Yellow Pansy Butterfly | 
 
    Post Reply  
   | 
  
| Author | |
   
   amolnerlekar  
   
   Senior Member  
   Joined: 21 Jan 2013 Location: DOmbivali Status: Offline Points: 159  | 
  
   
      Post Options
    
        Thanks(0)
      Quote   Reply
   
     Topic: Yellow Pansy ButterflyPosted: 21 Nov 2014 at 10:31am  | 
 
| 
   
    
   हळदी भिरभिरी  
   
  निसर्ग म्हणजे नानाविध रंगांची उधळण. त्याच्यातील अनेक घटकांमधून रंगांची विलोभनियता अगदी सहज दृष्टीस पडते. मग ह्या विविधतेला फुलपाखर तरी कशी अपवाद राहणार? कण्हेरगडावर फिरताना मला भेटलेले पिवळ्याधमक रंगाचे फुलपाखरू : हळदी भिरभिरी ![]() नराच्या पंखांवरील रंग हा मादीपेक्षा जास्त ठळक असतो. दोघांच्या पंखांच्या मध्यभागी निळ्या रंगाचे मोठे ठिपके आढळतात. ह्या ठिपक्यांचा आकार नरामध्ये मादीपेक्षा मोठा आणि ठळक असतो. निळ्या ठिपक्यांच्या भोवती असणार्या काळ्या रंगाचे प्रमाण नरामध्ये जास्त असते. मादीच्या पंखांवर निळ्या-काळ्या रंगाचे दोन छोटे 'डोळे' नजरेस पडतात. दोघांच्याही पंखांच्या वरील बाजूस पांढर्या-काळ्या रंगाची झालर दिसते. पंखांची खालेल बाजू निळ्या-राखाडी रंगाचे असते. पंखविस्तार ४.५ ते ६ से.मी. पर्यंत असतो.  हळदी भिरभिरीचा वावर कोरांटी वनस्पतीवर जास्त प्रमाणात आढळून येतो. अंडी साधारण हिरव्या रंगाची असून आकार ०.६ ते ०.७ मि.मी. असतो. साधारणत: २ ते ३ दिवसात अंडी उबून त्यातून सुरवंट बाहेर येते. सुरवंटाची लांबी १.३ मि.मी. पर्यंत असते. सुरुवातीचे काही दिवस सुरवंटाची उपजीविका अंड्याच्या कवचावर होते. २२ दिवसांमध्ये अनेक टप्प्यातून ह्याची वाढ होत लांबी ४ से.मी. पर्यंत वाढते. त्याचा रंग फिकट लाल रंगाचा असतो. त्यापुढील ६ दिवसात त्या सुरवंटाचे फुलपाखरात रूपांतर होते.  ![]() Yellow Pansy म्हणजेच हळदी भिरभिरी आफ्रिका, दक्षिण आशिया, भारतात आणि पर्यायाने सह्याद्रीत सर्वत्र आढळणारे फुलपाखरू आहे. ह्याच्या पिवळ्याधमक रंगामुळे ते सहज दृष्टीस पडते परंतू ह्याच रंगामुळे ह्याला स्वसंरक्षण करणेदेखील तितकेच कठीण जाते.  Scientific name : Junonia hierta Class/ Family : Insecta / Nymphalinae संदर्भ : महाराष्ट्रातील फुलपाखरे (डॉ. राजू कसंबे), www.google.com. फ़ोटो : १. हळदी भिरभिरी : नर (D. Momaya) ; २. हळदी भिरभिरी : मादी (अमोल नेरलेकर). -- अमोल नेरलेकर । २१.११.२०१४  Edited by amolnerlekar - 21 Nov 2014 at 10:55am  | 
 |
![]()  | 
 |
| Sponsored Links | |
![]()  | 
 |
   
   chaitanya  
   
   Groupie  
    
   Joined: 12 Jul 2012 Location: Dombivli Status: Offline Points: 92  | 
  
   
      Post Options
    
        Thanks(0)
      Quote   Reply
   
     Posted: 21 Nov 2014 at 10:41am | 
 
| 
   
    
   फार छान अमोल... असच लिहित रहा... 
    
   
   | 
 |
![]()  | 
 |
   
   AARTI  
   
   Senior Member  
   Joined: 30 Apr 2014 Location: PUNE Status: Offline Points: 105  | 
  
   
      Post Options
    
        Thanks(0)
      Quote   Reply
   
     Posted: 21 Nov 2014 at 11:07am | 
 
| 
   
    
   
मस्त लिहिला आहेस अमोल...
    
   
   | 
 |
![]()  | 
 |
    Post Reply  
   | 
  |
|       
  
  Tweet   	
    | 
 
| Forum Jump | Forum Permissions  ![]() You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot delete your posts in this forum You cannot edit your posts in this forum You cannot create polls in this forum You cannot vote in polls in this forum  |