India trekking forum - Sahyadri : निबीड अरण्यातील ट्
    <![CDATA[Author: Deepali Lanke
Subject: 271
Posted: 06 Oct 2014 at 10:24am
                         निबीड अरण्यातील ट्रेक- लोणावळाते भीमाशंकर<p ="Msonormal">                                             -दीपालीलंके<o:p></o:p>
<p ="Msonormal">विपुल वनराई,हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींनेभरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या,पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे नेहमीच दुर्गप्रेमींना आणि डोंगर भटक्यांनासाद घालत आले आहेत. लोणावळा हे ऐन घाटमाथ्यावरील ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे तर भिमाशंकर हे पुणेजिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे .भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकीएक असलेले भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्यानेवेढले गेले आहे. मग लोणावळा ते भीमाशंकर यांना जोडणारी डोंगररंग भटक्यांच्या नजरेत न येईल तर नवलचआहे. आम्ही१० भटके एकत्रित आलो ते २७ आणि २८ सप्टेंबर २०१४ रोजी आयोजित केलेल्या लोणावळा ते भीमाशंकरया ट्रेक च्या निमित्ताने आणि या ट्रेक चे नेतृत्व निसर्गमित्र संस्थेचा चा सदस्य राहुलखोत याने यशस्वीरीत्या केले.सह्याद्री माणसाला घडवते ,शिकवते आपल्या उदरात वाढवते आणिखेळवते ,माणुसकी आणि माणसांची पारख शिकवणारी हीच सह्याद्री माणसाला एक मेकांशी जोडतेते विविध वाटेतून, दऱ्या खोऱ्यातून बागडताना. अशा या आमच्या लोणावळा ते भीमाशंकर या निबिडअरण्यातील ट्रेक चे दोन दिवसाचे स्वरूप लोणावळा वळवण गाव - कुसूर पठार - धनगरवाडी- कुसूर गाव -तळपेवाडी-कमलजाई मंदिर- भीमानदी - गुप्त भीमाशंकर -भीमाशंकर असे होते. <o:p></o:p>
<p ="Msonormal">आम्ही १० दुर्ग वेडे सह्याद्रीचा वसा उरात घेवून फिरणारे २६ सप्टेंबर रोजी रात्रीसाधारपणे ११.३० वाजता लोणावळा बस डेपो ला भेटलो तिथून वैयक्तिक वाहनाने आम्ही वळवणगावाच्या दिशेने निघालो आणि तासाभराने वाहन जिथून पुढे जावू शकत नाही तिथे उतरलो आणिचांदण्या रात्रीतून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली.रात्रीची वेळ असल्यामुळे सावधआणि सूचकता असावी अशी सूचना देण्यात आली आणि आम्ही आमच्या ट्रेक ला खऱ्या अर्थाने प्रारंभकेला. रात्री येणारा किड्यांचा किरर्र आवाज, जंगलातील भयाण शांतता आणि मधेच येणारीवाऱ्याची झुळूक अगदी आल्हाददायक वाटत होती.जंगलातील प्रवास म्हंटला कि जंगलात राज करणारेआणि वास्तव्य असणारे न दिसले तर गोष्टच निराळी असंच पुढची वाटचाल करत असताना आम्हालातस्कर या बिनविषारी असलेल्या सापाचे दर्शन झाले आणि खऱ्या अर्थाने निबिड अरण्यातीलआमच्या ट्रेक ला चार चांद लागले असे बोलले तर अतिशयोक्ती नसेल.<o:p></o:p>
<p ="Msonormal">तस्कर हा भारतीय उपखंडात आढळणाराअतिशय निरुपद्रवी बिनविषारी साप आहे. इंग्रजीत याला ट्रिंकेट अथवा साधाम्हणतात. अतिशय शांत स्वभावाचा हा साप हाताळायला अतिशय सोपा आहे. तस्कर चा मराठीत अर्थतस्करी अथवा चोरी करणारा. हा लांबीला साधारणपणे १/२ ते १ मीटर पर्यंत असतो. व जाडीला१ इंचापर्यंत असतो. अंगावर पट्टे असतात व पट्टे सुरेख बुद्धीबळातील पटासारख्या छोट्याकाळ्या पांढर्‍या चौकोनांनी भरलेले असतात. हा मुख्यत्वे दक्षिण भारत,श्रीलंका मध्ये आढळतो. महाराष्ट्रातही विपुल प्रमाणात आढळतो, छोटी जंगले, मानवी वस्त्यातीलगव्हाणी, आडगळीच्या जागा ह्या आवडत्या जागा आहेत.<o:p></o:p>
<p ="Msonormal">तस्कर या सापाची चपळ हालचाल कॅमेरात कैद करतच आम्ही पुढची वाट काढत वळवण गावातपोहचलो आणि तिथे असलेल्या मंदिरा शेजारच्या रिकाम्या खोलीत आपले बस्तान बसवले. साधारणपणे३ वाजता आम्ही निद्राधीन झालो. दुसऱ्या दिवशी ची प्रसन्न पहाट,चिमण्यांचा किलबिलाट, गार वाराअगदी मनाला उल्हसित करत होता आणि आजू बाजूला निसर्गाने नेसलेला हिरवागार शालू तर अगदीविलोभनिय वाटत होता. सकाळची आन्हिक आवरून आम्ही आमचा गाशा गुंडाळला आणि पुढे मार्गक्रमणकरण्यास सुरुवात केली आमचा पुढचा टप्पा होता कुसूर पठार, ते गाठेपर्यंत चढ उतार करतआणि निसर्ग मनात साठवत आम्ही एक मेकांशी संवाद साधत आणि डोळ्यात निसर्गाचा अविष्कारसाठवत राजमाची , मनोरंजन, ढाक बहिरी ,मांजर सुभा,कलाकारी,आणि कोंडेश्वर यांचे दर्शनमिळाले.सोनकीची फुलं, कारवी याने पठार लक्ष वेधून घेत होते तर सुळके त्यांच्या अस्तित्वाचीजाणीव करून देत दिमाखात खुणावत होते.वेळ मिळेल तसं आम्ही नजरबद्ध आणि कामेराबद्ध हेसुंदर आणि सोज्वळ दृश्य करून घेत होतो.कुसूर पठारावरून जाताना तर बहरलेल्या सोनकीनेआणि हिरवळीने अगदी स्वर्गाभास झाला.निसर्गाच यावेळी अप्रूप वाटल्याशिवाय राहवलं नाही.निसर्गाची किमया आणि खरा श्रीमंत हा निसर्गच आहे असं मनात सारखा डोकावत होतं धनगर वाडीतथोडा वेळ आराम करून आम्ही कुसूर गावात मजल दरमजल करत पोहचलो.तिथूनच आम्ही तळपेवाडीहे अंतर चालतच गाठायचं ठरवून तर निघालो मात्र अंतर जास्त असल्याकारणाने आम्ही वैयक्तिकवाहनाने तळपेवाडी गाठली दिवसभराच्या अथक पायपिटी नंतर आम्ही भूकेने व्याकुळ झालो होतोएका झाडाखाली सामान ठेवून आम्ही आणलेल्या भाकरी ठेच्या वर ताव मारला आणि आत्मा शांतकेला. अश्याप्रवासात थोडी विश्रांती सुद्धा माणसाला तजेलदार बनवते. सगळे अगदी टवटवीत झाले आणिपुढचा  टप्पा गाठण्यासाठी सज्ज झाले.तळपेवाडीतपोहचे पर्यंत अंधार झाला होता सगळे आम्ही सवंगडी आणि गडकरी एकमेकाच्या साथीने वाडीतपोहचलो आणि दिवसभराची पायपीट,घामेजलेले ,मळकटलेले आम्ही तिथल्या शाळेत सामान ठेवूनथंड पाण्याने स्वच्छ हाय पाय तोंड धुवून अगदी शांत झालो.गावकरी आणि त्यांच्यात असलेली  माणुसकी मनाला भावल्याशिवाय राहत नाही. मदती साठीसदैव तत्पर असलेले गावकरी दुर्गप्रेमींच्या मनात कायम घर करून राहतात. आणि या यशस्वी वाटचालीतत्यांचा सिंहाचा वाटा असतो असे बोलले तर ते खरेच ठरेल.डोंगर प्रेमी एकत्र आले कि ज्ञानाचाभांडार च एकत्र आल्यासारखा होतो प्रत्येकाचे अनुभव पुस्तक वाचण्यापासून ते त्यांनीकेलेल्या आयुष्यातील विलक्षण आणि यशस्वी गोष्टी ते त्यांचे डोंगर भटकंतीतील ज्ञान याचीदेवन घेवाण करत असतानाच सगळा थकवा कुठल्या कुठे जातो हेच काळत नाही आणि असलेला वेळ हि अपुरावाटू लागतो.<o:p></o:p>
<p ="Msonormal">दुसऱ्या दिवशी सकाळीच जाग आली प्रसन्न सकाळ अतिशय स्वच्छंद वातावरणाने उभारी मिळालीआणि आन्हिक आवरून आम्ही आमचा गाशा गुंडाळून भीमाशंकर च्या दिशेने निघालो.ताशीव कातळकडे चहु बाजूनी नटलेली सह्याद्री कडे पाहून कृत कृतज्ञ झाल्यासारखे वाटत होते.चालतानानागोबांचे झालेले दर्शन ,मुंगुस यांनी तर अजूनच भर घातली.खेकड्यांच पठार ,कमलजाई मंदिरअसे एका नंतर एक टप्पे पार करत आम्ही भीमा नदीच्या दिशेने खाली उतरलो आणि आमच्यातल्यासह्यवेड्यांना पाण्यात उतरण्याचा मोह आवरता आला नाही आणि मनसोक्त पाण्यात डुंबण्याचाआनंद काय असतो ते इथे पाहायला मिळाल. मजल दरमजल करत असताना आम्हाला नागफणीचे दर्शन झाले.हे ठिकाणअभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. कोकणातूनहे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे. आम्ही भटके गुप्त भीमाशंकराच्यादर्शनासाठी अगदी उत्स्फुर्तपणे धावतच निघालो आणि १५ मिनिटात अंतर गाठले. भीमानदीचेमूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे१.५ किमी पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखलीजाते.अगदी नजरेस न पडणारी महादेवाची पिंड इथे पाहायला मिळते अगदी मनास शांतता लाभते.परतानाअगदी मनात मी नुकत्याच वाचलेल्या महादेवा वरच्या मेलुहा ,नागांचे रहस्य ,आणि वायुपुत्रांचीशपथ या मनीष त्रिपाठी यांनी लिहिलेली TRIOLOGY दृष्टीपटलावरून साद घालत राहिली.शेवटीमहादेव देवांचा देव कसा झाला त्याचं मनात चित्री करण रंगवत असताना आम्ही भीमाशंकर लापोहचलो आणि आम्ही जिंकलो हीच एक सुहृदयी भावना मनात राहिली. दुर्ग प्रेमीने स्वत वरमिळवलेला हा विजय च मी मानते. दर्शन आटोपून भूक तहान विसरलेलो आम्ही भुकेने व्याकुळ झालो आणि भीमाशंकरयेथील हॉटेलात जे वाट्यास येईल ते पचनी पाडले आणि लागले ते परतीचे वेध.<o:p></o:p>
<p ="Msonormal">प्रत्येक गोष्टीला सुरुवात आणि शेवट असतोच पण शेवट पचायला खरच खूप जड जातो.परतीचाप्रवास करत असताना मनात अभिमान आणि परतण्याची खंत असतानाच एक विचार चमकून गेला जगावंते या सह्याद्रीच्या कुशीत आणि शेवटी गतप्राण व्हावं ते याच सह्याद्रीच्या कुशीत.<o:p></o:p>