India trekking forum - Sahyadri : किल्ले वासोटा
    <![CDATA[Author: Shreyas Pethe
Subject: 377
Posted: 19 Apr 2020 at 8:05pm
<p ="Msonormal" style="text-indent:.5in">    गर्द वनातील किल्ले वासोटा सोबतचठोसेघर धबधबा आणि कल्याणगडाच्या पायथ्याचे रुचकर जेवण <o:p></o:p>
<p ="Msonormal" style="text-indent:.5in">नवीन वर्षाच्यामालिकेतला पहिला ट्रेक. किल्ले वासोटा. खूप दिवसांपासून या नावचे गारुड मनावरहोतं. नवीन वेळापत्रक आल्यावर माझ्या नावासोबत लादेचे नाव सुद्धा ट्रेक लीडरम्हणून दिसलं. मागच्या Schedule मध्ये हरिश्चंद्र नळीच्या वाटेने होतं ना त्याचालीडर लादेच होता परंतु प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे मला जमलं नव्हतं. या ट्रेकच्याआधी २ दिवस लादेचा फोन आला, किल्ल्याची माहिती द्यायची आहे, देशील ना ? नाहीम्हणायचा प्रश्नच नव्हता. मी होकार कळवला. पहिलाच ट्रेक होता बायकोसोबत. बऱ्याचलोकांनी ऐनवेळी नाव कमी केल्यामुळे आमच्या दोघांचा तसेच आदित्य गोखलेचाही नंबरलागला. २१ नोव्हेंबर ला कबड्डीचा सराव करताना नेमका पाय मुरगळला. ट्रेक रद्द करावालागणार असेच वाटत होते परंतु इच्छाशक्ती आणि केदार, तन्वी (आमच्या सौ.) च्यापाठिंब्यामुळे २३ नोव्हेंबर ला रात्री ओंकार धुळपकडे पोचलो. बऱ्याच दिवसांनी ओंकारआणि गायत्रीची भेट झाली. काही वेळातच Judgement चा डाव रंगला. रात्री ३ च्यासुमारास डोंबिवलीची मंडळी औंधमध्ये दाखल झाली. पुढे चांदणी चौकात भारती आणि सोनमया जोडगोळीला घेऊन बामणोली कडे निघालो.<o:p></o:p>
<p ="Msonormal" style="text-indent:.5in">चहासाठी थांबत रमतगमतगेल्याने वेळेच्या तासभर उशीराच बामणोलीला पोचलो. आधीच उशीर झाल्यामुळे चहा,नाश्ता पटापट उरकून वन खात्याची परवानगी घेऊन २ बोटींमधून कोयनेच्या विस्तीर्ण अशाशिवसागर तलावात उतरलो. तलावाचं निळं-हिरवं पाणी, आजूबाजूची पाण्यात डोकावणारी गर्दवनश्री, त्यात मध्येच पाण्यामुळे तयार झालेली बेटं. अहाहा!!! काय नयनरम्य नजाराहोता तो... तब्बल सव्वातासाच्या प्रतीक्षेनंतर वासोटा आणि नागेश्वराची जोडी नजरेसपडली. पाण्यात खेळत, फोटो काढण्याच्या नादात नाव किनाऱ्याला कधी लागली कळलंच नाही.दोन्ही नावांमधून आम्ही २८ जण  उतरलो आणिवनखात्याच्या ऑफिस जवळ पोहोचलो. या ठिकाणी प्रत्येकाजवळ असलेल्या प्लास्टिकपिशव्या आणि प्लास्टिक बाटल्या वगैरे किती आहेत याची संख्या सांगून त्यानुसाररक्कम जमा करावी लागते आणि पुन्हा किल्ला उतरून इथे येताना त्या वस्तूंची संख्याजुळल्यास दिलेली रक्कम आपणास परत मिळते.  सर्वांशी एकत्रित ओळख बामणोली मधेच करून घेतलीहोती, त्यामुळे आता सचिन लादेने सर्वाना घेऊन त्या गर्द जंगलात प्रवेश केला. वाटतशी मळलेली होती. शनिवार- रविवार जोडून सुट्टी असल्याने हवशे नवशे सगळ्यांनी गर्दीकेली होती. त्यात एक वयस्कर ट्रेकर्सचापण ग्रुप होता. काही काळ सरळ रस्ता, चढण आणिशेवटच्या टप्प्यातली खडी चढण पार करून माथ्यावर पोचलो. तन्वीनेही जरासं थांबतथांबत चढण पार केली आणि वेळेत गडावर पोहोचली. माथ्यावरून शिवसागर जलाशय, कोयना-सह्याद्री अभयारण्य असा बराच मोठा परिसर डोळ्यांच्या आवाक्यात येत होता. <o:p></o:p>
<p ="Msonormal" style="text-indent:.5in">थोडी विश्रांती घेऊनसंस्थेच्या संकेतस्थळावरून तसेच इतर काही साधनांद्वारे मिळवलेली माहिती मी सर्वानासांगितली. त्यानंतर आम्ही सर्व प्रथम मारुतीच्या मंदिराच्या डावीकडून चुन्याचाघाणा पाहून जुन्या वासोट्याच्या बाबू कड्याच्या दिशेने निघालो. अजस्त्र बाबू कडापाहून कोकण कड्याची आठवण झाली. त्यानंतर मारुती मंदिराच्या उजव्या बाजूने चालतजाऊन वाड्याचे अवशेष पाहिले. वाड्याचा जोता, खांबाच्या खालील दगडी बांधकामसुस्थितीत आढळून येते. त्यानंतर तसेच पुढे गेल्यावर छोटा नागेश्वर, नागेश्वर कडायांचे रौद्ररूप दृष्टीस पडते. बरेच जण वासोट्यासोबतच नागेश्वर पण करतात.लोहगडाच्या विंचू कड्याप्रमाणे याचे रूप जाणवत होते. येथून पुन्हा प्रवेशद्वाराजवळआलो. <o:p></o:p>
<p ="Msonormal" style="text-indent:.5in">बोटीतला प्रवास,पायथ्यापासूनची दोन – अडीच तासाची चाल यामुळे सर्वांनाच भूका लागल्या होत्या. मगसर्वानी एका डेरेदार झाडाखाली आपापले डबे उघडले. आमच्या मंडळींनी शेंगाच्या पोळ्याकेल्या होत्या.   सोबत  आम्रखंड, नेहमीचेच ठेपले, भुर्जी या पदार्थांनीजेवणात जान आणली. सोबत द्रुमनने आणलेल्या नुडल्स होत्याच. काही वेळ गप्पा गोष्टीकरत ग्रुप फोटो काढून झाल्यावर उतरण्यास सुरुवात केली.सिंहगड उतरताना तन्वीच्यामनात असलेली भीती मला जाणवली होती, त्यामुळे वासोटा उतरताना तिच्या मागे लागूनतीला जवळजवळ पळवतच खाली आणलं. एकदा भीती मनात बसली की स्वतःच्या पायावरचा Confidenceकमी होतो आणि पाय लचकणे असे प्रकार वाढतात. राधासह सगळेच अगदी वेळेत खाली उतरलो.लगेचच लिंबू सरबत रिचवून बोटीतून उलट प्रवासाला लागलो. काही तांत्रिक कारणामुळेआमचे बोटवाले काका बदलले आणि वेगात लगेच फरक पडला. आता आमचा रमत गमत गानमय प्रवासचालू झाला होता. गाण्याच्या भेंड्या खेळायच्या ठरल्या. मी, नॅनो, लादे, कुशल,तन्वी, ऋषिकेश, भारती आणि सोनल मुख्य भिडू होतो. रेकत, ओरडत, तऱ्हेतऱ्हेचे हातवारेकरत गाणी म्हणणे चालू झाले. आजूबाजूच्या बोटवाल्यांचे छान मनोरंजन होत होते. काहीवेळात एका दुसऱ्याच बोटवरच्या माणसांशी आम्ही भेंड्या सुरु केल्या. सूर्यास्ताचीवेळ, जीवाभावाची माणसं, सदाबहार गाणी यामुळे सायंकाळ सुरेख जमून आली होती. <o:p></o:p>
<p ="Msonormal" style="text-indent:.5in">बामणोली मध्येआल्यावर गावातच मंदिरात सगळे आडवे झाले. आदित्यने ट्रेकक्षितीज संस्थेची माहितीसविस्तर दिली. शेजारच्याच घरात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रो कबड्डीचासामना बघत बघत पोटात घास कधी उतरले समजलंच नाही. शेजारीच असलेल्या विस्तीर्णजलाशयामुळे हवेत गारवा जाणवत होता.काही वेळातच एक छानसा फेरफटका मारून येऊनस्लीपिंग बॅग मध्ये गुडूप झालो.<o:p></o:p>
<p ="Msonormal" style="text-indent:.5in">मी सहाचा गजर लावलाहोता पण रात्री  तीन वाजल्यापासून तसाजागाच होतो. एक ट्रेकर्सचा ग्रुप मध्यरात्री मंदिरात येऊन पहाटे आवरूनवासोट्याच्या वाटेला लागला होता. सगळे हळू हळू निद्रेतून जागे होत होते. तेवढ्यावेळात आम्ही दोघे- तिघे परसाकडे जाऊन आलो. बऱ्याच दिवसांनी मोकळ्या हवेचा आनंदघेतला. स्वच्छ हात पाय धुवून चटकदार मिसळ आणि कॉफी चा नाश्ता झाला आणि पाणी भरूनपुढच्या प्रवासाला तयार झालो. या मधल्या वेळात नॅनो आणि माझी कॉलेजमधील मैत्रीणसोनी आणि तिचा नवरा अभय यांची गाठ पडली. त्या दोघांनी पुण्याहून बेंगलोरला शिफ्टहोण्याचे ठरवले आहे असे त्यांच्या बोलण्यात आले. आम्ही दोघे अवाक् झालो. जास्त काळकाही भेटता आले नाही, आम्ही लागलीच म्हणजेच ८ वाजण्याच्या सुमारास ठोसेघरधबधब्याकडे निघालो. वाटेत घाटात सायकल मॅरेथॉन चालू होती. दरम्यान त्या सर्वसायकलपटूना प्रोत्साहन देत गाडीमध्ये दमशराज चा खेळ खेळत काही वेळातच ठोसेघर असाफलक दृष्टीस पडला. <o:p></o:p>
<p ="Msonormal" style="text-indent:.5in">सह्याद्रीमध्येआडवाटेवर बऱ्याच ठिकाणी खूप आश्चर्ये दडलेली आहेत. त्यापैकीच हा एक विशाल असाधबधबा. रस्त्यावरून जाणवणार सुद्धा नाही की या डोंगराच्या पोटात हा दुधाचा प्रवाहलपलेला आहे. मोठा आणि छोटा धबधबा असे दोन धबधबे येथे पाहायला मिळतात. छोटा धबधबा,त्याच्या समोरील हिरवाशार डोह, त्यातील नितळ पाणी, त्यालाच मागे लागून असलेलीलहानशी गुहा आणि त्या गुहेतून दिसणारा तो जलप्रपात...असं वातावरण स्वर्गातचपाहायला मिळेल. सारंकाही डोळ्यात सामावून घेतलं आणि शेंद्रे फाट्यावरून आमच्यापुढील स्थानाकडे म्हणजेच कल्याणगडाकडे निघालो. <o:p></o:p>
<p ="Msonormal" style="text-indent:.5in">वढे फाट्यावरसर्वांसाठी शक्तिवर्धकआणि पौष्टिक  केळी आम्हीसोबत घेतली. इथून काही वेळातच नंदगिरीचा किल्ला म्हणजेच कल्याणगड दिसू लागला.  परंतु गडाजवळ गेल्यावर तो रस्ता आमच्यागाडीसाठी योग्य नसल्याचे लक्षात आले. त्या हमरस्त्याच्या बाजूलाच असणाऱ्या जैनस्थानकात चौकशी करून, विचार विनिमय करून लीडरने वर न जाण्याचा निर्णय घेतला. चालतजरी त्या रस्त्याने गेलो तरी बराच वेळ लागणार होता, सबब संस्थेच्या संकेतस्थळावरीलमाहितीनुसार लगतच असलेल्या न्यू कल्याणगड फार्म या धाब्यावर जेवणासाठी थांबलो. <o:p></o:p>
<p ="Msonormal" style="text-indent:.5in">बाहेरून धाबा यथातथाचवाटत होता. त्यामुळे उतरून जरा चौकशी केली. जेवण वेळेत मिळू शकेल अशी खात्रीवाटल्याने व्हेजवाले आणि नॉनव्हेजवाले या प्रकारानुसार स्थानापन्न झालो. सुरुवातीलापापड, पाया सूप वेळेत आले परंतू बऱ्याच प्रतीक्षेनंतर चिकन थाळी समोर प्रकटली.मधल्या वेळेत द्रुमन सरांनी Watermelon या खेळाने सर्वांचे मनोरंजन केले. ही चिकनथाळी पुण्यातील आजपर्यंत खालेल्ल्या कोणत्याही थाळीच्या तोंडात मारेल अशी होती.  पांढरा,तांबडा रस्सासगळंच जमून आलं होतं.पुढच्या काही दिवसातच फक्त कल्याणगड आणि या जेवणासाठी एक Bike Ride करायची असं मीआणि आदित्य गोखले याने मनोमन ठरवले. <o:p></o:p>
<p ="Msonormal" style="text-indent:.5in">जेवणं आटोपल्यावर जराआतल्या रस्त्याने उसाच्या बैलगाड्यांचा पाठलाग करत भुईंज जवळ राजरस्त्याला लागलो. प्रथेप्रमाणेसर्वांचे अभिप्राय घेतले गेले. कल्याणगड पाहता न आल्याची खंत वगळता ट्रेकसर्वांनाच आवडला होता. खंबाटकी आणि कात्रजच्या बोगद्यातून दंगा करत वडगाव पुलाजवळपुण्यात उतरलो. कैलासगड केल्यानंतर जवळजवळ तीन महिन्यांनी ट्रेक छान झाला आणिआमच्या मंडळींनी न दमता, न थकता तो पूर्ण केला. <o:p></o:p>