India trekking forum - Sahyadri : Caves in Sahyadri
  <ttl>30</ttl>
    <![CDATA[Author: amitsamant
Subject: भंडारा डोंगर
Posted: 29 Nov 2014 at 11:16am
भंडारा लेणी (भंडारा डोंगर)
लेण्यांचा प्रकार :- बौध्द लेणी
जिल्हा : पुणे  श्रेणी : मध्यम
      देहु गावापासून दुरवर असलेल्या भंडारा डोंगरावर तुकाराम महाराज येउन बसत आणि इश्वराच्या भजन किर्तनात रंगुन जात. तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या डोंगरावर आता तुकाराम महाराजांचे मंदिर बांधलेले आहे. डोंगरावर जाण्यासाठी चार पदरी रस्ता झाल्याने वर्षभर वारकरी आणि पर्यटकांचा डोंगरावर राबता असतो. 
<span ="Apple-tab-span" style="white-space:pre">	या डोंगरच्या मागच्या बाजूस उतरण्यासाठी एक पायवाट आहे. या पायवाटेने १० मिनिटे खाली उतरुन गेल्यावर आपल्याला कातळात कोरलेली गुहा दिसते. ्या गुहेत वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी वास्तव्यास असतात. या गुहेसमोरच पाण्याचे एक कुंड आहे. गुहेच्या वरच्या बाजूला एक स्तुप आहे. लेण्याचे छप्पर कोसळल्यामुळे हा स्तुप उघडा पडलेला आहे. स्तुपावर किंवा इतर कुठेही गौतम बुध्दाची प्रतिमा दिसत नाही. त्यामुळे ही लेणी हिनयान कालिन असावी. याशिवाय येथे एक दोनन अर्धवट खोदलेल्या गुहा पाहायला मिळतात. 
जाण्याचा मार्ग :-  पुणे - नगर रस्त्यावर तळेगाव पासून ७ किमी अंतरावर भंडारा डोंगरावर जाणारा पक्का रस्ता आहे. या रस्त्याने  डोंगरावर गेल्यावर रस्त्याच्या विरुध्द बाजूस एक पायवाट खाली उतरते. (ही पायवाट चटकन सापडत नाही त्यामुळे मंदिरातील वारकरी किण्वा दुकानदारांना विचारावे). या मळलेल्या पायवाटेने १० मिनिटे खाली उतरल्यावर आपण प्राचिन बौध्द गुंफ़ेपाशी पोहोचतो.
आजुबाजूची पाहाण्याची ठिकाणे :-  मुंबई आणि पुण्यापासून भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर व इंदुरीचा किल्ला ही तिनही ठिकाण एका दिवसात पाहाता येतात.
तुकाराम महाराज, देहू, तळेगाव जवळची पाहाण्याची ठिकाणे, पुण्या जवळची पाहाण्याची ठिकाणे.
Tukaram Maharaj, Dehu,  Talegaon, Chakan, Pune
Edited by amitsamant - 29 Nov 2014 at 11:39am]]>
    <![CDATA[Author: amitsamant
Subject: भामगिरी / भांबगिरी /
Posted: 29 Nov 2014 at 11:14am
भामगिरीची लेणी (भामचंद्र डोंगर)
लेण्यांचा प्रकार :- हिंदु (ब्राम्हणी) लेणी
जिल्हा : पुणे  <span ="apple-tab-span"="" style="white-space:pre">	श्रेणी : मध्यम
<span ="apple-tab-span"="" style="white-space:pre">		पुणे जिल्ह्यात तळेगाव व चाकणच्या मधे भामगिरी डोंगररांग पूर्व पश्चिम पसरलेली आहे. या डोंगर रांगेच्या पश्चिमेला गेलेल्या फाट्याला त्याच्या तळाला असलेल्या नवलाख उंबरे नावाच्या गावामुळे नवलाख्या डोंगर असे नाव मिळालेले आहे. भामगिरी डोंगर दोन भागात विभागलेला आहे. पायथ्यापासून अर्ध्या उंची पर्यंत गच्च झाडी आहे. त्यावरील भागात डोंगराने अंदाजे ८०० फूटी कातळ टोपी घातलेली आहे. या कातळात नैसर्गिक आणि कोरीव गुहा आहेत.
<span ="Apple-tab-span" style="white-space:pre">	 भामगिरीच्या पायथ्यापासून मळलेल्या वाटेने दाट झाडीतून अर्ध्या तासात आपण सपाटीवर येतो. येथे एक काळ्या दगडात बांधलेला समाधीचा चौथरा आहे. येथून १० मिनिटात आपण कातळ कड्यापाशी पोहोचतो. येथे थोड्याश्या उंचीवर कातळात खोदलेल टाक आहे. टाक्याच्या पुढे गुहा मंदिर आहे. कातळात कोरून काढलेल्या या मंदिराचे सभामंडप व गाभारा असे दोन भाग आहेत. सभामंडप चार दगडी खांबांवर तोललेला आहे. सभामंडपात नंदीची मूर्ती आहे. सभामंडपाला लागूनच पाण्याच टाक खोदलेल आहे. गाभार्‍याच्या व्दारपट्टीवर गणपती कोरलेला आहे. गाभार्‍या शिवलींग व पार्वतीची मुर्ती आहे. छतावर नक्षीकाम केलेल आहे. मंदिर पाहून पुढे गेल्यावर कातळात कोरलेल अजून एक टाक पहायला मिळत, टाक्याच्या वरच्या बाजूला गुहा आहे. या गुहेत वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणारी काही मुले रहातात.  गुहेच्या पुढे एका झाडाखाली काही मुर्ती ठेवलेल्या आहेत. या झाडाजवळून एक  पायवाट खालच्या बाजूला जाते. येथे एक पाण्याच टाक व गुहा आहे. ती पाहून परत झाडाजवळ येऊन कातळ भिंतीत कोरलेल्या पायर्‍यांनी तुकाराम महाराजांच्या ध्यान गुंफेकडे जावे. 
<span ="Apple-tab-span" style="white-space:pre">	तुकाराम महाराजांच्या ध्यान गुंफेपाशी भामगिरी डोंगराचा कातळकडा काटकोनात वळलेला आहे. गुहेच्या पायथ्याशी शिलालेख कोरलेला दगड पडलेला आहे. त्याच्या बाजूला दगडात कोरलेली गणपतीची मुर्ती आहे. गुहेची अंदाजे उंची ६ फूट असून ती आतल्या बाजूस उतरती आहे. गुहेची लांबी अंदाजे १० फूट व रूंदी ६ फूट आहे. गुहेत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूच्या भिंतीवर तुकाराम महाराजांची मुर्ती कोरलेली आहे. त्यांच्या हातावर विंचू व पाठीमागे साप व वाघ कोरलेले आहेत. गुहेच्या टोकाशी विठ्ठल रखुमाईची मुर्ती आहे. या गुहेच्या बाजूला ३ फूट उंच व ६ फूट लांब गुहा आहे. या गुहेत एक माणूस आरामात झोपू शकेल अशी जागा आहे.
 भामगिरीवर जाण्याचा मार्ग :-  पुणे - नगर रस्त्यावर तळेगाव पासून ११ किमी अंतरावर खालुंब्रे गाव आहे. या गावातून डाव्या बाजूचा रस्ता चाकण एम. आय. डी. सी. फेज - २ ला जातो. या रस्त्याने हुंडाईचा प्लांट - सावरदरी गाव यामार्गे ५ किमीवरील वसुली नाक्यावर पोहोचतो (वसुली हे गावाचे नाव आहे.). येथे डाव्या बाजूला शिंद, भांबुर्ले गावाकडे जाणारा रस्ता पकडावा. नाक्यापासून भांबुर्ले १.५ किमीवर आहे. भांबुर्ले गावातून उजव्या बाजूचा रस्त्याने १ किमीवरील भामचंद्र माध्यमिक विद्यालया पर्यंत जावे. येथे मुख्य रस्ता सोडून डाव्या बाजूच्या (विद्यालयाच्या बाजूने) कच्च्या रस्त्याने डोंगराच्या पायथ्यापर्यंत जाता येते. डोंगराच्या पायथ्यापासून मळलेली वाट भामगिरीवर गेलेली आहे.
Edited by amitsamant - 29 Nov 2014 at 12:02pm]]>
    <![CDATA[Author: amitsamant
Subject: जोगवा मागणारीच लेण
Posted: 03 Oct 2014 at 12:11pm
सुतोंडा किल्ल्याच्या (नायगावचा किल्ला) चोर दरवाजापासून दुसर्‍या बुरुजाखाली कातळात खोदलेली दोन लेणी पहायला मिळतात. स्थानिक लोक याला "जोगवा मागणारीच लेण" किंवा "जोगणा मांगीणीच घर" या नावाने ओळखतात. हे जैन लेण आहे. यातील पहील्या लेण्याला दोन दालन असून बाहेरच्या पडवीला दोन खांब आहेत. पहिल्या दालनाच्या व्दारपट्टीवर महावीरांची प्रतिमा कोरलेली आहे, पण ती आता बरीच पुसट झालेली आहे. पहील्या दालना मध्ये उजव्या बाजूला मांडीवर मुल असलेल्या स्त्रीची २.५ फूट उंच मुर्ती आहे. त्याच्या वरच्या बाजूला भिंतीवर महावीरांची प्रतिमा कोरलेली आहे. डाव्या बाजूला गंधर्वाची २ फूट उंचीची मूर्ती भिंतीतच कोरलेली आहे. आतील दुसरे दालन चौकोनी आहे. त्यात कोणतेही कोरीव काम किंवा मुर्ती नाही. पहील्या लेण्यापासून थोड पुढे गेल्यावर कातळात खोदलेल्या प्राचीन पायर्‍या दिसतात. या पायर्‍यांनी वर गेल्यावर दगडात कोरलेल दुसर लेण पहायला मिळत. लेण्याच्या दर्शनी भागात दोन खांब कोरलेले आहे. आत बसण्यासाठी भिंती लगत दगडी बाक कोरलेले आहेत. लेण्याच्या बाहेर पाण्याच टाक कोरलेल आहे. हे लेण पाहून परत मुळ पायवाटेवर येऊन किल्ला उतरावा. या लेण्याकडे जाणारी पायवाट मळलेली नाही, तसेच बर्‍याच स्थानिक लोकांनाही या लेण्याचा नक्की ठाव ठिकाणा माहीत नाही . गावातून माहीतगार वाटाड्या घेतल्यासच हे लेण सापडू शकेल. 
याशिवाय सुतोंडा किल्ल्यावर २ लेणी आहेत. पण त्यात कुठल्याही मुर्ती नाहीत. सुतोंडा किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे.
जाण्यासाठी :- स्वत:चे वहान असल्यास औरंगाबादहून ३ मार्गांनी सुतोंडा गडावर जाता येते :-
१) औरंगाबाद - चाळीसगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६३ किमी अंतरावर कन्नड गाव आहे. कन्नडहून एक रस्ता फर्दापूरला जातो .या रस्त्यावर कन्नड पासून ५० किमी वर बनोटी गाव आहे. बनोटी गावातून एक रस्ता ३ किमीवरील नायगाव गावात जातो. नायगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.
२) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर - चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. सोयगाव ते बनोटी अंतर २५ किमी आहे. बनोटी गावातून एक रस्ता ३ किमीवरील नायगाव गावात जातो. नायगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.
३) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६५ किमी अंतरावर सिल्लोड गाव आहे.सिल्लोडहून एक रस्ता ३१ किमी वरील घाटनांद्रा गावाकडे जातो. घाटनांद्राहून १३ किमीवर तिडका नावच गाव आहे. हे गाव फर्दापूर - चाळीसगाव रस्त्यावर आहे. तिडका गावातून ३ किमीवर बनोटी गाव आहे. बनोटी गावातून एक रस्ता ३ किमीवरील नायगाव गावात जातो. नायगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.
नायगाव गावातून बाहेर पडल्यावर आईमाईच्या टेकाडाला वळसा घालून आपण किल्ल्याकडे जातो. या टेकाडावर आईमाईची घुमटी आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर वरच्या बाजूला चोर दरवाजा दिसतो. पायथ्यापासून किल्ल्यावर जाण्यासाठी २ मार्ग आहेत. पहिल्या मार्गाने आपण चोर दरवाजाने किल्ल्यात प्रवेश करतो. हा मार्ग खड्या चढणीचा आहे. या मार्गाने किल्ल्यावर चढून जाण्यासाठी ३० मिनिटे लागतात. चोर दरवाजापासून दुसर्‍या बुरुजाखाली साधारणपणे किल्ल्याच्या अर्धा उंचीवर डाव्या बाजूची पायवाट पकडावी व तटबंदीला समांतर चालत रहावे. ५ मिनिटात कातळात कोरलेल्या पायर्‍या दिसतात. त्या लेण्यांपाशी घेऊन जातात.
गावातून माहीतगार वाटाड्या घेतल्यासच हे लेण सापडू शकेल. 
सुतोंडा किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे.
आजूबाजूची पहाण्याची ठिकाणे :- सुतोंडा किल्ला, अंतुर किल्ला,
Sutonda, Sutonda Fort, Naigaon Fort, Naigaoncha killa, Antur, Forts in Aurangabad, Caves in Aurangabad
Edited by amitsamant - 30 Jul 2015 at 3:59pm]]>
    <![CDATA[Author: amitsamant
Subject: त्रिंगलवाडीची लेण
Posted: 02 Oct 2014 at 11:51pm
नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी जवळ असलेल्या त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी आणि किल्ल्यावर जैन लेणी आहेत. जैनांनी महाराष्ट्रात आठव्या शतकात लेणी बांधायला सुरुवात केली. त्यातील वेरूळ, त्रिंगलवाडी, मांगी तुंगी ही लेणी प्रसिध्द आहेत्रिंगलवाडी परीसरात दहाव्या शतकात खोदलेली ८ लेणी असुन त्यातील ६ लेणी किल्ल्याच्या पायथ्याला व २ लेणी किल्ल्यावर आहेत.
पायथ्याजवळचे मुख्य लेण्याचे व्हरांडा, सभामंडप  आणि गाभारा असे तीन भाग आहेत. व्हरांडा लांबलचक असुन त्याच्या दारासमोरील छतावर हातात हात गुंफलेल्या गणांचे अप्रतिम शिल्प कोरलेले आहे. तर उजव्या बाजूला मोठे फ़ुल कोरलेले आहे. छताला आधार देण्यासाठी २ खांब कोरलेले आहेत. त्यावर यक्ष कोरलेले आहेत. व्हरांड्याच्या छताला आधार देणार्‍या तुळ्याही कोरलेल्या आहेत. त्यावर कमळाच्या फ़ुलांची नक्षी व मध्यभागी व्याल कोरलेला आहे. 
सभामंडपाच्या प्रवेशव्दाराच्या दोनही बाजूस नक्षी कोरलेली आहे. व्दारपट्टीवर २ चौकटी आहेत त्यात तिर्थंकरांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. प्रवेशव्दाराच्या उंबरठ्या खाली गण कोरलेले आहेत. लेण्यांचा सभामंडप प्रशस्त आहे. सभामंडप ४ खांबांवर तोललेला असून त्यापैकी फ़क्त एकच खांब आता उरलेला आहे. खांबावर सुंदर नक्षी आहे. सभामंडपात हवा आणि उजेड येण्यासाठी ९ चौकोनी झरोके असलेल्या २ खिडक्या कोरलेल्या आहेत. गाभार्‍याच्या प्रवेशव्दारावर नक्षी कोरलेली आहे. गाभार्‍यात वृषभनाथांची पद्मासनात बसलेली मुर्ती आहे. गडावर २ लेणी आहेत पण ती भग्ना अवस्थेत आहेत.
आजुबाजुची पाहाण्याची ठिकाणे :- त्रिंगलवाडी किल्ला , त्रिंगलवाडी धरण
जाण्यासाठी :- गाडीने किंवा रेल्वेने इगतपुरी गाठावे. 
 रेल्वेने :- इगतपुरीच्या पूर्वेकडे म्हणजेच एसटी स्टँडच्या बाजूला बाहेर पडावे. एसटी स्थानकाच्या अलीकडे आंबेडकर चौक लागतो. या चौकातून एक वाट वर जाते. या वाटेने पुढे पंधरा मिनिटे चालत गेल्यावर उजवीकडे वळावे. अर्ध्या तासात आपण वाघोली नावाच्या खिंडीत पोहोचतो. खिंडीतून खाली उतरल्यावर आपण त्रिंगलवाडी नाक्यावर पोहोचतो. येथून डावीकडे (त्रिंगलवाडी गावाकडे) वळावे. अर्ध्या तासात आपण त्रिंगलवाडी गावात पोहोचतो. त्रिंगलवाडी गावापर्यंत इगतपुरी -घोटी -त्रिंगलवाडी अशी जीपसेवा देखील उपलब्ध आहे. गावाच्या मागे त्रिंगलवाडी धरण आहे. धरणाच्या भिंतीवर चढून डावीकडे वळावे. भिंत संपल्यानंतर उजवीकडची वाट पकडावी. या वाटेने अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. पायथ्याशीच पांडवलेणी नावाची गुहा आहे. 
रस्त्याने :- कसारा घाट चढून इगतपूरीच्या पुढे ९ किमीवर टाके गाव लागते. या गावातून रस्ता त्रिंगलवाडी - पत्र्याचीवाडी मार्गे तळ्याची वाडी या त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याच्या गावापर्यंत जातो. टाके गावापासून हे अंतर अंदाजे ८ किमी आहे. तळ्याचीवाडी गावामागे तलाव आहे. तलावाच्या बाजूने वाट शेताच्या बांधावरुन किल्ल्याच्या पायथ्याच्या लेण्यांपर्यंत जाते.
या गुहेवरून गडावर जाण्यास रस्ता आहे. गड चढण्यास अर्धा तास लागतो. त्रिंगलवाडी किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे.
Tringalwadi Fort, Tringalwadi Caves, Tringalwadi Dam, Caves in Maharashtra, Jain Leni, Jain Caves, Facinating spots near Igatpuri 
Edited by amitsamant - 30 Jul 2015 at 4:01pm]]>
    <![CDATA[Author: amitsamant
Subject: गणपती गडद ( पळु सोना
Posted: 02 Sep 2014 at 8:12pm
गणपती गडद (पळु सोनावळे लेणी)
<span ="apple-tab-span"="" style="white-space:pre">	प्राचीन काळी कल्याण - मुरबाड - वैशाखरे - नाणेघाट  असा  व्यापारी मार्ग होता. छोट्या गलबतातून कल्याण बंदरात उतरणारा माल या व्यापारी मार्गाने घाटावरील बाजारपेठात जात असे. या व्यापारी मार्गावर माळशेजच्या डोंगररांगेत पळु सोनावळे गावाजवळील डोंगरात हिंदु लेणी कोरलेली आहेत.या लेण्यांच्या संकुलात १२ लेणी आहेत. यातील मुख्य लेण दुमजली असुन त्याच्या व्दारपट्टीवर गणेश प्रतिमा कोरलेली आहे. यावरुन या लेण्यांना गणपती गडद अस नाव पडल आहे.
<span ="apple-tab-span"="" style="white-space:pre">	मुख्य लेण्याचा सभामंडप २१ मीटर x १० मीटर असुन तो दोन कोरीव खांबांवर उभा आहे. खांबांवर छताचा भार तोलणारे यक्ष कोरलेले आहेत. याशिवाय किर्तीमुख, सुरसुंदरी आणि काही अस्पष्ट मुर्ती आणि नक्षी खांबावर कोरलेली आहे. गाभार्‍याच्या दोन बाजुला १० मीटर x ७ मीटर दोन खोल्या (कक्ष) असुन त्या रिकाम्या आहेत. गाभार्‍यात हल्लीच्या काळात बसवलेल्या मुर्ती आहेत. गाभार्‍याच्या मागील भिंतीत एक खिडकी कोरलेली असुन आत एक दालन कोरलेले आहे, त्याच प्रयोजन मात्र कळत नाही.
<span ="apple-tab-span"="" style="white-space:pre">	लेण्यांच्या परीसरात पाण्याची ३ टाकी आहेत. त्यातील एका टाक्याच्या वरच्या बाजुस कातळात खाचा बनवलेल्या आहेत. टाक्यातील पाण्याचे बाष्पीभवन होउ नये म्हणुन या खाचांमधे लाकडी पट्ट्या आडव्या टाकुन त्यावर आच्छादन केले जात असे. पावसाळ्यात मुख्य गुहे समोरुन एक धबधबा पडतो. त्यात १८० फुटाचे रॅपलींग केले जाते.
<span ="apple-tab-span"="" style="white-space:pre">	पायथ्याच्या पळु गावाबद्दल एक दंतकथा आहे. या गावात मोरे आडनावाची माणस मोठ्या प्रमाणात राहातात. हे सर्व जावळीच्या चंद्रराव मोर्‍यांचे वंशज आहेत. शिवाजी महाराजांनी जावळीवर हल्ला करुन चंद्रराव मोरेचा पराभव केला. त्यावेळी तिथुन पळुन आलेले मोर्‍यांचे लोक त्याकाळच्या मुघल साम्राज्यातील सोनावळे गावात स्थायिक झाले. त्यामुळे या गावाला पळु सोनावळे (पळुन आलेल्या मोर्‍यांमुळे "पळु") असे नाव पडले.
जाण्यासाठी :- १) कल्याण - माळशेज मार्गावर (४७ किमी) उमरोली गावाच्या पुढे फाटा आहे. या फाट्यावरुन उजव्या बाजुचा रस्ता धसई मार्गे (१० किमी) सोनावळे गावात जातो. 
२) कल्याण - माळशेज मार्गावर (५० किमी) टोकावडे गावाच्या पुढे फाटा आहे. या फाट्यावरुन उजव्या बाजुचा रस्ता वडगाव मार्गे (१० किमी) सोनावळे गावात जातो. 
सोनावळे गावामागील डोंगरात गणपती गडद लेणी आहेत. गावातुन लेण्यांपर्यंत पोचायला दिड ते दोन तास लागतात. शेवटच्या टप्प्यात अर्ध्या तासाचा खडा चढ चढावा लागतो. येथील टाक्यात पावसाळ्या नंतर पाणी नसते.
आजुबाजुची पाहाण्याची ठिकाणे :- नाणेघाट, माळशेज घाट, अहुपे घाट , भैरवगड (मोरोशी).
Palu Sonawale Caves, Ganpati Gadad, Ganesh Gadad
Caves in Maharashtra, Fasinating spots near Malshej
Water fall rapling near Malshej, ganpati gadad water fall rapling
Mansoon Treking, Naneghat 
Edited by amitsamant - 03 Sep 2014 at 11:55am]]>
    <![CDATA[Author: amitsamant
Subject: कन्हेरगड लेणी
Posted: 21 Aug 2014 at 6:46pm
कन्हेर गडाखाली 3 लेणी आहेत.
१) नागार्जुन कोठी लेणी :- ही जैन लेणी असुन लेण्याच्या बाहेर विजयस्तंभ कोरलेला आहे. स्थानिक लोक याला सतीचा खांब म्हणतात. मुल होण्यासाठी या खांबाला नवस बोलला जातो.  या लेण्याचे  व्हरांडा व आतली सभामंडप असे दोन भाग आहेत. व्हरांडा १८ ' x ६'  असुन तो चार खांबावर तोललेला आहे. व्हरांड्याच्या उजव्या बाजूला बाकं असलेली बैठकीची खोली आहे. सभामंडपाच्या व्दारपट्टीवर तिर्थंकर कोरलेले आहेत. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला दोन हत्तींची मस्तक कोरलेली आहेत. 
<span style="white-space: pre;" ="apple-tab-span"="">	सभामंडप २०’ x १८ ' असुन तो दोन खांबांवर तोललेला आहे. या खांबांवर अंबा व इंद्र यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. सभामंडपाच्या दर्शनी भिंतीवर कमळावर पद्मासनात बसलेल्या महावीरांची प्रतिमा कोरलेली आहे. त्यांच्या मस्तकावर मकर व चक्र कोरलेले आहे. महावीरांच्या बाजुला दोन दिगंबर मुर्ती कोरलेल्या आहेत. वरच्या बाजुस दोन चवरी ढाळणारे सेवक कोरलेले आहेत.  सोबत गंधर्व, सेविका कोरलेल्या आहेत. गुहेच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर गोमटेश्वराची ४ फूटी मूर्ती कोरलेली आहे. त्याच्या बाजूला ४ तिर्थंकर कोरलेले आहेत. 
<span style="white-space: pre;" ="apple-tab-span"="">	गुहेच्या उजव्या बाजूला वरच्या अंगाला पाण्याच टाक आहे. त्याच्या खालून पायवाटेने सरळ (डोंगर डाव्या बाजूला व दरी उजव्या बाजूला ठेवत) पुढे चालत गेल्यावर २ मिनिटात आपण सीता न्हाणी या लेण्यांपाशी पोहोचतो. 
2) सीता न्हाणी :- प्रभु रामचंद्र वनवासाला आले तेव्हा त्यांचा इथे मुक्काम केला होता अशी दंतकथा आहे. ही हिंदु लेणी असुन त्याचे व्हरांडा व सभामंडप असे दोन भाग आहेत. व्हरांडा १८'x ४' असुन तो दोन खांबांवर तोललेला आहे. खांबावर कधीकाळी काढलेली नक्षी आज अस्पष्ट झालेली आहे.  सभा मंडप २४' x १३' असुन तो दोन खांबांवर तोललेला आहे. सभामंडपात कुठलीही मुर्ती अथवा कोरीवकाम आढळत नाही.
लेण्याकडे तोंड करुन उभे राहील्यास उजव्या बाजुस जाणार्‍या पाउलवाटेच्या वरच्या बाजुस कातळात कोरलेल पाण्याच टाक आहे. 
3) शृंगार चावडी लेणी :- कन्हेरगडा खालील सर्वात सुंदर लेणी म्हणजे शृंगार चावडी लेणी. ही हिंदु लेणी अकराव्या शतकात कोरलेली आहेत. त्याचे व्हरांडा व सभामंडप असे दोन भाग आहेत. व्हरांडा इंग्रजी 'L" आकाराचा असुन तो चार खांबांवर तोललेला आहे. खांबावर सुंदर नक्षीकाम केलेल आहे.या खांबावरील शिल्पपटात काही शृंगार शिल्प कोरल्यामुळे या लेण्याला शृंगार चावडी लेणी नाव पडल असाव. सभामंडपाच्या व्दारपट्टीवर सुंदर नक्षीकाम केलेल आहे. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला दोन फूलं कोरलेली आहेत. लेण्यातील सभा मंडप   ७' x १०' असुन तो दोन खांबांवर तोललेला आहे. सभामंडपात कुठलीही मुर्ती अथवा कोरीवकाम आढळत नाही. 
लेण्याच्या अलिकडे पायवाटेच्या बाजूला एक पाण्याच टाक खोदलेल आहे.
जाण्यासाठी :- जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव हे महत्वाचे शहर रेल्वेने व रस्त्याने सर्व महत्वाच्या शहरांशी जोडलेले आहे. चाळीसगाव पासून १८ किमी अंतरावर पाटणादेवीचे प्रसिध्द मंदिर आहे. पाटणादेवीचे मंदिर व कन्हेरगड गौताळा अभयारण्यात आहे. अभयारण्याचे गेट सकाळी ६.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत उघडे असते. चाळीसगावातून सकाळी ६.०० पासून दर अर्ध्या तासाने पाटणादेवीला जाण्यासाठी एसटीची बससेवा आहे. त्याशिवाय चाळीसगावातून पाटणादेवीला जाण्यासाठी ६ आसनी रिक्षापण उपलब्ध आहेत. अभयारण्यापासून पाटणादेवी मंदिरापर्यंत जाणार्‍या रस्त्यावर अभयारण्याच्या गेटपासून १.५ किमी अंतरावर (पाटणा गावाच्या पुढे) महादेव मंदिर अशी पाटी आहे. या मंदिराच्या मागेच कन्हेरगड आहे. रस्त्यावरून उजव्या बाजूला वळून ५ मिनिटात आपण पूरातन हेमाडपंथी महादेव मंदिरापाशी पोहोचतो.
मंदिराच्या बाजूने (मंदिर उजव्या बाजूला ठेऊन) जाणार्‍या पायवाटेने मंदिराच्या मागे जावे. थोडे अंतर चालल्यावर पायवाट डावीकडे वळावे. पुढे सरळ जाणारी पायवाट सोडून उजवीकडे जाणारी पायवाट पकडावी. येथे सिमेंटमध्ये बांधलेली एक छत्री (समाधी) आहे. ही समाधी ओलांडली की आपण कन्हेरगडाच्या पायथ्याशी पोहोचतो. मंदिरापासून गड पायथ्याला जाण्यास १० मिनिटे लागतात.
<span style="white-space: pre;" ="apple-tab-span"="">	कन्हेरगडाचा डोंगर आग्नेय - वायव्य ( South East  - North West) पसरलेला आहे. या डोंगरावरील कातळ टोपीखाली नागार्जून कोठडी, सीता न्हाणी व शृंगार चावडी ही ३ लेणी खोदलेली आहेत. ती पाहून गडावर जाण्यासाठी प्रथम डोंगराच्या पायथ्याच्या समाधी पासून डोंगरावर चढणार्‍या पायवाटेने ५ मिनिटांचा खडा चढ चढून जावे. येथे आपल्याला आडवी जाणारी पायवाट मिळते. या वाटेवर डाव्या बाजूला वळावे, (डोंगर उजव्या बाजूला व दरी डाव्या बाजूला) २ मिनिटे सरळ चालल्यावर उजव्या बाजूला डोंगरावर चढणारी पायवाट दिसते. या वाटेवर सिमेंटने बांधलेल्या काही पायर्‍या आहेत. ५ मिनिटांचा खडा चढ चढून गेल्यावर पायवाट उजवीकडे वळते (डोंगर डाव्या बाजूला व दरी उजव्या बाजूला) आपण या वाटेने २ मिनिटात नागार्जून कोठडी लेण्यांपाशी पोहोचतो. नागार्जून कोठी लेण्यांखालून पायवाटेने सरळ (डोंगर डाव्या बाजूला व दरी उजव्या बाजूला ठेवत) पुढे चालत गेल्यावर २ मिनिटात आपण सीता न्हाणी या लेण्यांपाशी पोहोचतो. 
सीता न्हाणी लेणी पाहून पायवाटेने ५ मिनिटे चालत गेल्यावर आपण डोंगराच्या वायव्य (North West) टोकाकडे पोहोचतो. येथे डाव्या बाजूला २०-२५ फूटी कातळ कडा (रॉक पॅच) दिसतो, तो चढून गेल्यावर आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. खालच्या पाटणा गावातून येणारी ठळक पायवाट  या ठिकाणी येऊन मिळते. पाटणा गावातील लोक याच वाटेने गडावर किंवा पलिकडच्या गावात जातात. या कड्याजवळ आल्याची दुसरी खूण म्हणजे येथून खालच्या जंगलात वन खात्याने बांधलेला वॉच टॉवर उठून दिसतो. 
प्रथम गडावर न जाता राहीलेले तिसर लेण म्हणजे "शृंगार चावडी लेणी" प्रथम पाहून घ्यावी. त्यासाठी (रॉक पॅच) खालून जाणार्‍या पायवाटेने डोंगराला वळसा घालुन सरळ चालत जावे. ५ मिनिटात आपण २ डोंगरांमधील घळीत पोहोचतो. या घळीत असलेला ओढा ओलांडून डाव्या बाजूस थोडेसे वर चढून गेल्यावर कातळात कोरलेल्या ४-५ पायर्‍या लागतात. पायर्‍या संपल्यावर पाण्याचे टाक व त्यामागिल शृंगार चावडी लेणी दिसतात. 
आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- पाटणादेवी मंदिर, महादेव मंदिर, (दोन्ही मंदिरांची माहिती साईट्वरील प्राचीन मंदिर या सेक्शनमधे दिलेली आहे.) कन्हेरगड (साईटवर माहिती दिलेली आहे.) 
Kanhergad, Chalisgaon, Patanadevi Mandir, Patanadevi temple, Mahadev Temple. Gautala Sanctuary,
 Places around Chalisgaon, Places in Gautala Sanctuary
Edited by amitsamant - 30 Jul 2015 at 4:10pm]]>
    <![CDATA[Author: harshalmahajan
Subject: Caves of India - Index
Posted: 02 May 2014 at 9:51pm
<p ="Msonormal" style="margin-bottom: 0.0001pt; line-height: normal; -: initial; -: initial; -size: initial; -repeat: initial; -attachment: initial; -origin: initial; -clip: initial;">   १. लेण्यांचा इतिहास<o:p></o:p>
<p ="Msonormal" style="margin-bottom: 0.0001pt; line-height: normal; -: initial; -: initial; -size: initial; -repeat: initial; -attachment: initial; -origin: initial; -clip: initial;">   2. बौध्द लेणी<o:p></o:p>
<p ="Msonormal" style="margin-bottom: 0.0001pt; line-height: normal; -: initial; -: initial; -size: initial; -repeat: initial; -attachment: initial; -origin: initial; -clip: initial;">   ३. चैत्य लेणी<o:p></o:p>
<p ="Msonormal" style="margin-bottom: 0.0001pt; line-height: normal; -: initial; -: initial; -size: initial; -repeat: initial; -attachment: initial; -origin: initial; -clip: initial;">   ४. विहार<o:p></o:p>
<p ="Msonormal" style="margin-bottom: 0.0001pt; line-height: normal; -: initial; -: initial; -size: initial; -repeat: initial; -attachment: initial; -origin: initial; -clip: initial;">   ५.हिंदू (ब्राम्हणी)लेणी<o:p></o:p>
<p ="Msonormal" style="margin-bottom: 0.0001pt; line-height: normal; -: initial; -: initial; -size: initial; -repeat: initial; -attachment: initial; -origin: initial; -clip: initial;">   ६. हिंदू (शैव) लेणी<o:p></o:p>
<p ="Msonormal" style="margin-bottom: 0.0001pt; line-height: normal; -: initial; -: initial; -size: initial; -repeat: initial; -attachment: initial; -origin: initial; -clip: initial;">   ७.हिंदू (वैष्णव)लेणी<o:p></o:p>
<p ="Msonormal" style="margin-bottom: 0.0001pt; line-height: normal; -: initial; -: initial; -size: initial; -repeat: initial; -attachment: initial; -origin: initial; -clip: initial;">   ८.जैन लेणी <o:p></o:p>
<p ="Msonormal" style="margin-bottom: 0.0001pt; line-height: normal; -: initial; -: initial; -size: initial; -repeat: initial; -attachment: initial; -origin: initial; -clip: initial;">   ९.लेण्यातील चित्रकला<o:p></o:p>
<p ="Msonormal" style="margin-bottom: 0.0001pt; line-height: normal; -: initial; -: initial; -size: initial; -repeat: initial; -attachment: initial; -origin: initial; -clip: initial;">   १०. लेण्यातील मुर्तीकला<o:p></o:p>
<p ="Msonormal" style="margin-bottom: 0.0001pt; line-height: normal; -: initial; -: initial; -size: initial; -repeat: initial; -attachment: initial; -origin: initial; -clip: initial;">   ११. खरोसा लेणी<o:p></o:p>
<p ="Msonormal" style="margin-bottom: 0.0001pt; line-height: normal; -: initial; -: initial; -size: initial; -repeat: initial; -attachment: initial; -origin: initial; -clip: initial;">   १२. आंबेजोगाईची लेणी (हत्तीखाना)<o:p></o:p>
<p ="Msonormal" style="margin-bottom: 0.0001pt; line-height: normal; -: initial; -: initial; -size: initial; -repeat: initial; -attachment: initial; -origin: initial; -clip: initial;">    १३. कन्हेरगड लेणी<o:p></o:p>
<p ="Msonormal" style="margin-bottom: 0.0001pt; line-height: normal; -: initial; -: initial; -size: initial; -repeat: initial; -attachment: initial; -origin: initial; -clip: initial;">   १४. भंडारा लेणी (भंडाराडोंगर)<o:p></o:p>
<p ="Msonormal" style="margin-bottom: 0.0001pt; line-height: normal; -: initial; -: initial; -size: initial; -repeat: initial; -attachment: initial; -origin: initial; -clip: initial;">   १५. भामगिरीची लेणी (भामचंद्र डोंगर)<o:p></o:p>
Edited by harshalmahajan - 19 Apr 2020 at 2:17am]]>
    <![CDATA[Author: amitsamant
Subject: आंबेजोगाईची लेणी (
Posted: 01 May 2014 at 10:49am
आंबेजोगाईची लेणी (हत्तीखाना)
लेण्यांचा प्रकार :- हिंदु (ब्राम्हणी) लेणी
जिल्हा : बीड  <span ="apple-tab-span"="" style="white-space:pre">	श्रेणी : सोपी
बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई हे प्राचीन गाव तेथील योगेश्वरी देवीच मंदिर यामुळे प्रसिध्द आहे. या मंदिरा पश्चिमेस जयंती नदीच्या तीरावर हिंदू (शैव) लेणी आहेत. या लेण्यामधे असलेल्या मोठ्या हत्तीच्या शिल्पांमुळे या लेण्यांना स्थानिक लोक हत्तीखाना या नावाने ओळखतात.
लेणी ;- आंबेजोगाई येथील लेणी खडकात खोलवर खोदलेली आहेत. काळानुसार उन वारा पाऊस यामुळे या लेण्यांची झीज झालेली आहे. लेण्याचे प्रवेशव्दार दक्षिणेला असून पायर्‍या उतरून दगडात कोरलेल्या छोट्या प्रवेशव्दारातून लेण्याच्या प्रांगणात प्रवेश करता येतो. प्रवेशव्दारासमोर दोन हत्तींची भव्य शिल्प आहेत. प्रांगणात नंदीमंडप आहे. नंदिमंडपाच्या समोर लेण्याच्या दोन बाजूला दोन हत्तींची भव्य शिल्प आहेत. लेण्यात सभामंडप व गर्भगृह कोरलेल आहे. सभामंडप ३२ खांबांवर तोललेला आहे. गर्भगृहाच्या बाजूला ३ खोल्या कोरलेल्या आहेत. त्यात सप्तमातृका, शिव, महिषासूरमर्दिनी यांच्या मुर्ती आहेत. लेण्याच्या प्रांगणात एक पायर्‍यांची विहिर खोदलेली आहे.
जाण्यासाठी :- मुंबई पुण्याहून आंबेजोगाईला जाण्यासाठी एसटी बसेसची सोय आहे. रेल्वेने परभणी (९५ किमी ) किंवा परळी (२५ किमी) येथे उतरून  आंबेजोगाईला जाता येते. 
आजुबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- 
 १) मुंबई, पुण्याहून आंबेजोगाई जाण्यासाठी थेट बस सेवा आहे. आंबेजोगाई - धर्मापूरी अंतर २७ किमी आहे. खाजगी गाडीने किंवा रिक्षाने धर्मापूरीला जाता येते. वहानानेही थेट किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाता येते.
२) मुंबई, पुण्याहून लातूर एक्सप्रेसने लातूरला जावे. लातूरहून खाजगी वहानाने किंवा बसने लातूर - आंबेजोगाई हे अंतर ६५ किमी आहे. 
Ambejogai :- Dist Beed. (Yogeshwari Temple)(Yogeshwari Mandir)
Edited by amitsamant - 03 May 2014 at 11:03am]]>
    <![CDATA[Author: amitsamant
Subject: खरोसा लेणी
Posted: 30 Apr 2014 at 8:03pm
लेण्यांचा प्रकार :- हिंदु (ब्राम्हणी) लेणी
जिल्हा : लातूर<span ="apple-tab-span"="" style="white-space:pre">	श्रेणी : सोपी
बिदर महामार्गावर खरोसा गावाजवळील टेकडीवर हिंदु लेणी आहेत. हि लेणी जांभ्या दगडात कोरल्यामुळे काळानुसार उन वारा पाऊस यामुळे या लेण्यांची झीज झालेली आहे. महामार्गावरून थेट लेण्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवलेला आहे. खरोसा गावात एक पडकी गढी पहायला मिळते.
लेणी :- खरोसा येथील सर्वात मोठे लेणे दुमजली आहे. त्यात भिंतीवर शिव, विष्णू, ब्रम्हा, व्दारपाल शिवलिंग कोरलेली आहेत. दुसर लेण हे शैव लेण आहे. यात गाभार्‍यात शिवलिंग आहे. गाभार्‍याच्या दारावर व्दारपाल व नाग कोरलेले आहेत. सभामंडप अनेक खांबांवर तोललेला आहे. सभामंडपाच्या भिंतीवर शिल्प कोरलेली आहेत.
जाण्यासाठी :-
लातूर - बिदर रस्त्यावर लातूर पासून ४३ किमीवर व औसा पासून २३ किमी अंतरावर खरोसा गाव आहे. गावापुढे असलेलया टेकडीवर हिंदू लेणी आहेत. मघामार्गावरून एक पक्का रस्ता थेट डेकडीवरील लेण्यांपर्यंत जातो. 
आजुबाजूची पाहाण्याची ठिकाणे :-
१) लातूर - बिदर रस्त्यावर औसा पासून ३४ किमीवर निलंगा गावात नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. त्याची माहिती साईट्वर दिलेली आहे.
२) लातूर - औसा - उदगीर हे अंतर ९७ किमी आहे. उदगीर येथे किल्ला आहे.
३) स्वत:च्या वहानाने वरील सर्व ठिकाणे एका दिवसात पाहून लातूर/ उदगीर येथे मुक्कामाला जाता येते.
४) उदगीर किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे.
Kharosa Leni, Distric:- Latur, Taluka :- Ausa
Edited by amitsamant - 03 May 2014 at 10:50am]]>
    <![CDATA[Author: amitsamant
Subject: ७) हिंदू लेणी (वैष्ण
Posted: 12 Apr 2014 at 11:17am
<span ="apple-tab-span"="" style="white-space:pre">	हिंदू धर्मात शैव व वैष्णव हे प्रमुख पंथ होते लेण्यांवरही यांचा प्रभाव दिसून येतो ब्राम्हणी लेण्यांमधून विष्णु पुराणातल्या कथांवर आधारीत शिल्पपट कोरण्यात आले आहेत.
गोवर्धनधारी श्रीकृष्ण अवतार:- भगवान श्री विष्णूने, श्रीकृष्णरुपात असताना, गोकुळातील गाईगुरे आणि गोपाळांना इंद्राच्या कोपामुळे होणार्‍या पावसापासून वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलून धरला होता. ही पुराणकथा सांगणारे शिल्प आहे. येथे विष्णू अष्टभूज रुपात आहे विष्णूने आपल्या सर्वात वरच्या दोन्ही हातांनी पर्वत उचलून धरला आहे. एका डाव्या हातात शंख तर दुसर्‍या  हातामध्ये पद्म धरलेले आहे. एका उजव्या हातात चक्र धरलेले असून, दुसरा उजवा हात कंबरेवर ठेवलेला आहे. शिल्पपटात एका कोपर्‍यात  गायी वासरे आहेत.
क्षीरसागरातील शेषशायी विष्णू:- आपल्या शेषशय्येवर निद्रिस्त विष्णूचे हे शिल्प आहे. विष्णूच्या पायाशी देवी लक्ष्मी बसलेली आहे.नाभिकमला मध्ये ब्रह्मा आहे. विष्णूची प्रतिमा चतुर्भुज आहे. उशाशी असलेल्या लोडावर उजव्या हाताची घडी ठेऊन त्यावर श्रीविष्णूने डोके ठेवलेले आहे. पायथ्याशी मानवदेहधारी गरुड आहे. उशाजवळ पाच फण्यांचा सर्पफणा डोक्यावर असलेल्या बलरामाची मुर्ती लक्ष वेधून घेते.
गरुडारुढ विष्णू:-  दोन पंख असलेल्या मनुष्य रुपातील गरुडाच्या खांद्यावर विष्णू बसलेला आहे. विष्णू चतुर्भुज आहे. उजव्या हातात खड्‌ग आणि चक्र आहे. डाव्या हातात शंख आणि पद्म आहे.
वराह अवतार:- या शिल्पपटामध्ये विष्णू आपल्या वराह अवतारात आहे. मनुष्य देह आणि वराहाचे शिर असलेल्या विष्णूने आपल्या सुळ्यांवर भूदेवीला (पृथ्वीला) उचलून धरलेले आहे. एका डाव्या हाताने भूदेवीला धरलेले आहे. तर दुसर्‍या हातात शंख आहे. एका उजव्या हातात चक्र आहे, तर दुसरा उजवा हात कमरेवर ठेवलेला आहे उजव्या पायामागे नागदेवता हात जोडून बसलेली आहे. या नागदेवतेचे वरचे शरीर स्त्रीचे असून, खालचा देह सर्पाचा आहे. वराह मुर्तीचा उजवा पाय शेषनागाच्या हातावर टेकवला आहे. शेषनागाच्या डोक्या पाठीमागे पाच फड्यांचा फणा असून, देह पुरुषाचा व खालचे धड सर्पाचे आहे.
वामनावतार:- वामनाची मुर्ती अष्टभुज आहे. चार उजव्या हातापैकी एका हातात गदा, दुसर्‍या हातात चक्र, तिसर्‍या हातात खड्‌ग आणि चौथ्या हातात कमलपुष्प धरलेले आहे.  डाव्या हातात विविध आयुधे आहेत. एका हातात शंख, दुसर्‍या हातामध्ये धनुष्य, तिसर्‍या हातामधे ढाल आहे.
<span ="apple-tab-span"="" style="white-space:pre">	वामनाने त्रिविक्रमावतार धारण केलेला असून डावा पाय अलिधासनात वर उचललेला आहे. डाव्या बाजूला गरुड मनुष्यरुपात दाखवलेला असून, त्याने एका पुरुषाचे केस हातामध्ये घट्ट धरलेले आहेत व त्यास हात उगारुन तो मारत आहे. हा पुरुष म्हणजे असुरांचे गुरु शुक्राचार्य आहेत. उजव्या बाजूला राजा बळी आणि त्याचे सेवक दिसत आहेत.
नरसिंह अवतार:- या शिल्पपटामध्ये विष्णू नृसिंह अवतारामध्ये कोरलेला आहे. नृसिंह अष्टभुज आहे दुसर्‍या हातात चक्र, तिसर्‍यामध्ये खड्‌ग आहे. एका डाव्या हातात शंख आहेत तर दोन डाव्या हातांनी हिरण्यकश्यपूला धरुन ठेवलेले आहे.
हरिहर मुर्ती:- या शिल्पामध्ये एका बाजूला नंदी व दुसर्‍या बाजूला गरुड आहे. डाव्या हातात चक्र धरलेले आहे. उजव्या हातात त्रिशूल धरलेला आहे.
नमस्कार मुद्रेतील विष्णू:- विष्णूची ही मुर्ती चतुर्भुज आहे. एका डाव्या हातात शंख व उजव्या हातात चक्र असून, पुढील दोन्ही हात नमस्कार मुद्रेत आहेत.
विष्णू नृसिंह अवतार:- नरसिंह रुपातील विष्णूने हिरण्यकश्यपूला मांडीवर आडवा धरुन वध केला हे दर्शवणारा हा शिल्पपट आहे.
कालियामर्दन:- यमुनेच्या डोहातल्या भयंकर कालिया सर्पाला मारणार्‍या कृष्णाचे शिल्प, या शिल्पामध्ये कालिया मनुष्यरुपामध्ये दाखविलेला आहे.
विष्णू केवलमुर्ती:- विष्णू द्विभुज असून, डाव्या हातात चक्र व उजव्या हातात गदा आहे. बाजूलाच गरुड उभा असल्याचे दिसते.
Edited by amitsamant - 30 Apr 2014 at 7:16pm]]>