Print Page | Close Window

Rajgad - torna

Printed From: TreKshitiZ
Category: Historical and Trekking Destinations of India
Forum Name: Trekking Destinations
Forum Description: Visitors can post requests / information of any trekking destination on this globe.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=298
Printed Date: 23 Jan 2025 at 4:10am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: Rajgad - torna
Posted By: Shardul
Subject: Rajgad - torna
Date Posted: 05 Dec 2014 at 10:20pm

    गोष्ट आहे  २१ जून  २०११ ची .आमची  नुकतीच Engineering  ची लास्ट ईयर  ची परीक्षा संपली होती ,वेध लागले होते ते त्या वर्षीच्या पहिल्या पावसाळी ट्रेक चे. शनिवार रविवार आला की  आमची ४-५ लोकांची कुठल्या तरी गडावर  स्वारी ठरलेलीच  असायची  आणि आत्ता तर  परीक्षा संपलेली म्हणून आम्ही एक मोठा बेत आखला "राजगड-तोरणा". तसा राजगड काही आम्हाला नवा  नव्हता पण तोरणा आणि राजगड -तोरणा चा रस्ता आणि तो हि पावसात हे मात्र पूर्ण पणे  नवीन.पण  थांबणार ते ट्रेकर कसले. मी आणि माझे २ मित्र  रुचिर आणि सचिन तर तयार होतोच त्यात अजून १५ मुलांची भर पडली. अशे एकूण १८ जण शुक्रवारी रात्री राजगड ला जायला  निघालो.ठरल्या वेळापत्रका प्रमाणे सर्व झाल आणि सकाळी ६. वाजता आम्ही राजगडाच्या पायथ्याशी आम्ही पोचलोही. पावसाची हलकी सर चालू होती आणि आम्ही गड चढायला सुरुवात केली. २-३ तासात आम्ही राजगडात प्रवेश केला. आम्ही मुक्काम केला होता पदमावती देवी  च्या मंदिरात. गारठा फार होता आणि बाहेर पाऊस असल्यामुळे रात्री जेवण मंदिरात बनवण्या  वाचून पर्याय नव्हता. ७.३० -  ८ च्या सुमारास आम्ही जेवलो आणि झोपायच्या तयारीला लागलो. जेवण मंदिरात बनवल्या मुळे मंदिरात बर्या पैकी ऊबदार वाटत होत . सगळे लगेच झोपी गेले. २-३ तासाने आमच्यातल्या बर्याच लोकांना काही तरी चावल्या सारख जाणवल.  गोंधळ ऐकून सर्व पटापट उठले, बघतो तर काय लाल मुंग्यांनी आमच्या वर हल्ला केलेलां.  आम्ही केलेल जेवण आणि त्या मुळे मंदिरात झालेली ऊब यामुळे बहुदा त्या बाहेर आल्या असाव्यात.  रात्रभर कोणीहि  झोपल नाही ,मुंग्यांची दहशतच  एवढी होती कि कोणाला झोप लागलीच नाही.

        दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो तोरण्याच्या दिशेने. पाऊस थांबला होता. कोणाचीच झोप झालेली नव्हती पण थकवा जाणवत नव्हता . जेवणा साठी आम्ही सुकी लाकडं जमा करून सोबत घेतली होतीच. सकाळपासुन सुट्टी वर गेलेल्या पाऊसाने  मात्र तोरणा जवळ येता  येता हजेरी लावली  होती. धुकं वाढत होत आणि त्या बरोबर आमच टेंशन हि . शेवटी   पडत धडपडत संध्याकाळी ५. च्या सुमारास आम्ही पोचलो रडतोंडी बुरुजाच्या पायथ्याला. येथून वरती जाणारी वाट हि चांगलीच कठीण आहे याची आम्हाला कल्पना होती त्यात सततच्या पावसाने हि वाट अधिकच निसरडी बनली होती, आमच्याकडे दोर तर होताच.  आम्ही १८ जण कशे तरी वानर क्लुक्त्या  करत वरती चढलो. सर्वाना वरती चढे पर्यंत ६ वाजले होते. पावसाचे दिवस असल्या मुळे अंधार जरा  लवकरच पडायला सुरवात झाली होती. आम्ही मेंगाईच्या मंदिरा कडे जाण्यास सुरवात केली. धुकं एवढ जमा झालेला कि ५-१० फुट  लांबी वरच पण काही दिसत न्हवत. कारवी ची झाडी एवढी झाली होती कि थोडा पुढे गेल्या वर आम्हाला वाट दिसायचीच बंद झाली.  आमचा अंदाज होता कि ६.३० पर्यंत आम्ही मेंगाईच्या  देवळात पोहोचू पण ६.३० वाजले तरी आम्ही रस्ताच शोधत होतो. एव्हाना पावसाने जोर पकडला होता पावसापेक्षा वारा जास्त त्रास देत होता. आम्हाला रस्ता सापडत नव्हता बराच वेळ पुढे मागे जाऊन काही फायदा नव्हता . मी माझ्या मामे भावाला फोन केला आणि त्याला झाल्या प्रकारा बद्दल सांगितल त्याने आम्हाला पुढे न जाण्याचा सल्ला दिला आणि सोबतीला २-३ शिव्याही दिल्या . माझ्याकडे राजगड मधील एका गाडी चालकाचा नंबर होता मी त्याला फोन  केला पण त्याने मदत करण्यास असमर्थता दाखवली,  आमचे परतीचे सर्व दोर कापले गेले होते , ती रात्र तिकडेच उघड्यावर पावसात भिजत काढण्या शिवाय गत्यंतर न्हवत.शेवटी आम्ही रडतोंडी बुरुजा जवळ रात्र  काढायची  ठरवली कारण तिथे वारा कमी होता आणि सकाळी तिथूनच खाली उतरण्याच ठरवल. पावसाचा खेळ चालूच होता आणि त्याच्या सोबतीला वारा. सर्वाना भूक लागली होती आमच्या जवळच पाणी हि संपत आल होत . आमच्या कडे लाकूड फाटा होता हि ,पण त्या पावसात जेवण बनवणार कुठे ?? शेवटी पावसाने १० मिनीटे विश्रांती घेतली आम्ही तीच वेळ साधून maggie  बनवल.प्रत्येकाच्या  वाट्याला  अर्धा कप  maggie आली. एव्हाना ८ वाजले होते आणि आम्हाला अजूनही १० तास काढायचे होतें, नशिबाने रुचिर झोपण्या  साठी एक साधारण ८-१० फुटाच प्लास्टिक घेऊन आला होता. आम्ही १८ लोकं दाटीवाटीने बसलो आणि  ते प्लास्टिक डोक्यावर चादरी सारख ओढून घेतल . वेळ जाता जात नव्हता ,मनातून तर सगळे घाबरलेलेच,  रामरक्षा ,मारुती स्तोत्र तर २-३ वेळा म्हणून झालेल. रात्र किती मोठी असते ते त्या दिवशी खऱ्या अर्थाने अनुभवल.  कधी एकदाची पहाट होतेय अस झालेलं. एकदाची पहाट  झाली. पण धुकं काही कमी होत न्हवत. ठरल्या प्रमाणे आम्ही आलो त्या मार्गाने परत जायच्या तयारीला लागलो . तिथून बाहेर पडण्याची प्रत्येकाला एवढी घाई झालेली कि रडतोंडीचा तो कठीण patch कसा पार केला कळलंच  नाही.कोणाला भुकेची आणि तहानेची परवाच नव्हती नशिबाने वाटेत बरीच जांभूळ आणि आंब्याची  झाड होती त्या रानमेव्या वर सर्वांनी येतेच्छ  ताव मारला.  एकदाचा आम्ही तोरण्याचा डोंगर उतरून खाली जेथे राजगड आणि तोरण्याच्या मधला डांबरी रस्ता जातो तेथे पोहोचलो

आम्ही रविवारी रात्री मुंबई ला सुखरूप पोहोचलो.तो पर्यंत माझ्या घरी माझ्या भावा मार्फत या पराक्रमाची बातमी पोहोचलीच होती. घरच्यांचा ओरडा ऐकावा लागलाच

पण एकंदर राजगड-तोरणा माझ्यासाठी तरी अविस्मरणीय ट्रेक झाला.

उपाशी पोटी घालवलेले  १४ तास आणि ते पण भर पावसात त्यात पुढे अजून १२ km  चालणं ते शक्य  झाल ते केवळ त्या अर्ध्या कप  maggie  मुळे आणि आम्ही १८ मुलांच्या जिद्दी  मुळे. 


Smile

                              

  




Replies:
Posted By: Umeshhkarwal
Date Posted: 06 Dec 2014 at 12:07pm
mast shardulClap


Posted By: amitsamant
Date Posted: 12 Dec 2014 at 6:56pm
 शार्दुल , 
छान लिहिल आहेस, 
सह्याद्रीतले असेच अनुभव आपल्याला परत सह्याद्रीत खेचुन नेतात.




Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk