Print Page | Close Window

असे हे आमचे ऐतिहास

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: Articles on Indian History
Forum Description: Articles on Indian History
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=270
Printed Date: 27 Jan 2025 at 6:08am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: असे हे आमचे ऐतिहास
Posted By: Deepali Lanke
Subject: असे हे आमचे ऐतिहास
Date Posted: 06 Oct 2014 at 10:11am
                     असे हे आमचे ऐतिहासिक पुणे भाग -१

                                                                                                                                                                 -Deepali Lanke 16th April 2014

पुणे शहराला ऐतिहासिक महत्व असून; शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्याती आहे. अशा या ऐतिहासिक शहरात पाहण्यासारखे खूप स्थळ,वास्तू संग्रहालय,प्राचीन मंदिरे आहेत. अशाच या अभ्यासपुर्ण भेटीत आम्ही ५ जणांनी ( आरती दुगल , अंकिता आंबेरकर,प्रकाश खाडे ,गणेश भंडारे आणि मी ) दगडू शेठ हलवाई,केळकर संग्रहालय,पर्वती आणि सारसबागेस भेट दिली. त्याचाच हा वृतान्त पुढीलप्रमाणे मांडला आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई :-

श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची रहावयाची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही व्यथीत झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की, आपण काही काळजी करू नका, आपण श्री दत्त महाराज व श्री गणपतीची मुर्ती तयार करा व त्याची रोज पुजा करा व ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्वल करतील. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी श्री दत्त महाराजांची एक संगमरवरी व श्री गणपतीची मातीची मुर्ती बनविली व ती गणपती बाप्पाची मुर्ती म्हणजेच आपली पहिली मुर्ती होय. ही पहिली मुर्ती आज सुध्दा आपण शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमाने पुजा चालू आहे. ह्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर, गणपतराव विठूजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायणराव दरोडे यासह सर्व थरातील लोकांनी एकत्र येऊन या समारंभाची मंगलज्योत प्रदिप्त केली. तिच्या मंद पण तेजस्वी प्रकाशात आसमंत उजळून निघाले. भक्तिची धूप आणि श्रध्देची निरांजन लावून ही जी पुजा त्यांनी केली त्यास सर्व थोर लोकांनी मनोमन आर्शिवाद दिले आणि अशा रितीने ही मंगल परंपरा सुरू झाली.

 

सन १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली. सन १८९६ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मुर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतू त्यांनी निर्माण केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी, तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. त्याकाळी हा गणपती कै. श्री. दगडूशेठ हलवाई बाहूलीचा हौद, सार्वजनिक गणपती म्हणून प्रचलित होता. या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरूण मंडळ करीत होते. सध्या ही मुर्ती आपल्या बाबुराव गोडसे कोंढवा येथील पिताश्री वृध्दाश्रमातील मंदिरात आहे. 

दर्शनानंतर आम्ही राजा दिनकर केळकर संग्रहालयाकडे वाटचाल केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई पासून केळकर संग्रहालय १० मिनिटांच्या अंतरावर आहे.आम्ही पार्किंग चा त्रास होईल यामुळे चालतच प्रयाण केले.अगदी क्षुल्लक फी भरून आम्ही इतिहासाच्या गाभार्यात पदार्पण केले.( कॅमेरातून फोटो काढण्यासाठी २०० रुपये. आणि ७५ रुपये मोबाईल कॅमेरातून काढण्यासाठी तर विदेओ शूटिंग करण्यासाठी ५०० रुपये शुल्क होते).

राजा दिनकर केळकर संग्रहालय: 

१८९६ साली करंजे( पश्चिम महाराष्ट्र ) गावी जन्मलेल्या व पुढे कवी अज्ञातवासी म्हणून प्रसिद्ध झालेल्या काकासाहेब केळकर यांनी ६५ वर्ष भारतभर भ्रमंती करून एकत्र केलेल्या शिवकालोत्तर हिंदुस्थानचा  इतिहास सांगणाऱ्या जवळ जवळ २०,००० वस्तूंचा हा संग्रह अत्यंत काळजीपूर्वक जतन करून ठेवलेल्या या संग्रहामध्ये एकूण ९ दलाने असून ४० विभाग आहेत.त्यामध्ये वनिता कक्ष,स्वयंपाक घरातील भांडी,वस्त्र प्रावरणे, दिवे,अडकित्ते ,दौती,खेळणी,वाद्य,मस्तानी महाल,हस्तिदंत,दरवाजे इत्यादी विभागातील आकर्षक विशिष्ट वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे.अर्थात जागेअभावी सध्या केवळ १२% वस्तूच प्रदर्शित करणे शक्य झाले आहे.असे असून सुद्धा महाराष्ट्राचा व एकूणच संपूर्ण भारताचा गेल्या कित्येक वर्षांचा इतिहास दृष्टीसमोर आणण्याचे महत्वाचे कार्य हे संग्रहालय करीत आहे.भूतकालीन वस्तूंच्या येथील जतानामुळे डॉक्टर केळकर यांनी भारतीय संस्कृती चा हा ठेवा वर्तमान काळी जागृत राहून भविष्याकालासाठी उपलब्ध करून व भारताचे भूषण नसून ते एका माणसाने उभे केलेले जागतिक स्तरावरील महान कार्य आहे असे थोडक्यात म्हणता येईल.

मस्तानी महाल : मस्तानी हि शूर सेनानी थोरले बाजीराव पेशवे यांची प्रेयसी आणि बुंदेल खंडाचे (मध्यप्रदेश) राजा छत्रसाल बुंदेला यांची मानसकन्या होय.मस्तानी हि अतिशय सुंदर आणि शूर स्त्री म्हणून परिचित होती.थोरले बाजीराव पेशव्यांनी आपल्या प्राणप्रिया मस्तानी साठी पुण्याजवळ असलेल्या कोथरूड येथे १७३४ मध्ये महाल बांधला सद्य स्थितीला तो नामशेष झाला आहे,तोच हा मस्तानी महाल.राजा दिनकर केळकर संग्रहालायचे संस्थापक डॉक्टर दिनकर केळकर यांनी हा एतिहासिक महाल कुशल कारागीरांच्या मदतीने सोडवून आणून त्याची या ठिकाणी पुन्रार्बंधानी केली आहे.या महालाद्वारे आपणास आपल्या दैदिप्यमान वैभवाचे दर्शन घडते.

इतिहासाच्या आठवणी मनात साठवून आम्ही अप्पा बळवंत चौकात परतलो. आणि पर्वती चा प्रवास चालू झाला.

पर्वती:

पर्वती हि एक फक्त टेकडी नसून हे नंसाहेब पेशवे देह ठेवल्याच स्थान आहे.साधारणतः:जमिनीपासून २१०० फुटावर असणाऱ्या पर्वतीवर देवदेवेश्वराच्या मुख्य मंदिराशिवाय कार्तिकेय, विष्णू ,विठ्ठल-रुक्मिणी इत्यादी दैवतांची मंदिरे आहेत. यांपैकी कार्तिकस्वामी मंदिर, श्रीविष्णू मंदिर, होमशाळा इत्यादी इमारती देवदेवेश्वर मंदिरानंतरच्या काळात बांधल्या गेल्या. पानिपतच्या तिसऱ्या लढाईतील मराठ्यांच्या प्रचंड हानीमुळे खचून गेलेल्या नानासाहेब पेशव्यांचे प्राणोत्क्रमण जून, इ.स. १७६१मध्ये येथील होमशाळेत झाले. तसेच नानासाहेब यांनी मुन्जादेवाची प्रतिष्ठापना केलेले ठिकाण देखील पहावयास मिळते तसेच नानासाहेब पेशव्यांची समाधी बांधण्यात आली असून चित्र रूपात आणि पेशव्यांच्या वंशवालीसह जागृत पणे ठेवण्यात आली आहे.सगळी माहिती आणि इतिहास वाचून मन भारावून जाते.

सूर्यास्त पाहण्यासाठी आणि आपल्या कॅमेरात चित्रस्वरुपि बद्ध करण्याची गणेश भंडारे ची धडपड अगदी कमी आली आणि सुंदर अशा पुणे शहराचे दर्शन सूर्यास्ताच्या वेळी कॅमेराबद्ध झाले.

भुकेले आणि माहिती मनात साठवून थकलेले आम्ही खाण्याच्या शोधार्थ पर्वती कधी उतरलो कळलंच नाही आणि सारसबागेत जाण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर मोहीम सारसबागेच चालू झाली पार्किंग च्या शोधानंतर अखेरीस आम्ही कल्पना पावभाजी सेंटर ला पोहचलो आणि मस्त भेल आणि मंगो मस्तानी फस्त केल्यावर सारसबागेतील गणपतीच्या दर्शनाला निघालो यावेळी आधी पोटोबा मग विठोबा या ओळी सार्थ ठरवल्या.

सारसबाग:

श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पर्वतीच्या पायथ्याशी सन १७५० साली आंबील ओढयाच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव तयार करण्याचे काम सुरू झाले. तलावाचे काम सन १७५० ते १७५३ या कालावधीपर्यंत चालले होते. त्या तलावाचे क्षेत्र अंदाजे २५ एकर एवढे विस्तीर्ण होते. या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी करण्यात येत होता. तलावात सारस पक्षी सोडले होते. तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे २५००० चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग-बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आले. त्या नंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेचे काव्यात्मक ' सारस बाग ' असे नामकरण केले. श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन १७८४ साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली. साहजिकच पर्वती, सारस बाग आणि तलाव ही पुणेकरांची फिरावयास येण्याची व देवदर्शनाची ठिकाणे झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात सन १८६१ च्या सुमारास शहरातील अनेक जागा पुणे नगरपालिकेकडे देण्यात आल्या . त्यावेळी गणपती मंदिराचे बेट सोडून तलावाची जागा मुंबई सरकारने पुणे नगरपालिकेकडे हस्तांतरित केली. पुणे नगरपालिकेकडून साधारण सन १९६६ साली तलावाचे जागेत उद्यान विकसित करण्यात आले.

गणपतीचे दर्शन घेवून मूर्ती मनात साठवून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो आणि शिवाजी नगर ते दापोडी हे अंतर अंकिताच्या जुपीटर वर ट्रिपल सीट ( तोम्या मामा ला ) ट्राफिक हवालदार ला चुकवत सिख्रूप आठवणी मनात साठवत घरी पोहचलो.

 




Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk