| शिवरायांची तलवार क | 
| Post Reply   | 
| Author | |
| ravindra909   Newbie   Joined: 03 Feb 2016 Location: chiplun Status: Offline Points: 10 |  Post Options  Thanks(0)  Quote  Reply  Topic: शिवरायांची तलवार क Posted: 03 Feb 2016 at 9:58pm | 
| जिजा मातेच्या कुशीत एक जन्मा आला वीर शिवरायांची तलवार करी दृष्टांचा संहार ।। धृ ।। रयतेच्या हितासाठी ते स्वराज्य उभारले पित्या परी करून माया हे नाते जोडले जाती पातीला गाडून मातीत केला समतेचा पुकार शिवरायांची तलवार करी दृष्टांचा संहार ।। १ ।। यवनांचे अत्याचार होती दिवसांना अन राती ब्राह्मणांची कपटनीती ती यवनांच्या सोबती उभ केल ते स्वराज्य करण्या रयतेचा उद्धार शिवरायांची तलवार करी दृष्टांचा संहार ।। २ ।। स्वराज्याचे बांधले तोरण जातिभेदाला छेदून रयतेचे जपले हित सारी धर्मशास्त्रे मोडून ब्राह्मणशाही ती हादरली पाहून जनतेचा जागर शिवरायांची तलवार करी दृष्टांचा संहार ।। ३ ।। सह्याद्रीच्या वाघाला घाबरला तो दिल्लीपती रयतेच्या सुखासाठी उभा एकला छत्रपती राजे पदाचा केला ना गर्व घेतला रयतेचा कैवार शिवरायांची तलवार करी दृष्टांचा संहार ।। ४ ।। राजेशाहीत शिवरायांनी लोकशाही ती पेरली भीमरायाच्या मुखातून हि वाणी अशी वदली रवि सांगतो या आजला तो शिवबाचा सरदार शिवरायांची तलवार करी दृष्टांचा संहार ।। ५ ।। गीत : रवींद्र सावंत चाल : आहे कोणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला | |
|  | |
| Sponsored Links | |
|  | |
| Post Reply   | |
| Tweet | 
| Forum Jump | Forum Permissions  You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot delete your posts in this forum You cannot edit your posts in this forum You cannot create polls in this forum You cannot vote in polls in this forum |