| Common Sailor Butterfly | 
| Post Reply   | 
| Author | |
| amolnerlekar   Senior Member     Joined: 21 Jan 2013 Location: DOmbivali Status: Offline Points: 159 |  Post Options  Thanks(0)  Quote  Reply  Topic: Common Sailor Butterfly Posted: 24 Nov 2014 at 2:55pm | 
| 
   भटके तांडेल  'व्यक्ती तितक्या प्रकृती' अशी आपल्याकडे मराठीत म्हण आहे; परंतु ट्रेक करताना किव्वा निसर्गात फिरताना आपल्याला 'व्यक्ती तितक्या आवडी' असे म्हणावे लागेल. सह्याद्रीत फिरताना कुणाला आवडतो तो त्याचा इतिहास, कुणाला भौगोलिक रचना, कुणाला प्राणी जीवनाचे वैविध्य तर कुणाला अगदी सहजपणे लक्ष वेधून घेणारे 'भटके तांडेल' सारखे फुलपाखरू… कोवळ्या उन्हात पंख पसरून शांतपणे बसलेले 'भटके तांडेल' (Common Sailor) आपले लक्ष वेधून घेते. नर आणि मादी दिसायला सारखेच असून त्यांचा पंखविस्तार अंदाजे ५ ते ६ से.मी. पर्यंत असतो. पंखांचा रंग काळा असून त्यावर पांढर्या ठिपक्यांनी मिळून तयार झालेले तीन पट्टे असतात. पंखांचा खालिल भाग बदामी रंगाचा असतो. पंखांच्या कोपर्यावर असणारी काळ्या-पांढर्या रंगाची बारीक झालार त्याच्या रूपात सौंदर्य भरवते.  याचा वावर शेवरी आणि मुरुडशेंग ह्या वनस्पतींवर प्रामुख्याने आढळतो. अंडी ०.९ मि.मी. आकाराची असून गोलाकृती असतात. अंडी उबायला साधारणत: ३ ते ४ दिवस लागतात आणि त्यानंतर बाहेर पडणारे सुरवंट लांबीला २.२ मि.मी. आणि रंगाने हिरवट असून त्यावर फिकट तपकिरी ठिपके असतात. पुढील साधारण २२ दिवसात ह्याची वाढ पूर्ण होते आणि त्याची लांबी २५ मि.मी. इतकी होते. पुढील २ दिवसात सुरवंटाचे फुलपाखरू होऊन ते उडण्यासाठी तयार होते.  भटके तांडेल अलगद आणि हळुवार उडते आणि म्हणून कदाचित त्याला 'sailor' असे म्हणले जात असावे. Common Sailor दक्षिण आशिया आणि भारतात सर्वत्र आढळते. बाकी काही फुलपाखरान्प्रमाणेच ह्याचा पंखांचा उपयोग नैसर्गिक रंग बनविण्यासाठी होतो.    Scientific name : Neptis hylas Class/ Family : Insecta / Nymphalidae संदर्भ : महाराष्ट्रातील फुलपाखरे (डॉ. राजू कसंबे), www.google.com. -- अमोल नेरलेकर । २४.११.२०१४  Edited by amolnerlekar - 24 Nov 2014 at 2:56pm | |
|  | |
| Sponsored Links | |
|  | |
| dipali   Newbie   Joined: 21 Nov 2014 Location: mumbai Status: Offline Points: 18 |  Post Options  Thanks(0)  Quote  Reply  Posted: 24 Nov 2014 at 3:03pm | 
| 
   Sundar lihile ahes...
    | |
|  | |
| amitsamant   Moderator Group     Joined: 16 Jun 2012 Location: Dombivali Status: Offline Points: 738 |  Post Options  Thanks(0)  Quote  Reply  Posted: 24 Nov 2014 at 3:24pm | 
| 
   मस्त 
    | |
|  | |
| amitsamant   Moderator Group     Joined: 16 Jun 2012 Location: Dombivali Status: Offline Points: 738 |  Post Options  Thanks(0)  Quote  Reply  Posted: 24 Nov 2014 at 3:27pm | 
| 
   मस्त, अमोल.
    | |
|  | |
| Post Reply   | |
| Tweet | 
| Forum Jump | Forum Permissions  You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot delete your posts in this forum You cannot edit your posts in this forum You cannot create polls in this forum You cannot vote in polls in this forum |