| कुकरी | 
| Post Reply   | 
| Author | |
| amitsamant   Moderator Group     Joined: 16 Jun 2012 Location: Dombivali Status: Offline Points: 738 |  Post Options  Thanks(0)  Quote  Reply  Topic: कुकरी Posted: 16 Jun 2012 at 8:36pm | 
| 
 कुकरी हे नेपाळी शस्त्र आहे. कुकरी ६ इंचपासून २४ इंचापर्यंत लांब असते. कुकरीचे पाते रुंद व अंतर्वक्र असते. या शस्त्राची धार आतल्या बाजूस असते. पात्याचा आकार वैशिष्ट्यपूर्ण असतो, पाते मुठी जवळ अरुंद असते व पुढे विशिष्ट कोन देऊन आतल्या बाजूस वळवलेले असते. या कोनापासून कुकरीचे पाते रुंद होत जाऊन टोकाला पुन्हा निमुळते व टोकदार होते. पात्यावर आतल्याबाजूस एक वैशिष्ट्यपूर्ण खाच असते, ती म्हणजे पवित्र त्रिशुळाची खूण होय. कुकरीने वरून खाली प्रहार करुन मारतात, तसेच पात्याच्या टोकाला पकडून भिरकवतात त्यामुळे कुकरी गोल गोल फिरत जाऊन प्रहार करते. भारतीय सैन्यातील गुरखा बटालियनच्या बोधचिन्हात कुकरी आहे. कुकरी हे शस्त्र म्हणून वापरले जात असले तरी, नेपाळमध्ये कुकरीचा उपयोग घरगुती कामातही (झाडे तोडणे, मांस, भाज्या कापणे) होतो. कुकरीचे त्याच्या उपयोगा प्रमाणे दोन प्रकार पडतात. युध्दासाठी वापरल्या जाणार्या कुकरीला ‘‘सिरोपेट’’ म्हणतात. तर दैनंदिन वापराच्या कुकरीला ‘‘बुधनी’’ म्हणतात. कुकरीला नेपाळमध्ये धार्मिक विधित वापरतात. नेपाळमधील ‘कामी’ व ‘विश्वकर्मा’ या जमातीचे लोक कुकरी बनविण्यात कुशल असतात. कुकरीची मूठ, बैलाचे शिंग, लाकुड यापासून बनवितात. त्यावर लाखेचा थर दिला जातो. हल्लीच्या काळातील कुकरीची मूठ प्लास्टिक, अल्युमिनिअम, लाकुड यापासून बनवितात, तर पाते ट्रकच्या पाट्यापासून तयार करतात. कुकरीचे म्यान सरकीच्या लाकडा पासून बनवितात.पहिल्या व दुसर्या महायुध्दात या शस्त्राचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला. 
 Edited by amitsamant - 12 Feb 2014 at 1:21pm | |
|  | |
| Sponsored Links | |
|  | |
| Post Reply   | |
| Tweet | 
| Forum Jump | Forum Permissions  You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot delete your posts in this forum You cannot edit your posts in this forum You cannot create polls in this forum You cannot vote in polls in this forum |