India trekking forum - Sahyadri : Range treks in Sahyadri
Subject: Bhorgiri to Bhimashankar
Posted: 29 Jul 2015 at 5:59pm
भोरगिरी - भिमाशंकर
भोरगिरी - भिमाशंकर - खांडस हा प्राचिन व्यापारी मार्ग होता. त्याकाळी कल्याण बंदरात उतरणारा माल ह्या मार्गाने घाटावर जात असे. भिमाशंकर पायथ्याचा खांडस बाजुचा (कोकणातला) पदरगड आणि राजगुरुनगर बाजुचा (घाटावरचा) भोरगिरी हे दोन प्राचीन किल्ले ह्या मार्गाचे रक्षण करण्यासाठी बांधलेले होते. तसच भिमाशंकर आणि भोरगिरीच कोटेश्वर मंदिर ही विश्रांती स्थान होती. भोरगिरी गावातील भिमा नदीच्या काठी असलेल प्राचीन कोटेश्वर मंदिर झंझ राजाने बांधलेल होत अस म्हणतात. आता त्याजागी नविन मंदिर उभ असल तरी पुरातन मंदिराचे अवशेष आजुबाजूला विखुरलेले पाहायला मिळतात. त्यावरुन मंदिराची कल्पना करता येते.
भिमाशंकर ते भोरगिरी हा ट्रेक मुंबईकरांना आणि पुणेकरांना खालील मार्गांनी करता येतो. अंतर ८ किमी आहे. हा ३ तासाचा सोपा ट्रेक आहे.
१) मुंबई - भोरगिरी - भिमाशंकर - खांडस - मुंबई
मुंबई - तळेगाव मार्गे -चाकण- राजगुरुनगर गाठावे. राजगुरुनगर - चास - वाडा भोरगिरी असा प्रवास करुन भोरगिरी गाठावे. (राजगुरु नगर ते भोरगिरी अंतर ५५ किमी आहे). राजगुरु नगरहुन वाडाला जाण्यासाठी बसेस आणि जीपची सोय आहे. वाडा ते भोरगिरी स्पेशल जीप करुन जावे लागते. राजगुरु नगर ते भोरगिरी स्पेशल जीप करुनही जाता येते.
मुंबईहुन बोरीवली - भोरगिरी ही बस भोरगिरीला सकाळी १०.०० वाजता पोहोचते. कल्याण - भोरगिरी ही बस भोरगिरीला दुपारी २.०० वाजता पोहोचते. दोनही बस १५ मिनिटे थांबुन परत जातात. या दोनही बस राजगुरुनगर मार्गे भोरगिरीला जातात.
भोरगिरी - भिमाशंकर अंतर ८ किमी आहे. हा ३ तासांचा सोपा ट्रेक आहे. भोरगिरी गावातून गावा मागील डोंगरावर असलेल्या किल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर कातळात खोदलेल्या दोन गुहा आणि त्यांच्या बाहेर फ़डकत असलेला भगवा झेंडा दिसतो. एक छोटा ओढा ओलांडुन आपण पाच मिनिटात किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. पायथ्यापासून ५ मिनिटात आपण पहिल्या गुहेपाशी पोहोचतो. गुहा पाहुन झाल्यावर पुन्हा आलेल्या वाटेने परत जाऊन गुहेच्या विरुध्द दिशेला असलेल्या पायवाटेने (डोंगर डाव्या बाजूला आणि दरी उजव्या बाजूला ठेउन) डोंगर चढुन पाच मिनिटात आपण कोसळलेल्या तटबंदीतून गडमाथावर प्रवेश करतो. गडमाथा साधारणपणे गोल आहे. गडमाथ्यावरील अवशेष पाहायला अर्धा तास पुरतो. गडमाथ्यावर गर्द झाडीत काही पिंडी आणि वीरभद्राची भंगलेली मुर्ती उघड्यावर ठेवलेली आहे. या पिंडींच्या जवळच एक वाट खाली उतरतांना दिसते. या पायवाटेने खाली उतरल्यावर डाव्या बाजूला पायवाट खाली उतरते तिथे उध्वस्त प्रवेशव्दाराचे अवशेष पाहायला मिळतात. या प्रवेशव्दारातून जाणारी पायवाट भिमाशंकरला जाते.
पायवाटेने गर्द झाडीतून एक डोंगर अर्धा उतरुन आपण दोन डोंगरांच्या घळीत येतो. दुसरा डोंगर चढल्यावर आपण भोरगिरी भिमाशंकर या कच्च्या रस्त्यावर येतो. भिमा नदीचा प्रवाह डाव्या बाजुला ठेउन भिमाशंकरकडे जातांना दोन छोटे ओढे ओलांडावे लागतात. त्यापुढे भिमा नदीचा प्रवाह ओलांडावा लागतो. हा प्रवाह उथळ असला तरी पावसाळ्यात पाण्याला जोर असतो. अशावेळी बरोबर रोप बाळगावा. या ठिकाण पर्यंत कच्चा रस्ता आहे. प्रवाह ओलांडल्यावर पुढे दोन पायवाटा फ़ुटतात. सरळ जाणारी वाट थेट भिमाशंकरला जाते. तर डाव्या बाजुला असलेला भिमा नदिला मिळणारा प्रवाह ओलांडून (नदी उजव्या बाजुला ठेउन) १५ मिनिटे वर चढत गेल्यावर आपण भिमाशंकरहुन गुप्त भिमाशंकरला जाणार्‍या वाटेवर पोहोचतो. इथुन ५ मिनिटे खाली उतरुन गेल्यावर आपण गुप्त भिमाशंकरच्या वरच्या बाजुला भिमा नदीच्या प्रवाहाजवळ पोहोचतो. पावसाळ्यात या प्रवाहाला जास्त पाणी असल्यास प्रवाह ओलांडण्यासाठी रोपची आवश्यकता भासते. त्यामुळे ३० फ़ुटी रोप बरोबर बाळगणे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे.
गुप्त भिमाशंकर पाहुन मळलेल्या पाउलवाटेने भिमाशंकरला पोहोचण्यासाठी अर्धा तास लागतो. मुंबई भोरगिरी हा पहिल्या दिवसाचा पाच तासाचा प्रवास, कोटेश्वर मंदिर, भोरगिरीचा किल्ला, गुप्त भिमाशंकर आणि भिमाशंकर मंदिर ही ठिकाण पहिल्या दिवशी पाहुन होतात. दुसर्‍या दिवशी सकाळी हनुमान मंदिर आणि नागफ़णी पाहुन दुपारच जेवण करुन गणेश घाट किंवा शिडी घाटाने ३ ते ५ तासात खांडसला उतरता येते.
२) वरील ट्रेक उलट्या मार्गाने म्हणजेच मुंबई - कर्जत - खांडस - भिमाशंकर - भोरगिरी या मार्गाने केल्यास थोडा कठीण होतो. कारण आपण कोकणातून चढुन घाटावर जातो.  भिमाशंकरला पोहोचल्यावर त्याच दिवशी नागफ़णी आणि भिमाशंकर मंदिर पाहुन घ्यावे. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठुन भिमाशंकर - भोरगिरी हा ट्रेक चालु करावा. वाटचालीत गुप्त भिमाशंकर, भोरगिरी किल्ला, कोटेश्वर मंदिर ही ठिकाण पाहावीत. भोरगिरीहुन सकाळी १०.०० आणि दुपारी १४.०० वाजता अशा दोनच एसटी असल्याने वेळेचे काटेकोर नियोजन कराव. भोरगिरीहुन - राजरुनगरसाठी जीप मिळण कठिण आहे. तसेच भोरगिरीत जेवणाची सोय होणेही कठीण आहे. त्याकरता राजगुरुनगर गाठणे आवश्यक आहे. हे ध्यानात ठेउन वेळेच नियोजन कराव.
३)  मुंबई आणि पुण्याहुन बसने भिमाशंकर गाठावे. भिमाशंकरचे मंदिर पाहून भिमाशंकर - भोरगिरी हा ट्रेक चालु करावा. वाटचालीत गुप्त भिमाशंकर, भोरगिरी किल्ला, कोटेश्वर मंदिर ही ठिकाण पाहावीत. हा ट्रेक एक किंवा दोन दिवसाचा करता येईल. एक दिवस केल्यास नागफ़णी पाहाता येणार नाही. तसेच एका दिवसाच्या ट्रेकसाठी खाजगी वाहानाने मुंबई आणि पुण्याहुन तळेगाव मार्गे -चाकण- राजगुरुनगर गाठावे. राजगुरुनगर - चास - वाडा - डेहेणे - शिरगाव येथुन भिमाशंकरला जाणारा फाटा आहे (अंतर २१ किमी) या मार्गाने भिमाशंकर गाठावे. भिमाशंकरला पाय उतार होऊन वाहान भिमाशंकर (२१ किमी) शिरगाव (१२ किमी) भोरगिरीला बोलवुन घ्यावे आणि आपण वर दिलेल्या मार्गाने भोरगिरी ते भिमाशंकर चालत यावे.
४)  पुण्याहुन भोरगिरी - भिमाशंकर - भोरगिरी हा ट्रेक एक दिवसात करता येतो. त्यासाठी खाजगी वाहानाने भोरगिरी गाठुन कोटेश्वर मंदिर, भोरगिरीचा किल्ला, गुप्त भिमाशंकर आणि भिमाशंकर मंदिर ही ठिकाण पाहुन परतीचा प्रवास त्याच दिवशी करता येईल. वेळेचे व्यवस्थापन व्यवस्थित केल्यास हा ट्रेक एका दिवसात करता येतो. (बरोबर विजेरी (टॉर्च) बाळगणे आणि वाटाड्या घेणे आवश्यक आहे. परत येताना अंधार होण्याची शक्यता असते.)
जाण्यासाठी :-
भोरगिरीला जाण्यासाठी मुंबई आणि पुण्याहुन तळेगाव मार्गे -चाकण- राजगुरुनगर गाठावे. राजगुरुनगर - चास - वाडा - डेहेणे - शिरगाव ( येथुन भिमाशंकरला जाणारा फाटा आहे. अंतर २१ किमी) -  भोरगिरी असा रस्ता आहे. (राजगुरु नगर ते भोरगिरी अंतर ५५ किमी आहे). राजगुरु नगरहुन वाडाला जाण्यासाठी बसेस आणि जीपची सोय आहे. वाडा ते भोरगिरी स्पेशल जीप करुन जावे लागते. राजगुरु नगर ते भोरगिरी स्पेशल जीप करुनही जाता येते.
मुंबईहुन बोरीवली - भोरगिरी ही बस भोरगिरीला सकाळी १०.०० वाजता पोहोचते. कल्याण - भोरगिरी ही बस भोरगिरीला दुपारी २.०० वाजता पोहोचते. दोनही बस १५ मिनिटे थांबुन परत जातात. या दोनही बस राजगुरुनगर मार्गे भोरगिरीला जातात.
भोरगिरीला येण्याचा दुसरा मार्ग म्हणजे मुंबई आणि पुण्याहुन बसने भिमाशंकर गाठावे. भिमाशंकर ते भोरगिरी अंतर ८ किमी आहे. हा ३ तासाचा सोपा ट्रेक आहे. या ट्रेक बद्दल सविस्तर माहिती वर दिलेली आहे.
सुचना :- १) भोरगिरी ते भिमाशंकर हा कच्चा रस्ता आहे. भिमानदी आपण जिथे ओलांडतो तिथे हा रस्ता संपतो. पुढे जाण्यासाठी दोन पायवाटा आहेत. एक पायवाट गुप्त भिमाशंकर करुन भिमाशंकरला जाते. तर दुसरी पायवाट थेट भिमाशंकरला जाते. भिमाशंकरला जातानांच गुप्त भिमाशंकर पाहिल्यास पुन्हा त्यासाठी वेगळे येण्याची आवश्यकता भासत नाही आणि वेळ वाचतो. भिवगड ते खांडस ट्रेक करणार्‍यासाठी तर हे आवश्यक आहे.
२) या ट्रेकमधे दोन ठिकाणी भिमा नदीच्या पाण्याचा प्रवाह ओलांडावा लागतो. तसेच गुप्त भिमाशंकर पाहाण्यासाठीही भिमा नदीच्या पाण्याचा प्रवाह ओलांडावा लागतो. प्रवाह उथळ असला पावसाळ्यात पाण्याचा पाण्याची पातळी बर्‍याचदा पटकन वाढते. त्यामुळे ३० फ़ुटी रोप सोबत बाळगावा.
३) भोरगिरी ते भिमाशंकर ही वाट मळलेली असली तरी वेळ वाचवण्याच्या दृष्टीने, गुप्त भिमाशंकर मार्गे जाणारी वाट पटकन सापडण्यासाठी वाटाड्या घेण आवश्यक आहे. पावसाळ्यात बर्‍याचदा ढग उतरल्यामुळे वाट नीट सापडत नाही. त्यावेळी वाटाड्या आवश्यक आहे.
४) भोरगिरी किल्ल्याची माहिती www.trekshitiz.com या साईटवर मराठी सेक्शन मधे दिलेली आहे.
५) कोटेश्वर मंदिराची माहिती  www.trekshitiz.com या साईटवर Discussion Forum  मधे Temples of Sahyadri सेक्शन मधे दिलेली आहे.
६) भोरगिरी ते भिमाशंकर ट्रेक मधे पदरगड किल्ला होउ शकत नाही. पदरगडाची माहिती www.trekshitiz.com या साईटवर मराठी सेक्शन मधे दिलेली आहे.
७)  भिमाशंकर ट्रेकची सविस्तर माहिती साईटवर दिलेली आहे.
८) जुलै ते मार्च हा ट्रेक करण्यासाठी योग्य काळ आहे.
अमित सामंत
Subject: Vasota - Nageshwar range trek वासोटा -
Posted: 16 Dec 2014 at 1:06pm
Subject: Vasota - Nageshwar range trek वासोटा -
Posted: 15 Dec 2014 at 1:05pm
वासोटा - नागेश्वर ट्रेक
वासोटा - नागेश्वर हा सह्याद्रीतल्या एक सुदंर ट्रेक आहे. नागेश्वरला भेट दिल्याशिवाय वासोट्याची भेट पूर्ण होऊच शकत नाही. कोयना अभयारण्याच्या निबिड जंगलातून, नागेश्वरच्या डोंगर धारेवरून वासोट्याची आणि सह्याद्रीच्या रौद्र सौंदर्याची विविध रुप न्याहळत केलेला ट्रेक कायम स्मरणात राहतो. वासोट्यावरुन समोरच एक सुळका आपले लक्ष वेधून घेतो, तो खोटा (छोटा) नागेश्वर, त्याच्या पुढे दुरवर एक सुळका दिसतो त्यालाच नागेश्वर म्हणतात. या सुळक्याच्या पोटात एक गुहा असून, तेथे महादेवाचे मंदिर आहे. नागेश्वरच्या पायथ्याच्या गावातील लोकांच हे श्रध्दास्थान आहे. दरवर्षी शिवरात्रीला या पवित्र स्थानी भक्तांची दर्शनासाठी गर्दी होते. गुहेच्या छतावरून बाराही महिने पाण्याच्या थेंबांचा अभिषेक शिवलिंगावर होत असतो.
वासोटा - नागेश्वर हा शरीर - मनाची कसोटी पाहाणारा खालील चार वाटांनी ट्रेक एका दिवसात करता येतो.
१) सातारा - बामणोली - मेट इंदवली - वासोटा - नागेश्वर - आल्यावाटेने परत मेट इंदवली.
२) सातारा - बामणोली -मेट इंदवली - वासोटा - नागेश्वर - नागेश्वर कुंड - ओढ्याच्या वाटेने - मेट इंदवली
३) सातारा - बामणोली - मेट इंदवली - वासोटा - नागेश्वर - चोरवणे - चिपळूण
४) चिपळूण - चोरवणे - नागेश्वर - वासोटा - मेट इंदवली -बामणोली - सातारा.
वरील ट्रेकस वेळेचे व्यवस्थापन व्यवस्थित केल्यास चारही मार्गाने एका दिवसात करता येतो.
१) सातारा - बामणोली - मेट इंदवली - वासोटा - नागेश्वर - आल्यावाटेने परत मेट इंदवली :-
वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी वापरली जाणारी सर्वात प्रचलित वाट मेट इंदवलीहून आहे. त्यासाठी सातार्‍याहून बामणोली या गावी यावे. सातरा - बामणोली अंतर ३० किमी आहे. सातारा - कास पठार - बामणोली या सुंदर रस्त्याने तासभरात बामणोलीला पोहोचता येते. बामणोलीला जाण्यासाठी सातार्‍याहून बसची सोय आहे. बामणोलीहून कोयना धरणाचा शिवसागर जलाशय लाँचने पार करून मेट इंदवलीला पोहोचायला दिड तास लागतो.
२) सातारा - बामणोली -मेट इंदवली - वासोटा - नागेश्वर - नागेश्वर कुंड - ओढ्याची वाट - मेट इंदवली :-
सातारा ते नागेश्वर क्रमांक (१) मधे सांगितल्याप्रमाणे जावे. नागेश्वरचे दर्शन घेउन खाली उतरल्यावर उजवी कडील वाट चोरवणे गावात उतरते तर डावीकडील वाट नागेश्वर कुंडाकडे जाते. डावीकडील वाटेने खाली उतरुन प्रथम नागेश्वर कुंडातील पाणी भरुन घ्यावे. तिथुन खाली उतरायला सुरवात केल्यावर १० मिनिटानी आपल्याला एक ओढा दिसतो. या वाटेवर असंख्य दगडधोंडे पडलेले आहेत. यावाटेने दगडधोंड्यातून, साचलेल्या पाण्याला वळसे घालत आपण २ तासात छप्पर नसलेल्या हनुमानाची व गणपतीची मंदिरापाशी येतो. तेथुन १५ मिनिटात वन खात्याच्या कार्यालयाजवळ पोहोचतो. ही वाट उताराची असल्याने क्रमांक (१) च्या वाटेपेक्षा ओढ्याच्या वाटेने उतरायला कमी वेळ लागतो.
३) सातारा - बामणोली - मेट इंदवली - वासोटा - नागेश्वर - चोरवणे - चिपळूण :-
सातारा ते नागेश्वर क्रमांक (१) मधे सांगितल्याप्रमाणे जावे. नागेश्वरचे दर्शन घेउन खाली उतरल्यावर उजवी कडील वाट चोरवणे गावात उतरते तर डावीकडील वाट नागेश्वर कुंडाकडे जाते. उजवी कडील वाटेने खाली उतरल्यास ३ तासात आपण चिपळुण जवळील चोरवणे गावात पोहोचतो. या वाटेने जाण्याचा फ़ायदा म्हणजे ही वाट आणि चोरवणे गाव अभयारण्य क्षेत्राच्या बाहेर आहे. त्यामुळे उशिर झाला तरी चालू शकतो. या वाटेचा तोटा म्हणजे बामणोली ते मेट इंदवली बोटचे जाण्या येण्याचे पैसे द्यावे लागलात. (खाजगी वाहन असल्यास सकाळी बामणोलीला सोडून आपल्याला वाहान चोरवण्याला मागवता येईल. चोरवण्याहून एसटी सकाळची आहे.)
४) चिपळूण - चोरवणे - नागेश्वर - वासोटा - मेट इंदवली -बामणोली - सातारा :-
हा ट्रेक वरील सर्व ट्रेक मधील सर्वात कठीण आणि थकवणारा ट्रेक आहे. कारण चोरवणेहुन (कोकणातून) पूर्ण घाटमाथा चढुन नागेश्वरला याव लागत. या वाटेवर कोठेही पाणी नाही आहे. या वाय़ेने येण्यासाठी चिपळुणहून एसटीने किंवा खाजगी वाहानाने चोरवणे गाठावे. (सकाळची पहिली एसटी उशिरा असल्याने रात्रीच गावात मुक्कामास गेल्यास उत्तम) चोरवणेहुन खडा चढ चढुन नागेश्वर गाठायला ५ ते ६ तास लागतात. या वाटेवर कोठेही पाणी नाही. नागेश्वर पाहून वासोटा गाठतानाही चढ उतार पार करत आपण साधारणपणे २.०० ते ३.०० तासात वासोटा आणि नागेश्वरच्या फ़ाट्यावर पोहोचतो. येथून उजवीकडे जाणारी वाट नागेश्वरला जाते. तर सरळ चढत जाणार्‍या वाटेने ३० मिनिटात गडावर पोहोचता येते. वासोटा पाहून मेट इंदवलीला उतरायला १ तास लागतो. परतीच्या प्रवासासाठी बामणोलीतून बोट आधी सांगुन ठेवावी लागते. यामार्गात शेवटच्या टप्प्यात जंगल नसल्याने आपण भर उन्हात या भागात पोहोचतो. त्यासाठी पहाटे लवकर ट्रेक चालू केल्यास फ़ायदा होउ शकतो. या वाटेचा तोटा म्हणजे बामणोली ते मेट इंदवली बोटचे जाण्या येण्याचे पैसे द्यावे लागलात. तसेच या ट्रेकमधे उशिर होण्याचा पूर्ण संभव असल्याने वनखात्याच्या कारवाईस सामोरे जाण्याची शक्यता जास्त असते. (खाजगी वाहन असल्यास सकाळी चोरवण्याला सोडून आपल्याला वाहान चोरवण्याला मागवता येईल. बामणोलीहून एसटी सकाळ ६.०० ची आहे.)
सूचना :
१) बामणोली येथून मेट इंदवलीला जाण्यासाठी बोटी मिळतात. एका बोटीत १२ माणसे घेतात. १ माणुस असो की १२ माणस असोत, एका बोटीचा दर रुपये ३०००/- (२०१४ साली) आहे.
२) यातील (१),(२),(४) क्रमांकाचे ट्रेक करणार असल्यास सूर्य मावळण्यापूर्वी बामणोलीला पोहोचणे आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी. सूर्य मावळल्या नंतर पोहोचल्यास बामणोली येथे वनखात्याकडून कारवाई केली जाते. (पंचनामा केला जातो व माणशी रुपये १००/- दंड आकारला जातो.) तसेच अंधार पडल्यावर बोट चालवणारे अडवणूक करतात त्यांनाही जास्तीचे पैसे द्यावे लागतात.
३) वासोटा - नागेश्वर परीसर कोयना अभयारण्यात गेल्यामुळे तेथे राहाण्याची परवानगी नाही.
४) चिपळूणहून चोरवणे मार्गे नागेश्वर - वासोट्याला जाताना वाटेत पाण्याची कुठेही सोय नाही, तेव्हा पाण्याचा पुरेसा साठा जवळ बाळगणे आवश्यक आहे.
५) वासोट्याला पावसाळ्यात जळवांचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतो, तेव्हा आवश्यक ती काळजी घ्यावी
६) पिण्याच्या पाण्याची सोय वासोटा किल्ल्यावर व नागेश्वर कुंडात आहे.
७) वासोटा - नागेश्वर ही दोनही ठिकाणे कोयना अभयरण्यात असल्यामुळे रात्री राहाण्यास परवानगी नाही. तरी आणिबाणीच्या वेळेला खालील ठिकाणी मुक्काम करता येईल.
अ) वासोट्यावरील महादेवाच्या मंदिरात २ ते ३ जणांची राहण्याची सोय होते.
ब) वासोट्यावर जोड टाक्यांच्या शेजारील पठारावरही राहता येते.
क) नागेश्वराची गुहा ही राहण्यासाठी उत्तम जागा आहे. येथे २० ते २५ जण आरामात राहू शकतात.
८) वासोटा किल्ल्याची सविस्तर माहिती साईटवर दिलेली आहे.
Amit Samant
Vasota Fort. Vasota Nageshwar, Vasota Nageshwar range trek, Vasota Nageshwar Choravane trek, Range treks in Maharashtra, Tough treks in Maharashtra.
Subject: Chandragad - ArthurSeat Range Trek
Posted: 30 Dec 2013 at 5:15pm
चंद्रगड ते आर्थरसीट रेंज ट्रेक
नुकताच झालेला चंद्रगड ते आर्थरसीट रेंज ट्रेक हा ह्या हिवाळ्यामधील खास आकर्षण ठरला. थंडी, भरपूर चाल, जंगलातील वाट आणि आर्थरसीटवरील सूर्यास्त ह्यामुळे हा ट्रेक अविस्मरणीय होता.
चंद्रगड ते आर्थरसीट (महाबळेश्वर) ही रेंज प्रामुख्याने खालीलप्रकारांत विभागता येऊ शकते :
१. ढवळे गाव ते चंद्रगड
२. चंद्रगड ते बहिरीची घुमटी
३. बहिरीची घुमटी ते गाढवाचा माळ
४. गाढवाचा माळ ते आर्थरसीट point
डोंबिवलीवरून ट्रेक टीम शुक्रवार २१ डिसेंबरला रात्री ११:३० ला निघाली. शनिवारी सकाळी ५:३० ला आम्ही ढवळे गावात पोहोचलो. सकाळी ७ वाजता ट्रेकला सुरुवात झाली.
१. ढवळे गाव ते चंद्रगड (सुरुवात: सकाळी ७ ; शेवट: सकाळी ९)
चंद्रगड हा साधारण ढवळे गावाच्या पूर्वेला असून तो गावामधून लगेच दृष्टीस पडत नाही. गावातील मंदिर डावीकडे  ठेवत चालायला लागायचे. सुरुवातीचा काही भाग हा शेतामधून जातो. सुरुवातीला दिसणाऱ्या एका डोंगराच्या मागे आणि थोडेसे डावीकडे चंद्रगड आहे. ह्या डोंगराला वळसा घालून आपल्याला पहिल्या १५-२० मिनिटांची वाट पार पाडावी लागते. सुरुवातीला दरी डावीकडे आणि नंतर उजवीकडे ठेवत ही वाट पार करायची. शेतजमिनीनंतरची हे वाट जंगलातून जाणारी आहे. इथपर्यंत विशेष चढ नाही. इथे चंद्रगडच्या पायथ्याशी पोहोचतो. येथून थोडा आणि मध्यम चढ आहे. माती भुशभुशीत असल्याने जरा जपून चालावे लागते. जेथे गडचढाई चालू होते तेथे ग्रामस्थांनी एक मोठा बोर्ड लावला आहे. येथून पुढील १५-२० मिनिटांची चढाई छोटाशा पठारावर आणून सोडते. तेथून वर जायला कातळमार्ग आहे. काही ठिकाणी कातळात पायऱ्या खोदल्या आहेत. येथून चढत आल्यास आपण पुढील १० मिनिटांत गडावरील पठारावर येउन पोहोचतो.  पूर्वदिशा उजवीकडे राहते. येथे एक शंकराची पिंड आणि नंदी दृष्टीस पडतो. शेवटच छोटा कातळटप्पा पार केल्यावर आपण माथ्यावर येउन पोहोचतो. उत्तरेकडे जाणाऱ्या वाटेवर उजवीकडे एक पाटा-वरवंटा दिसतो. हा पहिल्यापासून आहे का कोण्या गावकर्याने आणला ह्याविषयी मात्र माहिती उपलब्ध नाही.  उत्तरेकडे चालत नेणारी ही वाट मार्गात एक पाणीटाके दाखवते. ह्यातील पाणी खराब आहे. ह्याच्याच खालच्या बाजूला २ पाणीटाकी असून ती कोरडी आहेत परंतू तेथे जाता येत नाही. उत्तरेकडील ही  वाट पुढे एका बुरुजावर उतरते. तेथून उजवीकडे आल्यास २ आणि डावीकडे गेल्यास ३ पाणीटाकी दिसतात. सगळ्यांतील पाणी खराब आहे. डावीकडील टाक्यांच्या इथून दूरवर प्रतापगड दिसतो.
२. चंद्रगड ते बहिरीची घुमटी (सुरुवात : सकाळी ९:४५ ; शेवट : दुपारी २:४५)
ह्या रेंज मधील सगळ्यात जास्त कठीण हा patch आहे. चंद्रगड बघून दक्षिणेकडील वाटेने खाली यावे आणि चढताना शेवटी लागणारा कातळटप्पा पार करावा. येथून उजवीकडे जाणारा रस्ता ढवळे गावात जातो तर डावीकडील रस्ता घळीत उतरतो. माथ्यावरून इथे यायला १५ मि. लागतात. येथून डावीकडे वळावे आणि चन्द्रगडाची कातळभिंत डावीकडे आणि दरी उजवीकडे ठेवत ही खिंड पार करावी. ही वाट अतिशय निसरडी असून सर्वत्र गवत पसरलेले असते. येथून पुढे खाली उतरणारी वाट पूर्णत: झाडी आणि भुशभूशीत मातीतून आहे. सुरुवातीची २० मि. झाडीतून आणि नंतरचा अर्धा तास दगडातून उतरल्यावर ही वाट एका नळीच्या (ओढ्याच्या) वाटेवर आणून सोडते. येथून उजवीकडे (दक्षिणेकडे) वळल्यावर बहिरीच्या घुमटीची चढाई चालू होते. ही वाट पूर्णपणे जंगलातून आहे. चढ मध्यम स्वरूपाचा असून दरी डाव्या बाजूला ठेवावी. विशेष म्हणजे जंगलातील वाटेमुळे उन्हाचा त्रास जाणवत नाही.
चंद्रगड ते बहिरीची घुमटी हा मार्ग विस्तृत आणि सतत चढाईचा असल्यामुळे हा पट्टा शारीरिक क्षमतेची परीक्षा पाहतो. जंगलातील ही वाट नळीच्या वाटेशी संपते आणि येथून आपल्याला १८० अंशात वळावे लागते. नंतरचा चढ हा परत खडा असून माती भुशभुशीत आहे.
हा चढ शेवटी एका माळरानावर संपतो. चंद्रगड उत्तरेकडे मागे राहतो आणि आताच्या उंचीसमोर चंद्रगड ठेंगणा वाटायला लागतो. येथून पुढची वाट हि परत C shape मध्ये असून आसमंत उघडा रानमाळ आहे. ही वाट जेथे संपते तेथे छोटासा कातळटप्पा पार केल्यावर आपल्याला बहिरीची घुमटी दिसते. येथे काही देव-देवतांच्या दगडी मूर्त्या आहेत. घुमटीच्या थोडे आधी एक वाट उजवीकडे वळते जी पुढे जोरचे पाणीवर आणून सोडते. येथून पूर्वेकडील रस्ता जोर गावात उतरतो म्हणून ह्यास जोरचे पाणी म्हणतात. येथील पाणी थंड, सुमधूर आणि पिण्यायोग्य आहे.
३. बहिरीची घुमटी ते गाढवाचा माळ (आर्थरसीट प्रथमदर्शन) (सुरुवात: दुपारी ४:१५ ; शेवट : दुपारी ४:३०)
जोरचे पाणीवरून उजवीकडील वाट दक्षिणेकडील गाढवाच्या माळावर जाते. ही वाट जंगलातून असून सोपा चढ आहे. ही वळणावळणाची वाट १५-२० मि. चालल्यावर पठारवजा ठिकाणी  आणून सोडते. दक्षिणेकडे महाबळेश्वरचे बुलंद पठार आणि आर्थरसीट point चे प्रथम दर्शन होते.
४. गाढवाचा माळ (आर्थरसीट प्रथमदर्शन) ते आर्थरसीट point (सुरुवात: दुपारी ४:३०; शेवट : संध्याकाळी ५: ४५)
हा ह्या रेंजमधील शेवटचा टप्पा आहे. ही वाट मिश्रस्वरूपाची (जंगल आणि उघडा रानमाळ) आणि वळणावळणाची आहे. शेवटच्या काही भागात माती भुशभुशीत असल्याने थोडी काळजी घ्यावी लागते.
सगळ्यात शेवटच्या भागात एक १२-१५ फूटांचा rock patch आहे. चढायला सोपा असणाऱ्या ह्या patch मधे जागोजागी खोबण्या आहेत. हा patch चढून गेल्यावर आपण आर्थरसीटवर पोहोचतो.
अशाप्रकारे जवळपास ११ तासांच्या चालीनंतर आम्ही चंद्रगड ते आर्थरसीट ही रेंज पार केली. हा ११ तासांचा ट्रेक करताना आम्हाला काही अनुभव आले आणि त्यावरून ह्या ट्रेकसाठी घ्यायच्या काही सूचना मांडाव्याशा वाटल्या. त्या अशा:
१. ढवळे गावातून फक्त चंद्रगड करणे शक्य आहे. परंतु, पावसाळ्यात ही रेंज करणे टाळावे. घुमटीकडे जाणाऱ्या खिंडीत खूप गवत साठलेले असते आणि ही वाट निसरडी असून तोल गेल्यास सरळ दरीत पडण्याचा संभव आहे.
२. चंद्रगडसाठी उन्हाचा फार त्रास होत नाही. पण घुमटीच्या आधी उघडा रानमाळ असल्याने आणि तोवर उन पण चढल्याने उन्हाचा त्रास होऊ शकतो. सोबत glucose, काकड्या, फळे ठेवल्यास ह्या त्रासाची तीव्रता कमी करता येऊ शकते.
३. ढवळेमधून चालायला घेतल्यावर फक्त घुमटीजवळील जोरचे पाणीमध्ये पिण्यायोग्य पाणी आहे. त्यामुळे सोबत भरपूर पाणीसाठा बाळगावा.
४. पाणी कमी प्यायल्यामुळे किव्वा चाल भरपूर असल्याने कधी कधी Cramp येण्याचा किव्वा Muscle Paining चा त्रास होऊ शकतो. सोबत स्वतःचे Medical Kit आणि इतर औषधे बाळगावीत.
५. पूर्ण रेंजमध्ये १ छोटा आणि १ मोठा Rock Patch आहे. दोन्ही सोपे असून प्रस्तारोहाणाच्या साधनाची गरज भासत नाही. तरी सोबत ५०/१०० फुटी दोर असावा.
--अमोल नेरलेकर
९९६७८४८१२४