केशवराज मंदिर (आसु | 
 
    Post Reply  
   | 
  
| Author | |
   
   amitsamant  
   
   Moderator Group  
    
   Joined: 16 Jun 2012 Location: Dombivali Status: Offline Points: 738  | 
  
   
      Post Options
    
        Thanks(0)
      Quote   Reply
   
     Topic: केशवराज मंदिर (आसुPosted: 13 Dec 2014 at 9:39am  | 
 
| 
   
    
   केशवराज मंदिर (आसुद, दापोली) 
   
  गावाचे नाव :- आसुद											 जिल्हा :- रत्नागिरी जवळचे मोठे गाव :- दापोली, मुरुड हर्णे. ![]() दोपोली हे रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वाच गाव आहे. दापोली जवळ असलेल्या आसुद गावी व्याघ्रेश्वराचे आणि केशवराजचे प्राचिन मंदिर आहे. आसुद गावातील दाबकेवाडीत्तील डोंगरात आणि घनदाट वृक्षराजीत केशवराजाचे पुरातन मंदिर आहे. मंदिरासमोरच दगडी बांधणीच्या पाटातून आणलेल्या पाण्याची गोमुखातून संततधार पडत असते.  निसर्गरम्य वातवरणात असलेल्या या साध्याश्या विष्णु मंदिराच्या गाभार्याच्या दरवाजावर वरच्या बाजूस गणपती आणि उजव्या व डाव्या बाजूस अनुक्रमे हनुमान व गरूड कोरलेले आहेत. विष्णूच्या मुर्तीचे त्याच्या हातातील शंख, चक्र , गदा, पद्म आयुधांच्या धारण करण्याच्या क्रमावरुन २४ प्रकार पुराणात (अग्नि,पद्म,स्कंद) सांगितलेले आहेत. केशवराज मंदिरातील विष्णू मुर्तीच्या हातात डावी कडून उजवीकडे अनुक्रमे पद्म, शंख, चक्र, गदा आहेत. त्यामुळे ही केशव मुर्ती आहे, म्हणून हा "केशवराज". ![]() जाण्यासाठी :- मुंबईहून दापोलीला पोहोचावे. दापोलीहुन ८ किमी वरील मुरुड हर्णे गाव आहे. दापोली हर्णे रस्त्यावर दापोली पासून साधारणपणे ५ किमीवर आसुद गावातील दाबकेवाडीत  जाणारा फ़ाटा आहे. आसुद गावातील दाबकेवाडी पर्यंत गाडीने जाता येते. दाबकेवाडीतून केशवराज मंदिराकडे जाणारा मार्ग नयनरम्य आणि सुंदर आहे. आसुद गावातील दाबकेवाडीतून व्यवस्थित बांधलेली पायवाट नारळी पोफ़ळीच्या बागेतून उतरत ओढ्यापाशी (ओहळापाशी) येते. या ओढ्यावरचा पुल ओलांडल्यावर पायर्यांच्या वाटेने १० मिनिटे चढून गेल्यावर आपण केशवराज मंदिरापाशी पोहोचतो.   ३) व्याघ्रेश्वर मंदिर, आसुद. वरील सर्व ठिकाणांची माहिती साईटवर दिलेली आहे. Keshavraji  Mandir , Asud, Dapoli, Murud Harne, Keshavraj  Temple , Aasud, Dapoli, Murud harne,  Temples in Kokan , Temples near Dapoli, Temples in Ratnagiri District. Vishnu Mandir in Kokan. Edited by amitsamant - 31 Jul 2015 at 2:37pm  | 
 |
![]()  | 
 |
| Sponsored Links | |
![]()  | 
 |
    Post Reply  
   | 
  |
|       
  
  Tweet   	
    | 
 
| Forum Jump | Forum Permissions  ![]() You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot delete your posts in this forum You cannot edit your posts in this forum You cannot create polls in this forum You cannot vote in polls in this forum  |