Forum Home Forum Home > Adventure Forum > Monsoon Trekking
  New Posts New Posts RSS Feed - Bho - Bhi trek
  FAQ FAQ  Forum Search   Events   Register Register  Login Login


Bho - Bhi trek

 Post Reply Post Reply
Author
Message
 Rating: Topic Rating: 1 Votes, Average 5.00  Topic Search Topic Search  Topic Options Topic Options
devadeshmukh View Drop Down
Newbie
Newbie
Avatar

Joined: 05 Aug 2015
Location: Navi Mumbai
Status: Offline
Points: 17
Post Options Post Options   Thanks (1) Thanks(1)   Quote devadeshmukh Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Topic: Bho - Bhi trek
    Posted: 05 Aug 2015 at 7:44am
दाट जंगलाच्या वाटेने भीमाशंकर (Bho-Bhi trek)

भोरगिरी - भिमाशंकर - खांडस हा प्राचिन व्यापारी मार्ग आहे. या मार्गाने कल्याण बंदरात उतरणारा माल त्याकाळी घाटावर जात असे. भिमाशंकर पायथ्याचे खांडस बाजुचा पदरगड आणि राजगुरुनगर जवळ असलेला भोरगिरी (भंवरगिरी) हे दोन प्राचिन किल्ले ह्या मार्गाचे रक्षण करण्यासाठी बांधलेले किल्ले. तसच, भिमाशंकर आणि भोरगिरी च कोटीश्वर मंदिर ही विश्रांती स्थान होती.

वारकरी ज्या भावनेने विठुरायाकडे पंढरीच्या वारीसोबत पायी चालत जातात, अगदी त्याच भावनेने अनेक जण ‘भोरगिरी ते भीमाशंकर’ यासारखा भन्नाट ट्रेकरूट निवडतात. या दोन्ही भावनेत फरक इतकाच की वारक-यांना पायी चालण्याची ओढ विठुरायाच्या दर्शनासाठी म्हणजेच भक्तीची असते तशीच आमच्यासारख्या ट्रेकर्सना असते ती ओढ निसर्गाच्या प्रेमाची अन् त्याला कवेत घेण्याची. त्यामुळेच डोक्यावर धो-धो पाऊस कोसळत असताना, चिखलवाट तुडवत जाताना, भीमा माई चा प्रवाह पार करताना, पक्ष्यांचे मधुर आवाज ऐकताना, निसर्गाला जवळून अनुभवताना चालत राहणं किती आनंददायी असतं हे इथं आल्याशिवाय बहुधा कधीच कळणार नाही.

भोरगिरी गाव भीमा नदी काठी वसलेले असून छोट्या छोट्या टेकड्यांनी घेरलेले आहे . पावसाळयात या गावाच्या अवती-भोवती जणू धबधब्यांची जत्राच भरलेली असते. पुण्याहून जवळ असल्यामुळे बरीच मंडळी इथे मस्ती करायला येतात.

पण आमच्यासाठी भोरगिरी महत्वाचे आहे ते इथे असलेल्या किल्ला, कोटेश्वर शिव मंदिर आणि इथून भीमाशंकर ला दाट जंगलातुन जाणाऱ्या वाटेमुळे .

हा ट्रेक चालू होतो ते भोरगिरी गावातून.....सर्वप्रथम गावातील कोटेश्वर शिव मंदिर पहावे आणि पुढेच गावाच्या मागे दिसणाऱ्या किल्ल्याकड़े निघावे, मध्ये बरेच धबधबे नजरेस पडतात. काही मिनिटातच आपण किल्ल्याच्या पायथ्याशी येउन पोहचतो. गडावर गडपणाचे तुरळक अवशेष आहेत. गडाच्या दक्षिण अंगाला लेणी कोरलेली आहेत. गडाच्या माथ्यावर पाण्याची टाकी आहेत. दोन मोठ्या गुहा, मंदिरे तसेच किल्ल्यावर विरगळी व जागोजागी विखुरलेले काही अवशेष पण पहायला मिळतात. संपूर्ण किल्ला पहायला एक तास पुरेसा.

किल्ला पहायचा आणि निघयच भीमाशंकर च्या वाटेने, मध्ये पठारावरून जाणारा रास्ता, दाट जंगल, पक्ष्यांची किलबिल ऐकत आपण येउन पोहचतो ते भीमा नदीच्या प्रवाहाजवळ. नदी संभाळत पार करायची आणि पुन्हा जंगलाची वाट पकडायची. थोड्याच वेळात गुप्तंभीमाशंकर जवळ येउन पोहचतो, महादेवाचे दर्शन घायचे आणि निघायचे पुढे.
जंगलातुन जाताना पक्ष्यांचे मधुर आवाज़ ऐकता ऐकता भीमाशंकर कधी आले ते माहितच नाही पडत. पण पाण्यासोबत वाहत येणारा कचरा आपल्याला आपण भीमाशंकर ला पोह्चल्याची जाणिव करून देतो.

Edited by devadeshmukh - 05 Aug 2015 at 7:51am
Back to Top
Sponsored Links


Back to Top
amitsamant View Drop Down
Moderator Group
Moderator Group
Avatar

Joined: 16 Jun 2012
Location: Dombivali
Status: Offline
Points: 738
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote amitsamant Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Posted: 05 Aug 2015 at 11:23am
देवेंद्र
चांगल लिहील आहेस. फोटो टाकलेस तर अजुन मजा येइल.
Back to Top
 Post Reply Post Reply
  Share Topic   

Forum Jump Forum Permissions View Drop Down

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd.

This page was generated in 1.432 seconds.