्होजी आंग्रे यांच्याकडे हा किल्ला होता. मराठ्यांच्या आरमाराचा तळ या किल्ल्य़ा जवळ होता.इ.स. १७१७ मध्ये मराठ्यांनी इंग्रजांचे "ससेक्स" जहाज पकडून विजयदुर्ग बंदरात ठेवले. कान्होजींच्या समुद्रावरील वाढत्या प्रभावाने इंग्रजांचे धाबे दणाणले होते. इंग्रजांनी इ.स. १७१८ मध्ये प्रचंड आरमारानीशी विजयदुर्गावर हल्ला चढवला, पण किल्ल्यावरून रुद्राजी धुळपने तो हल्ला परतवून लावला. प्रचंड दारूगोळा आणि २०० सैनिकांचे प्राण गमवून इंग्रजांचे आरमार मुंबईला परत गेले.

इ.स.१७२० मधे इंग्रज कॅप्टन ब्राऊनने अनेक लढाऊ जहाज घेऊन विजयदुर्गावर हल्ला केला. त्यांच्या ताफ़्यात "फ़्राम" नावाची प्रचंड युध्दनौका होती. तरीही इंग्रजांना हार पत्करावी लागली. मराठ्यांनी इंग्रजांचा पाठलाग चालू केल्यावर त्यांच्या हाती "फ़्राम" लागू नये म्हणून इंग्रजांनी ती युध्दनौका जाळुन बुडवली.

इ.स.१७५६ मधे तुळाजी आंग्रेंच्या विरुध्द पेशवे आणि इंग्रजांनी संयुक्त आघाडी उघडली. पेशव्यांनी जमिनीवरून व इंग्रजांनी पाण्यावरून हल्ला केला. या युध्दात मराठ्यांचे संपूर्ण आरमार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल आणि नष्ट झाल. विजयदुर्ग किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. पेशव्यांशी झालेल्या तहात इंग्रजांनी बाणकोट किल्ल्याच्या बदल्यात विजयदुर्ग किल्ला पेशव्यांना दिला. पेशव्यांनी आनंदराव धुळपांची विजयदुर्गावर नेमणुक केली.

इ.स. १८७८ मधे खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी शास्त्रज्ञ लॉकियर याने विजयदुर्गावर खास चौथरे बनवून घेतले व सुर्याचे निरीक्षण केले. त्यावेळी त्याला हेलियम वायूचा शोध लागला.
pills for pregnancy termination abortion clinics nyc abortion clinics in md
diflucan 50mg ventolin pill prednisolone 40mg
rx pharmacy coupons open coupon pharmacy
zithromax 500mg montechristo.co.za diprolene 0.05%
पहाण्याची ठिकाणे :
विजयदुर्ग गावातून आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. त्याठिकाणी पूर्वीच्या काळी खंदक होता. समुद्राचे पाणी त्यात खेळवलेले होते. किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी या खंदकावर उचलता येणारा लाकडी पूल होता. आज मात्र भराव घातल्यामुळे आपला थेट जमिनीवरून गडावर प्रवेश होतो. गडाचा पहिला दरवाजा "हनुमंत दरवाजा" आणि त्याच्या समोर शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हनुमंताचे देउळ आणि एक तोफ़ पाहायला मिळते. पुढे गेल्यावर भक्कम जिबीचा दरवाजाला पाहायला मिळतो. दरवाजातून आत शिरल्यावर किल्ल्याच्या पडकोटाला असलेल्या तीन तटबंद्या पाहायला मिळतात. समुद्रालगत असलेली पहिली तटबंदी ३० फ़ूट उंचीची आहे. त्यानंतर दुसरी तटबंदी १० फ़ूट उंचीची आणि मुख्य किल्ल्याची तिसरी तटबंदी ३० फ़ूट उंच आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या तटबंदीच्या मधे असलेल्या फ़रसबंदी मार्गाने पुढे गेल्यावर गोमुखी रचनेचे भव्य "यशवंत" महाव्दार लागते. तीन दरवाजे, तिहेरी तटबंदी यांच्या सहाय्याने किल्ला अभेद्य केलेला आहे.

किल्ल्यात प्रवेश केल्यावर पोलिस चौकी समोर रचुन ठेवलेले तोफ़गोळे पाहायला मिळतात. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर डाव्या बाजुने गडफ़ेरी चालू केल्यावर प्रथम आपल्याला खलबतखान्याची इमारत दिसते. तेथुन पुढे सदरेची भव्य इमारत दिसते. सदरेच्या पुढे एक चुन्याचा घाणा पाहायला मिळतो. पुढे बुरुजावरच बांधलेल्या दोन मजली इमारती दिसतात. त्यांना माडी म्हणतात. पुढे राणीवसाची इमारत एका भव्य बुरुजावर बांधलेली पाहायला मिळते. तटबंदीच्या आतल्या बाजूस खाली अनेक उध्वस्त चौथरे पाहायला मिळतात. पुढे तटबंदीवर चढुन चालायला सुरुवात केल्यावर अनुक्रमे गणेश, राम, हणमंत आणि दर्या बुरुज पाहायला मिळतात. बुरुज व तटबंदीतील जंग्या, तोफ़ांसाठी ठेवलेले झरोके व बुरुजावर पाण्यासाठी ठेवलेल्या दगडी डोणी पाहाण्या सारख्या आहेत. दर्या बुरुजाला असलेल्या पायर्‍यांवरुन खाली उतरल्यावर एक चौकोनी विहिर पाहायला मिळते. त्याच्या पुढे एक चुन्याचा घाणा आहे. चुन्याचा घाणा पाहून परत तटबंदीवर चढल्यावर अनुक्रमे तुटका, शिकरा, सिंदे, शहा, व्यंकट, सर्जा, शिवाजी, गगन, मनरंजन बुरुज पाहायला मिळतात. मनरंजन बुरुजावरून गोविंद बुरुजाकडे जातांना उजव्या बाजुला असलेल्या किल्ल्याच्या मुख्य तटबंदीत एक चोर दरवाजा पाहायला मिळतो. गोविंद बुरुजावरून पुढे गेल्यावर एक भव्य बुरुज थेट समुद्रात शिरलेला पाहायला मिळतो. समुद्रापासून ३२ मीटर उंच असलेल्या या बुरुजाला "खुबलढा किंवा बारातोपा बुरुज" या नावाने ओळखतात. या बुरुजावर जाण्यासाठी तटबंदीच्या आत कमानी असलेला बोगदा बनवलेला आहे. त्यात काही तोफ़गोळे ठेवलेले आहेत. खुबलढा बुरुज पाहुन पुन्हा तटबंदीवर येउन पुढे गेल्यावर घनची, पान बुरुज पाहायला मिळतात. पुढे एक वास्तू पाहायला मिळते. त्यावर दारुकोठार अस नाव लिहिलेल आहे. परंतू तटबंदीला लागुनच दारुकोठार असण्याची शक्यता कमी आहे.

दारूकोठार पाहून झाल्यावर तटबंदीवरुन उतरून किल्ल्याच्या आत असलेल्या टेकडी भोवती बांधलेल्या तटबंदीच्या आत प्रवेश करुन चोर दरवाजाच्या दिशेने चालत गेल्यावर एक विहिर पाहायला मिळते. ती पाहून आखलेल्या मार्गावरून चालायला सुरुवात केल्यावर भग्न भवानी मंदिर पाहायला मिळते. त्यापुढे उध्वस्त वास्तुंचे काही चौथरे पाहायला मिळतात. पुढे उजव्या बाजूस काही सिमेंटचे ओटे पाहायला मिळतात. त्याला "साहेबांचे ओटे" म्हणतात. इ.स. १८७८ मधे खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी शास्त्रज्ञ लॉकियर याने विजयदुर्गावर खास चौथरे बनवून घेतले व सुर्याचे निरीक्षण केले. त्यावेळी त्याला हेलियम वायूचा शोध लागला.पायवाटेच्या डाव्या बाजूस एक लहान व एक प्रचंड मोठा हौद पाहायला मिळतो. मोठ्या हौदात उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. दोनही हौद कोरडे आहेत. पावसाचे पाणी साठवण्यासाठी हे हौद बांधण्यात आले होते. साठलेले पाणी जमिनीत मुरु नये म्हणुन हौद बांधताना शिश्याचा वापर केला होता. हौदाच्या पुढे असलेल्या इमारतीत खालच्या मजल्यावर धान्य कोठार होते. इमारत पाहुन पुढे गेल्यावर जखिणीचे मंदिर व त्यासमोर ठेवलेली जखिणीची तोफ़ पाहायला मिळते. ती पाहुन पायवाटेने तोफ़गोळे ठेवलेल्या पोलिस चौकीकडे येताना वाटेत घोड्याच्या पागा, हौद, एक विहिर आणि तुळशी वृंदावन पाहायला मिळते. इथेच तटबंदी जवळ खाली उतरणार्‍या पायर्‍या दिसतात. इथे एक भूयार असून ते गिर्ये गावातील आनंदराव धुळपांच्या वाड्यात उघडते अशी वदंता आहे. पण विजयदुर्ग ते गिर्ये (७ किमी) अंतर पाहात असे बुयार असण्याची शक्यता कमी आहे. ( हे दारू कोठार असण्याची शक्यता आहे.) किल्ल्याच्या गोमुखी दरवाजा जवळ आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. गडफ़ेरी पूर्ण करण्यासाठी २ तास लागतात.
विजयदुर्ग पासून ७ किमी अंतरावर गिर्ये गाव आहे. या गावात १) बस स्थानका मागे आनंदराव धुळपांचा वाडा आहे. २) कान्होजी आंग्रेंच्या काळात वाघोटन खाडीत दगड फ़ोडून आरमारी गोदी (Dry Dock) बांधण्यात आली होती. या ठिकाणी जहाज बांधणी आणि दुरुस्तीची कामे केली जात. ३) विजयदुर्ग पासून ३ किमीवर रामेश्वर मंदिर आहे. त्याच्या जवळ संभाजी आंग्रे यांची समाधी आहे.

पोहोचण्याच्या वाटा :
रस्त्याने :- मुंबई - गोवा महामार्गावर मुंबई पासून ४७१ किमीवर तळेरे फ़ाटा आहे. येथून ५५ किमीवर विजयदुर्ग आहे.
रेल्वेने :- कोकण रेल्वेवरील वैभववाडी हे जवळच स्थानक विजयदुर्ग पासून ६७ किमी अंतरावर आहे.
teen abortions site what are the methods of abortion
rhoads pharmacy coupons click promo code walgreens
राहाण्याची सोय :
diflucan 50mg robertsuk.com prednisolone 40mg
जेवणाची सोय :
how can i terminate a pregnancy abortion pill what is abortion
zithromax 500mg go diprolene 0.05%
पाण्याची सोय :
can hiv be cured go what are the causes of aids
coupon rx site rx discount pharmacy
rhoads pharmacy coupons click promo code walgreens
vardenafil 10mg go levofloxacin pill
valtrex pill ciprofloxacin 250mg renova 0.025%
जाण्यासाठी लागणारा वेळ :
how can i terminate a pregnancy abortion pill what is abortion
सूचना :
coupon rx walgreens photo coupons online rx discount pharmacy
rhoads pharmacy coupons link promo code walgreens
how to coupon at rite aid mesutcakir.com.tr rite aid coupons
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: V
 वैराटगड (Vairatgad)  वज्रगड(वसई) (Vajragad (Vasai))  वल्लभगड (हरगापूरचा किल्ला) (Vallabhgad(Hargapur))  वर्धनगड (Vardhangad)
 वारुगड (Varugad)  वसई (Vasai)  वसंतगड (Vasantgad)  वासोटा (Vasota)
 वेताळगड (Vetalgad)  वेताळवाडी गड (Vetalwadi gad)  विजयदुर्ग (Vijaydurg)  विसापूर (Visapur)
 विशाळगड (Vishalgad)