Nakashatun Durgabhramanti
Printed From: TreKshitiZ
Category: TreKshitiZ Sanstha
Forum Name: Updates from TreKshitiZ
Forum Description: Upcoming events from TreKshitiZ would be posted in this section
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=245
Printed Date: 28 Jan 2025 at 6:00pm Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com
Topic: Nakashatun Durgabhramanti
Posted By: harshalmahajan
Subject: Nakashatun Durgabhramanti
Date Posted: 13 Jul 2014 at 11:56pm
Nakashatun Durgbhramanti by Mahendra Govekar, TreKshitiZ Sanstha
To purchase this book online click http://sahyadribooks.org/books/Nakashatundurgbhramanti.aspx?bid=1439" rel="nofollow - here :-
Following are the few glimpses of this book :-
------------- See ya in the Hills of Sahyadri !!
|
Replies:
Posted By: kausamant
Date Posted: 14 Jul 2014 at 1:07pm
गड बांधतांना त्यावेळच्या स्थापत्तींनी अनेक क्लृप्त्या योजल्या, अनेक वास्तू , पाण्याच्या जागा, कोठारे, गुहा, दरवाजे , गुप्त दरवाजे, चोर वाटा, भुयारे इत्यादी निर्माण केली. किल्ला आपल्या परीने परीपूर्ण केला. आज किल्ल्यांची दुरावस्था झाल्यामुळे किल्ल्यावरच्या अनेक वास्तू काळाच्या उदरात गडप झाल्या , तर काही वास्तू किल्ल्यावरच्या झाडा झुडपात लुप्त झाल्या. किल्ल्यावर जाऊनही या वास्तू पाहाता न येण यासारख दुर्दैव नाही. किल्ल्यावरच्या सर्व वास्तूंचा ठावठिकाणा नवख्या भटक्यालाही कळावा व एक परीपूर्ण किल्ला पाहिल्याचा आनंद त्याला मिळावा याच उद्देशाने महाराष्ट्राभर पसरलेल्या १२५ किल्ल्य़ांचे नकाशे आणि माहिती "नकाशातून दुर्गभ्रमंती" या पुस्तकातून देण्यात आली आहे. याशिवाय ट्रेकक्षितिजच्या सदस्यांनी काढलेली किल्ल्याची त्यावरील भागांची रेखाचित्रे पुस्तकात पाहायला मिळतात.
|
Posted By: amitsamant
Date Posted: 14 Jul 2014 at 1:16pm
किल्ले भटकंतीला निघाल्यावर गड चढून जातांनाच अर्धी शक्ती, जोश आणि वेळ खर्च होऊन जातो. गड माथ्यावर पोहोचल्यावर गडावरच्या अनेक वास्तू , पाण्याच्या जागा, कोठारे, गुहा, दरवाजे , गुप्त दरवाजे, चोर वाटा, भुयारे इत्यादी पाहायची असतात. मग सुरु होते वेळे बरोबर शर्यत. आज किल्ल्यांची दुरावस्था झाल्यामुळे किल्ल्यावरच्या अनेक वास्तू काळाच्या उदरात गडप झाल्या आहेत, तर काही वास्तू किल्ल्यावरच्या झाडा झुडपात लुप्त झाल्या आहेत. किल्ल्यावर जाऊनही या वास्तू पाहाता न येण यासारख दुर्दैव नाही. किल्ल्यावरच्या सर्व वास्तूंचा ठावठिकाणा नवख्या भटक्यालाही कळावा व एक परीपूर्ण किल्ला पाहिल्याचा आनंद त्याला मिळावा याच उद्देशाने महाराष्ट्राभर पसरलेल्या १२५ किल्ल्य़ांचे नकाशे आणि माहिती "नकाशातून दुर्गभ्रमंती" या पुस्तकातून देण्यात आली आहे. याशिवाय ट्रेकक्षितिजच्या सदस्यांनी काढलेली किल्ल्याची त्यावरील भागांची रेखाचित्रे पुस्तकात पाहायला मिळतात.
|
Posted By: amitsamant
Date Posted: 22 Jul 2014 at 10:42pm
एखादा चोर दरवाजा ,भुयारी मार्ग, कधीकाळी धन-धान्याने परिपूर्ण असलेले एखादे तळघर आपणही शोधावे असे प्रत्येक गडप्रेमीला वाटत असते, पण हे शोधण्यासाठी आवश्यकता असते ती एका खास नकाशाची, जो तुम्हाला तिथे घेउन जातो. ही इच्छा पूर्ण करणारे आणि जिज्ञासुंची जिज्ञासा शमवणारे "नकाशातून दुर्गभ्रमंती" हे पुस्तक महाराष्ट्राभर पसरलेल्या १२५ किल्ल्यांचे नकाशे घेउन आपल्यात दडलेल्या प्रत्येक भटक्यासाठी एक अपूर्वभेट.
|
|