Print Page | Close Window

शिवरायांची तलवार क

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: कविता संग्रह
Forum Description: पोवाडे, कविता आणि स्फूर्ती गीते
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=346
Printed Date: 22 Jan 2025 at 1:14pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: शिवरायांची तलवार क
Posted By: ravindra909
Subject: शिवरायांची तलवार क
Date Posted: 03 Feb 2016 at 9:58pm

जिजा मातेच्या कुशीत एक जन्मा आला वीर

शिवरायांची तलवार करी दृष्टांचा संहार  ।। धृ ।।

रयतेच्या हितासाठी   ते स्वराज्य उभारले

पित्या परी  करून  माया  हे नाते जोडले

जाती पातीला गाडून मातीत केला  समतेचा पुकार

शिवरायांची तलवार करी दृष्टांचा संहार    ।। १ ।।

यवनांचे अत्याचार होती दिवसांना अन राती

ब्राह्मणांची कपटनीती ती यवनांच्या सोबती

उभ केल ते स्वराज्य करण्या रयतेचा उद्धार

 शिवरायांची तलवार करी दृष्टांचा संहार   ।। २ ।।

स्वराज्याचे बांधले तोरण जातिभेदाला छेदून

रयतेचे जपले हित सारी धर्मशास्त्रे मोडून

ब्राह्मणशाही ती हादरली पाहून जनतेचा जागर

शिवरायांची तलवार करी दृष्टांचा संहार     ।। ३ ।।

सह्याद्रीच्या वाघाला घाबरला तो दिल्लीपती

रयतेच्या सुखासाठी उभा एकला छत्रपती

राजे पदाचा केला ना गर्व घेतला रयतेचा कैवार

शिवरायांची तलवार करी दृष्टांचा संहार     ।। ४ ।।

राजेशाहीत शिवरायांनी लोकशाही ती पेरली

भीमरायाच्या मुखातून हि वाणी अशी वदली

रवि सांगतो या आजला तो शिवबाचा सरदार

शिवरायांची तलवार करी दृष्टांचा संहार  ।। ५ ।।


गीत : रवींद्र सावंत

चाल :  आहे कोणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला





Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk