Print Page | Close Window

शिवाजी

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: कविता संग्रह
Forum Description: पोवाडे, कविता आणि स्फूर्ती गीते
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=327
Printed Date: 22 Jan 2025 at 10:37am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: शिवाजी
Posted By: amitsamant
Subject: शिवाजी
Date Posted: 05 May 2015 at 10:44pm
शिवाजी

नाव तुझे ऐकताच जुळती 
यांत्रिकतेने कर छातीवर 
जयघोषाचा महामंत्र तव 
लिहिला आम्ही शिळेशिळेवर 
या मातीवर

पाठ्यपुस्तकामधून रचली 
नवरस भरुनी तुझी काहाणी 
दिले उभारुनी पुतळे सुंदर 
शिवेशिवेवर नगरोद्यानी, 
सभागृहतुन -
तव महिम्यांची रुणझुणती ती 
वाद्यगणांच्या साथीवरती 
सुस्वर गाणी .

या सर्वातुनि हन्त अर्पिला 
देवपण तुजला अवतारी 
माणुसतेच्या पुसल्या रेषा 
उरे प्रणामापुरती प्रतिमा 
संगमरवरी .

जी गत झाली - 
दशरथाची , नंदसुताची 
सिध्दार्थाची , ज्ञानेशाची 
पुराणकाली.

आज नको ती देवदेवळे 
तुझ्या जीवनातली हवी ती
जिवंत शिकवण 
मने द्यावया मृत मातीला
सनातनाच्या जुलुमावरती 
घालाया घण

ये गीतातुन, ये ग्रंथातुन 
मंदिरातुनी ये रस्त्यावर 
उद्यानातील शिल्पामधुनी 
ये माळावर

तुझ्या करातिल अमर दिव्याचा 
प्रकाश पडु दे 
या भुमीवर , या काळावर.

कुसुमाग्रज

"स्वगत"
1962 




Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk