Print Page | Close Window

विजयी दिन - अशेरीगड

Printed From: TreKshitiZ
Category: TreKshitiZ Sanstha
Forum Name: Updates from TreKshitiZ
Forum Description: Upcoming events from TreKshitiZ would be posted in this section
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=217
Printed Date: 17 Jan 2025 at 12:39am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: विजयी दिन - अशेरीगड
Posted By: Deepali Lanke
Subject: विजयी दिन - अशेरीगड
Date Posted: 20 Feb 2014 at 1:31pm
                                                 विजयी दिन - अशेरीगड            
                                                                                           - Deepali Lanke

प्रस्तावना :

कुणाला आठवतंय का कि आपण कधी गडावर जावून विजय दिन किंवा पालखी उत्सव साजरा केला? नसेलच आठवत कारण पोर्तुगीज आणि ब्रीटीशानी गडावरील उत्सव बंद केल्यामुळे गेली २७५ वर्ष गडावरील उत्सव आणि सोहळे हे साजरे झालेच नाही.डोंबिवलीच्या ट्रेक क्षितीज संस्थेने श्रीदत्त राउत यांच्या समवेत आयोजित केलेल्या ट्रेक मूळे आशेरीगडावर शिवाजी महारांजाच्या प्रतिमेच्या साक्षीने १६ फेब्रुवारी २०१४ रोजी ३३ मावळ्यांच्या ( ट्रेकर) समवेत धामधुमीत साजरा केला.यावेळी १० वयोगट ते ६९ वयोगट यामधील उत्साही लोकांनी योगदान दिले.म्हणतात उत्सव साजरे केले कि गती खुंटते ; पण हा सोहळा आम्ही साजरा करून एक नवीन पर्वाची सुरुवात केली असे म्हणणे अतिशयोक्ती नसेल.अशा या ऐतिहासिक ट्रेक चे नेतृत्व मोहन शेट्टी यांनी यशस्वीरीत्या केले.

माहिती :

पश्चिम मुखी अशेरीगड हा मुळातच इतिहासाने आणि भौगोलिकतेणे नटलेला आहे.मोठा दादा वाटावा असा हा गड दिमाखात उभा आहे. गड साधारणपणे १६०० फूट उंचीवर असून जाण्याची वाट हि खोडकोना गावातून जाते. यावेळीही ट्रेक क्षितीज ने श्रीदत्त राउत यांच्या समवेत गडावर पोहोचण्याच्या वाटेवर एवढे बाण रेखलेत कि चुकून परत पोर्तुगीज आले कि रेखलेले हे बाण पुसण्यासाठी ४ ते ५ माणसांची नियुक्ती त्यांना करावी लागेल.गडावर पोहचताना पोर्तुगीजांनी बांधलेल्या मनोरय्चे अवशेष फक्त पाहायला मिळतात तो चौथरा कसा होता याचे दुर्मिळ छायाचित्र हे श्रीदत्त राउत यांनी माहितीसह सगळ्यांना दाखविले.गडावर पाहण्यासाठी बरेच असे अवशेष अजून आहेत ;गडाची तटबंदी ;गडावर प्रवेश करताना डाव्या बाजूला मोठा बाण आहे वर गेल्यावर पोर्तुगीज यांचा चिन्ह असलेला कोरीव शीळ पाहायला मिळते;गडाच्या पठारावर प्रवेश केल्यावर वस्तूंचे चौथरे ,चर पाहायला मिळतात तसेच गडावरील गुहेत तांदळा देवीचे स्थान असून खोडकोना गावी राहत असलेल्या आदिवासी पाड्यातील लोकांची हि ग्रामदेवता  आहे.तसेच पठारावरून कोहज हा आपल्याला अग्नेय बाजूला दिसतो.गडावरील वरच्या अंगाला दोन तले आहेत त्यात कमलांची फुले लक्ष वेधून घेतात परतीच्या मार्गावर एक छोटेसे पिण्याचे टाके आढळते.प्रत्येक अवशेष बारकाईने निरीक्षण करण्याचे आवाहन श्रीदत्त यांनी केले कारण हेच अवशेष इतिहासाचे मूक साक्षीदार आहेत. श्रीदत्तानी सोबत आणलेल्या फोटो आणि त्याच्या तोंडपाठ इतिहासाने सगळ्यांची मने जिंकली आणि गतकाळात प्रवेश केल्यासारखे भासत होते.

आम्ही सगळे मावळे ( ट्रेकर) १६ फेब्रुवारी रोजी सकाळी बस ने खोडकोना गावात १०:३० वाजता पोहचलो नेहमीप्रमाणे सगळ्यांना पूर्वसूचना देवून आणि सगळ्यांची ओळख करून घेवून विजयी दिनाच्या नवीन पर्वाला सुरुवात झाली आणि भगवे हात घेवून सगळ्यांनी गडावर कूच केली. घनदाट जंगलातून वाट काढत इतिहास मनात साठवत मार्गक्रमण चालू झाले वेळोवेळी श्रीदत्त घडलेल्या इतिहासाबद्दल सांगून आणि शिवाजी महारांजाच्या गरजा देत सगळ्यांना प्रोत्साहित करत होते...हळू हळू गडावर एका छोट्या शिडीच्या साह्याने मार्गक्रमण झाले आणि ट्रेक क्षितीज वर असलेल्या प्रेमा पोटी श्रीदत्तानी अशेरीगड याची पोर्तुगीजांनी काढलेली प्रतिकृती भेट म्हणून दिली...आणि पोर्तुगीजांच चिन्ह असलेलं शिल्प या नवीन इतिहासाचा साक्षीदार ठरलं.गडावर कुच करत सगळे भुकेले मावळे गुहेत विसाव्यासाठी बसले आणि तेव्हाच  भोजन उरकून घेतले. मग जय्यत तयारी सुरु झाली ते विजयी दिनाची...सळ्यांनी आप आपल्या परीने योगदान दिले मुलांनी पताके लावले भगवे फडकावले तर आरती दुगल ने रांगोळी काढली श्रीदत्त यांनी शिवाजी महारांजाच्या प्रतिमेच्या पुजेची तयारी केली..सगळ झाल्यवर गणेश आरती स्त्रोत आणि घालीन लोटांगण ने कार्यक्रमाची सांगता होणार तेवढ्यात महाराष्ट्र माझा गीताने परिसर निनादून ठेवला आणि भावना उचंबळून आल्या.

श्रीदत्तानी गड संवर्धन च्या वेळी लक्षात घेण्यासाठीच्या गोष्टी पुढीलप्रमाणे सांगितल्या  :-

शिल्प हे कोणतेही केमिकल न वापरता चिंच झाडाचा पालापाचोळा वापरून कसे स्वच्छ करावे हे सांगितले

झाडांच्या वाढीसाठी शेण हे खत म्हणून वापरले जाते पण हेच शेण चायनीज खाणाऱ्या म्हशींचा वापरला आणि ते झाडाच्या मुळाशी व्ही आकाराचा कट करून तिथे टाकले असता ते मुळासकट तट बंदीला इजा न करता कसे गळून पडते हे सांगितले.

देवाला वाहिलेले फुले जमवून वळवून त्याला गरम करून कसे नैसर्गिक रंग वापरता येतात ते सांगितले.हे नैसर्गिक रंग २ ते ३ हजार सालापर्यंत जसेच्या तसेच राहतात.वेरूळ आणि अजिंठा या लेण्यात हेच रंग वापरण्यात आलेत आहेत असेही सांगितले

श्रीदत्तांचे संशोधकांना आवाहन :-

गड वाचवा हे कळकळीचे आवाहन सगळ्या ट्रेकर ला केले.

आशेरीगडावर ४ खिंडीतून पोहचता येते पण ते मार्ग कालौघाने लुप्त झाले आहेत.असे हे मार्ग शोधण्याचे खुले आवाहन संशोधकान समोर आहे.

तसेच गडावर अजून संवर्धनाचे काम सगळ्यांनी मिळून करावे हे हि सांगितले.

अशा या इतिहासिक विजयी दिनाच्या आठवणी मनात साठवत सगळे मावळे परतीला लागले. आणि श्रीदत्त यांनी ट्रेक क्षितीज हि प्रामाणिक संस्था असून संस्थेच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या तसेच मदतीची हाक मारल्यास सदैव पाठींबा देण्याचे सांगितले.




Replies:
Posted By: chaitanya
Date Posted: 20 Feb 2014 at 2:33pm
खूप छान लिहील आहेस दीपाली..


Posted By: Umeshhkarwal
Date Posted: 21 Feb 2014 at 10:54am
खुप छान लिहाल आहे , मस्त Smile



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk