| भंडारा डोंगर | 
| Post Reply   | 
| Author | |
| amitsamant   Moderator Group     Joined: 16 Jun 2012 Location: Dombivali Status: Offline Points: 738 |  Post Options  Thanks(0)  Quote  Reply  Topic: भंडारा डोंगर Posted: 29 Nov 2014 at 11:16am | 
| 
   भंडारा लेणी (भंडारा डोंगर) लेण्यांचा प्रकार :- बौध्द लेणी जिल्हा : पुणे  श्रेणी : मध्यम        देहु गावापासून दुरवर असलेल्या भंडारा डोंगरावर तुकाराम महाराज येउन बसत आणि इश्वराच्या भजन किर्तनात रंगुन जात. तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या डोंगरावर आता तुकाराम महाराजांचे मंदिर बांधलेले आहे. डोंगरावर जाण्यासाठी चार पदरी रस्ता झाल्याने वर्षभर वारकरी आणि पर्यटकांचा डोंगरावर राबता असतो.   	या डोंगरच्या मागच्या बाजूस उतरण्यासाठी एक पायवाट आहे. या पायवाटेने १० मिनिटे खाली उतरुन गेल्यावर आपल्याला कातळात कोरलेली गुहा दिसते. ्या गुहेत वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी वास्तव्यास असतात. या गुहेसमोरच पाण्याचे एक कुंड आहे. गुहेच्या वरच्या बाजूला एक स्तुप आहे. लेण्याचे छप्पर कोसळल्यामुळे हा स्तुप उघडा पडलेला आहे. स्तुपावर किंवा इतर कुठेही गौतम बुध्दाची प्रतिमा दिसत नाही. त्यामुळे ही लेणी हिनयान कालिन असावी. याशिवाय येथे एक दोनन अर्धवट खोदलेल्या गुहा पाहायला मिळतात.     जाण्याचा मार्ग :-  पुणे - नगर रस्त्यावर तळेगाव पासून ७ किमी अंतरावर भंडारा डोंगरावर जाणारा पक्का रस्ता आहे. या रस्त्याने  डोंगरावर गेल्यावर रस्त्याच्या विरुध्द बाजूस एक पायवाट खाली उतरते. (ही पायवाट चटकन सापडत नाही त्यामुळे मंदिरातील वारकरी किण्वा दुकानदारांना विचारावे). या मळलेल्या पायवाटेने १० मिनिटे खाली उतरल्यावर आपण प्राचिन बौध्द गुंफ़ेपाशी पोहोचतो. आजुबाजूची पाहाण्याची ठिकाणे :-  मुंबई आणि पुण्यापासून भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर व इंदुरीचा किल्ला ही तिनही ठिकाण एका दिवसात पाहाता येतात. तुकाराम महाराज, देहू, तळेगाव जवळची पाहाण्याची ठिकाणे, पुण्या जवळची पाहाण्याची ठिकाणे. Tukaram Maharaj, Dehu,  Talegaon, Chakan, Pune Edited by amitsamant - 29 Nov 2014 at 11:39am | |
|  | |
| Sponsored Links | |
|  | |
| Post Reply   | |
| Tweet | 
| Forum Jump | Forum Permissions  You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot delete your posts in this forum You cannot edit your posts in this forum You cannot create polls in this forum You cannot vote in polls in this forum |