Print Page | Close Window

Wagh Dev (वाघदेव)

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: Information Bits and Bytes
Forum Description: Information Bits and Bytes about history
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=329
Printed Date: 12 Jan 2025 at 7:06pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: Wagh Dev (वाघदेव)
Posted By: amitsamant
Subject: Wagh Dev (वाघदेव)
Date Posted: 11 May 2015 at 4:10pm
वाघदेव 

किल्ले, डोंगर दर्‍या फ़िरताना आदिवासी / वनवासी वस्ती, पाड्याजवळ एखाद्या उभ्या लाकडी फ़ळीवर कोरलेल्या सुर्य - चंद्राच्या प्रतिमा आणि त्याखाली कोरलेली वाघाची प्रतिमा पाहायला मिळते. याला आदिवासी लोक "वाघदेव" म्हणतात. लाल, पिवळा, केशरी या नैसर्गिक रंगात वाघदेवाची प्रतिमा रंगवलेली पाहायला मिळते. काही ठिकाणी वाघाच्या खाली सापाची प्रतिमाही कोरलेली आढळते. जंगलातील हिंस्त्र श्वापदांपासून आदिवासींचे त्यांच्या गाईगुरांचे रक्षण वाघदेव करतो अशी आदिवासींची श्रध्दा आहे. जंगलाशी नेहमीच संबंध येणार्‍या आदिवासींना वाघ, बिबटे इत्यादी मार्जारवंशी प्राण्याकडुन होणार्‍या प्राणघातक हल्ल्याची भिती मनात ठेउनच जंगलात जावे लागते. या भितीतूनच " वाघदेव " या कल्पनेचा जन्म झाला असावा.

लाकडी फ़ळीवर कोरलेली वाघदेवाची प्रतिमा असलेले काष्ठशिल्प आदिवासी आदिम काळापासून बनवत असावेत. जंगलात सहजपणे उपलब्ध होण्यार्‍या लाकडावर कोरीवकाम करुन त्याला नैसर्गिक रंगात रंगवून "वाघदेव" तयार केला जातो. त्यानतंरच्या काळात दगडात कोरलेल वाघाच शिल्प (हरिशचंद्र गडावर जातांना टोलार खिंडीत वाघाच शिल्प पाहायला मिळत.) आणि पुढिल काळात वाघदेवाची मंदिर बांधली गेली असावीत.

भारतभर पसरलेल्या जंगलात असलेल्या वाघदेवांची पूजा दरवर्षी "वाघबारसीला" म्हणजेच अश्विन वद्य व्दादशीला होते.

न्हावीगड - बागलाण , जिल्हा नाशिक आणि अशेरीगड, जिल्हा ठाणे येथील आदिवासी पाड्यांजवळ असलेले वाघदेवांची छायाचित्र.

Wagh dev at Asherigad, Dist. ThaneWagh dev at Nhavigad



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk