Forum Home Forum Home > Historical and Trekking Destinations of India > Trekking Destinations
  New Posts New Posts RSS Feed - गोरखगड--जोडगोळीतला
  FAQ FAQ  Forum Search   Events   Register Register  Login Login


गोरखगड--जोडगोळीतला

 Post Reply Post Reply
Author
Message
Shreyas Pethe View Drop Down
Senior Member
Senior Member
Avatar

Joined: 05 Aug 2015
Location: Pune
Status: Offline
Points: 135
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote Shreyas Pethe Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Topic: गोरखगड--जोडगोळीतला
    Posted: 11 Jun 2017 at 2:34pm
                 

          हरिश्चन्द्रगडवरील धसक्याने भैरवगडला सुट्टी घेतली पण आता राहवत नव्हतं.जवळजवळ एक महिना होत आला होता.आता ट्रेकची गरजच होती.त्यामुळे गोराखगडला जायची तयारी सुरु केली.आईने सोलापूर वरून ट्रेकिंगचे सर्व सामान पुण्यात पोस्त केले होतेच .मी तेथून सामान घेऊन कल्याणकडे निघालो.प्रथमेशने सोलापुरवरून पकडलेली इंद्रायणी तशीच पुढे continue केली.डोंबिवली ला वेळेत पोचलो,गुजराथी मेस मध्ये राईस प्लेट घेतली.पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि टिळक पुतळ्याजवळ आलो.सगळे एकत्र येण्यासाठी थोडा वेळ गेलाच.११.३० च्या सुमारास डोंबिवली सोडली.

    गप्पा-गोष्टीमुळे झोप झाली नाहीच.काही वेळातच मुरबाड पार करून गोरखगडाच्या पायथ्याशी आलो.वाटाड्याला सोबत घेऊन लगेच गुहेकडे प्रस्थान केले.काही जणांचा पहिलाच रात्रीचा ट्रेक होतं.सुरुवातीला शरीराला सवय होईपर्यंत दमछाक झाली,घामाच्या धारा चालू झाल्या होत्या.गुहेपर्यंत पोहोचायला ३-३.३० वाजले.मध्ये एका ठिकाणी गडाची माहिती दिलेली होती.सातवाहनकालीन बांधकाम असलेली जोडगोळी गोरख आणि मच्छिंद्रगड.मधल्या टप्प्यावर एक साधूबाबा आणि त्यांची कुटी लागते.

       गुहा तशी प्रशस्त आहे.चाळीसजण सहज मावतील.आम्ही sleeping bags काढल्या आणि गार वाऱ्यात पहुडलो.सकाळी ६.३० वाजता जाग आली.बरंच उजाडलं होतं.बाटली घेऊन बाहेर पडलो पण जागेची पंचाईत होती.तिथेच एक जागा बघून उरकून घेतलं.पण आमच्यातले “Andy” महाशय थोडे पुढे गेले आणि येताना मधमाशा घेऊन आले.किशोर काकांनी सांगितलं,तसे संजय काका आणि सचिन त्याच्याकडे धावले.तो आल्यावर आम्ही सर्वानी आमचं शरीर झाकून घेतलं ,जमिनीवर आडवे झालो,धूर केला.तरी काही जणी त्याचा पिच्छा सोडत नव्हत्या.त्याने तशाच अवस्थेत घोंगडी गुंडाळून नाश्ता केला.चहा आणि उपमा वृषालीने मस्त केला होता..GAS  वर आणण्याचे सार्थक झाले.      

ओळख परेड चालू झाली तसे मोशे,काका आणि मोनिश दोर बांधायला पुढे गेले.slings, anchor आणि  helmet सोबत घेऊन पाच-पाच जणांणी चढायला सुरुवात केली.वाठारे काका सोबतीला होतेच.काही वेळातच सगळे शिखरावर डेरेदाखल झालो.दोन-तीन सावलीपुरती झाडे आणि शंकराचे सुंदर मंदिर मन प्रसन्न करीत होते.मच्छिंद्रगाडाचा सुळका पाठीमागे होताच.थोडासा नाश्ता आणि विश्रांती घेतल्यावर उतरायला सुरुवात केली.रस्ता निमुळता आणि पायऱ्या कठीण असल्याने वेळ लागत होता.बारा वाजेपर्यंत गुहेत परतलो.

       आता सगलळे जेवणावर तुटून पडले.माझ्याकडची बाकरवडी,खाकरा,चटणी रात्रीच संपले होते.अश्विनी आणि सचिन SPECIAL मुळे जेवणात मजा आली.पुरणपोळी,गुळपोळी सर्व पदार्थ उपलब्ध होते!!थोडी विश्रांती घेऊन,ट्रेकक्षितिज ची माहिती ऐकुन उतरायला सुरुवात केली.डोक्यावर सुर्यराज,तापलेले दगड,ताशीव पायऱ्या आणि पाठीवर ओझं.

       तरी सर्वानी पटापट COVER केलं.डॉक्टर,किशोर काका,रुचिर सगळे व्यवस्थित उतरत होते.सतत पाण्याचे घोट घेत,पायऱ्या शांतपणे  उतरलो.रात्री कळलं नसलं तरी तशा पायऱ्या कठीणच होत्या.आणि हो,गुहेच्या मागील बाजूस एक गुहा आहे तेथील मूर्ती पाहण्यासारख्या आहेत.

     उन्हं डोक्यावर आली होती.रखरखाट जाणवत होता .शेजारी सिद्धगड साथ देत होता.पायथ्याच्या मंदिरात पोचायला पाच वाजले.गावातच मस्तपैकी चहा आणि पोहे खाल्ले(मी आणि संजय काकाने राहिलेली पुरणपोळी संपवली).आवरून मुंबईकडे कुच केले.आज मुंबईच्या रहदारीचा खरा प्रत्यय आला .कल्याणला मी ,प्रथमेश आणि सव्या उतरलो.खूप अडनिड्या वेळेत आलो होतो.खूप विचार करून TAXI ने कळंबोली आणि तिथून पुणे असा प्रवास करावा लागला.उलट-सुलट पडलं जरा...पण ट्रेकसाठी काहीपण.सोबत दोन मुली होत्या त्यांनी पुण्याला न येता मुंबई मधेच त्यांच्या घरी जाण्याचं ठरवल..


     उन्हाळ्यातील एक ट्रेक चा मस्त अनुभव आला.शरीराची तंदुरुस्ती जोखता आली.तलाठी म्हणून शेवटचा ट्रेक ठरला कारण ३०/०३/२०१६ ला राजीनामा दिला होता!!! ट्रेक लीडर सचिन लादे,सव्यसाची आणि संजय काकांचे आभार.मधमाश्यांचे प्रात्यक्षिक पाहायला मिळाले.आनंदला नंतर बरं वाटायला लागलं म्हणून बरं ,नाहीतर सगळ्यांचीच वाट लागली असती!!!  

Back to Top
Sponsored Links


Back to Top
 Post Reply Post Reply
  Share Topic   

Forum Jump Forum Permissions View Drop Down

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd.

This page was generated in 1.359 seconds.