Print Page | Close Window

peth fort (kothaligad)...

Printed From: TreKshitiZ
Category: Historical and Trekking Destinations of India
Forum Name: Trekking Destinations
Forum Description: Visitors can post requests / information of any trekking destination on this globe.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=314
Printed Date: 15 Jan 2025 at 6:38pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: peth fort (kothaligad)...
Posted By: kushal deolekar
Subject: peth fort (kothaligad)...
Date Posted: 28 Jan 2015 at 2:51pm

||ते म्हणतात ना सह्याद्रीचे डोंगर- कडेकपाड्या  एकदा पाहिल्या कि त्या वेड लावल्याशिवाय  राहत नाही.. ||

आम्ही मित्रमंडळी(कुशल,कौस्तुभ,गौरव, अमेय समीर,विनीत,कन्नन )लोहगड /तिकोना ट्रेक करून फारच उत्साही झालो होतो ते लवकरच दुसरा ट्रेक करण्यासाठी ....
सुट्टीसुद्धा सुरूच होती त्यामुळे आम्ही वन-डे ट्रेक चा प्लान करत होतो . पण कोणता ट्रेक करावा जो आम्हाला सोईस्कर व कमी खर्चात पडेल असा प्रश्न आम्हा मित्रांसमोर उभा होता.पण तेव्हा माझा मित्र कौस्तुभ याला कुठून तरी कळलं की "स्वस्त आणि मस्त पेठ चा किल्ला ".पेठ च्या किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे कोथळीगड. कारण डोंगराचा सुळका कोथला बाहेर पडतो त्या प्रमाणे बाहेर आहे म्हणून या गडाचे नाव "कोथळीगड" पडले आहे असे बरेच जण सांगतात.आणि मग ठरले की "ट्रेक टू कोथळीगड".


मग तारीख /वार ठरला ... आणि अखेर तो दिवस उजाडला. ७ जुलै २००९ . आम्ही डोम्बिवलीकर असल्यामुळे सकाळी डोंबिवली स्टेशनहून ७.४३ ची कर्जत लोकॅल आम्ही पकडली व नेरळ स्टेशन ला उतरलो . नेरळ मधील रहिवाशांना विचारून आम्ही गडाकडे जाण्याच्या मार्गाला लागलो.किल्ल्याला जाण्यासाठी प्रथम नेरळहून कशेळे टम- टम (रिक्षा)केली.नेरळ ते कशेळे १२ किमी आहे.आणि आमचा प्रवास सुरु झाला. रस्त्याच्या दुतर्फा सुंदर हिरवागार निसर्ग आणि मधून मधून कोसळणाऱ्या पावसाचा सरी डोळ्यांना सुखावत होत्या .थोड्याच वेळात आम्ही कशेळे गावात पोहचलो .तेथून आम्हाला आंबिवली गावाला जायचे होते कारण गडावर जाण्यासाठी तेथूनच वाट आहे.मग आम्ही कशेळे ते आंबिवली दुसरी टम-टम(रिक्षा)केली. कशेळे ते आंबिवली अंतर १० किमी आहे.असा प्रवास करून आम्ही एकदाचे आंबिवली गावात पोहचलो .


तेथून आमचा किल्ल्याकडे जायचा पायी प्रवास सुरु झाला १० मिनिटे डांबरी रस्त्यावरून चालल्यानंतर त्या रस्त्याची जागा मातीच्या रस्त्याने घेतली





आणि मग रस्त्याच्या दुतर्फा वनराई सुरु झाली .आम्ही सर्वे चालत होतो .रस्ता तसं- तसा वर चढत होता .गप्पा-गोष्टी करत करत आम्ही चालत होतो .



साधारण एक /दीड तास चालल्यानंतर आम्ही एका ठिकाणी पोहचलो तेथून आम्हाला पेठचा किल्ल्याचा सुंदर देखावा दिसला तेथे थांबून थोडावेळ ५-१० मिनिटे आराम करून फोटो काढून आम्ही पुन्हा प्रवास सुरु केला .


४५-५० मिनिटात आम्ही किल्ल्याचा पायथ्याशी वसलेल्या गावात पोहचलो .मग तेथून गावातील लोकांना विचारून आम्ही किल्ल्यावर जाण्याच्या वाटेने निघालो मग दगडा- दगडांतून असलेल्या पाय वाटेने आम्ही किल्ला चढत होतो.
किल्ला चढत असताना आजूबाजूचा परिसर ,डोंगर,तळी यांचे दुर्श्य दिसत होते .त्यातूनच उनपावसाचा खेळ सुरु होता .


१ तास / दीड तास चढाई केल्यानंतर आम्हाला किल्ल्याची थोडीशी असलेली तटबंदी दिसली आम्ही सर्वेजण आनंदलो तेथून थोड्या पायर्र्या खोदल्या आहेत त्या पटकन चढत चढत आम्ही एकदाचे पोचलो .




तेथून डाव्या बाजूला प्रथम भैरवनाथाचे मंदिर आहे व त्याच्या डाव्या बाजूला डोंगरात कोरलेली गुहा...



मंदिराचा उजव्या बाजूला थोडी पसरट अशी जागा आहे तिथे एक तोफ आहे .



मंदिराच्या एका बाजूने त्या किल्ल्याच्या वरच्या टोकावर जाण्यासाठी डोंगराच्या आतून पायर्या कोरल्या आहेत



त्या चढून आम्ही किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो व आम्ही प्रवेश केला .तेथून माथेरान डोंगर ,तसेच इतर डोंगर ,वनराई असे नयनरम्य दृश्य दिसत होते .तेथे वर एक भगवा ध्वज फडकत आहे. तसेच पुढे गेल्यावर पाण्याचे एक तळे आहे.






पुढे असलेल्या पसरट जागी आम्ही आमचे बस्तान ठेवले मग थोडावेळ आराम करून आम्ही डब्यातून नेलेलं जेवण जेवलो.मग पुन्हा थोडावेळ आराम केला ,फोटो सेशन केले आणि मग परतीचा प्रवासाला निघालो .किल्ला उतरताना जास्ती काही त्रास आणि वेळ गेला नाही लवकरच आम्ही पुन्हा आंबिवली ते कशेळे आणि कशेळे ते नेरळ टम-टम(रिक्षा )करून आम्ही नेरळ ला पोहचलो तेथून ५.०५ ची CST लोकल पकडली व सायंकाळी  ६.३० वाजेपर्यंत  घरी परतलो.  अशा प्रकारे आमचा ट्रेक एकदम मस्त झाला.




Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk