ट्रेक 'असावा'
Printed From: TreKshitiZ
Category: Nature
Forum Name: Flora and Fauna In Sahyadri
Forum Description: Information regarding medicinal herbs,details regarding flowers,useful trees can be shared in this forum
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=145
Printed Date: 27 Jan 2025 at 3:12am Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com
Topic: ट्रेक 'असावा'
Posted By: amolnerlekar
Subject: ट्रेक 'असावा'
Date Posted: 01 Apr 2013 at 12:33pm
'..आणि मग थंडीचे दिवस असूनही सकाळी ४ ला जाग येते..रोजचे तेच रेल्वे स्टेशन..पण आज नाईलाज म्हणून नाही तर स्वेच्छेने गाडीची वाट पहावीशी वाटते..
..अजूनही चांदण्यातच आहे ही पहाट..प्रसन्न थंडीची झुळूक..आजची गाडी वेगळी..तिच्या वाटेवर लागणारी स्टेशनही वेगळी..आजची वाटही वेगळी..आणि त्यात काही मित्र-मैत्रिणीही..पण तरी सारं आपलंस वाटत..
..मिसळ आणि चहा तर हवाच..पण 'सिंगल मेंन्दू वडा'ही काही औरच..
..ट्रेक चालू होतो..त्यासोबत गप्पा-गोष्टीही..तोवर 'कॅमेरा'ला ही जाग आली असते..आणि मग त्या गप्पा-गोष्टी आणि क्षणांना चिरतरुण करून ठेवण्याचा प्रयत्न होतो..
..आज ऊनही हलके वाटत आहे आणि त्यात वाहणारा वारा सुखद..ती मोकळी हवा नसा-नसांत भरून घ्यावीशी वाटते आणि तो निसर्ग डोळ्यातील प्रत्येक कोपऱ्यात..
..चढ-उतार तर इथेही असतात..पण इथे क्षणभर थांबल्यावर आपल्याला आपल्या हृदयाची खरी हाक नक्की ऐकायला येते..
..एव्हाना चांगलीच भूक लागलेली असते आणि मग एकाच जेवणात एवढ्या प्रकारच्या पाककृती खायला मिळतात..
..थोडा आराम करून परतीचा प्रवास सुरु होतो..ऐन सकाळी पूर्वेकडल्या रुसलेल्या त्या रोपांत आता नवीन चैतन्य आणि तेज पहायला मिळते..पठारावरील सरळ चालणीची वाट अशावेळी जवळीक साधते..तहान पाण्याचा 'खरा' अर्थ सांगून जाते..आणि खूप वेळ वाट पाहिल्यावर जेव्हा पाण्याचा 'ओहोळ' दिसतो तेव्हा वाटत, 'सुख' ह्यापेक्षा फार काही वेगळं नाही..
..परतीचा प्रवास आणि गाणी ह्यांचे कुठेतरी अतूट नाते असावे..इथे दरवेळी 'षड्ज' लागतही नसेल कदाचित..पण प्रत्येक गाणे कानांत साठवून ठेवावेसे वाटते..
..डोंबिवलीत येऊन ट्रेक संपलाही असतो तोवर..पण गप्पा अजूनही तरुण असतात..गाणी श्रवणीय असतात..क्षण अविस्मरणीय..आणि मागे उरते ते त्या दमलेल्या चेहऱ्यावरही फुललेले एक...समाधान !!
..ट्रेक 'असावा' तर असा..'
--अमोल पालघर, १३.०१.२०१३ ९९६७८४८१२४
|
Replies:
Posted By: Deepali Lanke
Date Posted: 06 Apr 2013 at 11:49am
Hi,
Amazing lines...short but sweet.Good efforts!!!
|
Posted By: vaibhav.sakpal
Date Posted: 26 Apr 2013 at 10:40pm
Good
------------- Vaibhav Sakpal
|
|