Print Page | Close Window

कोकिळ (Asian Koel)

Printed From: TreKshitiZ
Category: Nature
Forum Name: Birds of India
Forum Description: Information regarding Birds of India can be shared in this forum
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=313
Printed Date: 19 Jan 2025 at 8:16pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: कोकिळ (Asian Koel)
Posted By: AARTI
Subject: कोकिळ (Asian Koel)
Date Posted: 22 Jan 2015 at 11:19am



                           कोकिळ (Asian Koel)



 

        ऑफिसच्या खिडकीतून सहज डोकवत असताना समोरच्या आंब्याच्या झाडावर एक सुंदर कोकिळ नर आणि मादी जोडी दिसली जवळ जवळ दोन तास त्यांचा निवांत मुक्काम आंब्याच्या झाडावर होता. दोन तास त्यांचे निरीक्षण करत असतानाच मनात विचार आला ह्याची आणि  इथम्बुत माहिती मिळवावी मग काय आपले गुगल आहेच .. गुगल वरून पक्ष्यानवरच्या पुस्तकांची यादी काढून, लायब्ररी मधून.. तर काहीपुस्तक विकत घेऊन माहिती गोळा केली. थोडी फार माहिती मिळाली विकिपीडिया वरून .. लहानपणा पासूनच नेहमी बघत आलेला साधारणतः वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर कु ςς , कु ςς असा आवाज काढून साधारणतः श्रावण  महिन्यापर्यंत गाणारा आणि सबंध हिवाळाभर मौन पाळणारा आणि नेहमी आपल्याला ऐकू येणारा मधुर पंचमस्वरात ला परिचित आवाज कोकिळ(नर) चा असतो; कोकिळेला(मादी) गाता येत नाही. गायला सुरुवात करताना कोकिळ प्रथम हळूहळू गाऊ लागतो पण थोड्याच वेळाने गाण्याचा वेग वाढत जाऊन सूरही चढत जातो. गाणे रंगात आले असतानाच एकदम थांबते थोड्या वेळाने पुन्हा सुरू होते. कोकिळा झाडावर बसून बुड् बुड् बुड् असा आवाज काढते किंवा एका झाडावरून दुसऱ्यावर उडत जातांना किक् किक् किक् असे सूर काढते.
              
कोकिलाद्य (Cuculidae) (क्युक्युलिडी) कुळातला हा पक्षी असून याचे शास्त्रीय नाव यूडिनॅमिस स्कोलोपेशियस आहे. त्याचे शास्त्रीय नाव Eudynamys scolopacea scolopacea (Linnaeus) असे आहे. त्याला इंग्रजी मध्ये Asian Koel असे नाव असून संस्कृत मध्ये पिक, कोकिल हिंदीत कोयल अशी नावे प्रचारात आहेत.परभृत हा कोकिळेला समानार्थी संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ ज्यांची पिल्ले इतर पक्षी वाढवतात असा होतो.

        साधारणतः 15-18 इं आकाराचा , भारतासह बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका . देशात  आढळणारा कोकिळ हा वृक्षवासी असून, झाडांची दाट राई, गर्द पालवी असणारी मोठी झाडे, बागा . ठिकाणी दिसून येतो




    

uploads/327/1.kokil_Madi.jpg" rel="nofollow -

         कोकिळ कावळ्या पेक्षा सडपातळ असून शेपटी जास्त लांब असते. कोकिळ (नर) पूर्णपणे तकतकीत निळसर,काळ्या रंगाचा असून कोकिळा (मादी) तपकिरी रंगाची असते; तिचे पंख, शेपूट, छाती आणि पोट यांवर पांढरे पट्टे आणि शरीराच्या बाकीच्या भागावर पांढरे ठिपके असतात. डोळे गडद लाल रंगाचे चोच फिकट पोपटी रंगाची असते

                 कोकिळ वड, पिंपळ याच प्रकारच्या इतर झाडांची फळे, मध खाऊन उदरनिर्वाह करतो. पण यांशिवाय सुरवंट, किडे, गोगलगायीदेखील यांचे आवडते खाद्य आहे.

               कोकिळांचा विणीचा हंगाम एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत असून तो कावळ्याच्या हंगामाशी जुळणारा आहे. कोकिळ घरटे कधीही बांधीत नाहीत. कोकिळा आपली अंडी इतर पक्ष्यांच्या बहुधा कावळ्याच्या पण कधीकधी डोमकावळ्याच्या घरट्यात घालते, कोकिळा आपले घरटे बांधत नाही तसेच ते आपल्या पिलांची देखभालही करत नाही. कोकिळेचे अंडे कावळ्याच्या अंड्यासारखेच पण काहीसे लहान असते. त्याचा रंग करडा हिरवा किंवा स्लेट पाटीच्या रंगाप्रमाणे निळा काळा असून त्यावर तांबूस तपकिरी ठिपके असतात. अंड्यांतून पिल्ले बाहेर पडल्यावर कावळे किंवा इतर पक्षी आपल्या पिल्लांच्याबरोबरच कोकिळाच्या पिल्लांचेही लालन-पालन करतात. कोकिळेचे नर पिल्लू काळ्या रंगाचे असते, मादी पिल्लू देखील प्रौढ कोकिळेपेक्षा जास्त गहिऱ्या रंगाचे-जवळजवळ काळे असते इतर पक्ष्यांच्या घरट्यात सोडून दिलेली अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे कामे असे पालक माता-पिता करतात. सहसा त्यांची स्वतःची पिले अंड्यातून बाहेर येण्या आधी कोकिळेची पिले बाहेर आलेली असतात आणि त्यांची वाढही इतर पिलांच्या मानाने वेगाने होते. कोकिळाची पिल्ले मोठी होऊन स्वतःचा चरितार्थ चालविण्यास समर्थ झाली म्हणजे कावळ्यांचा किंवा पालक पक्षांचा आणि त्यांचा संबंध तुटतो.

                       

                                                            आरती दुगल

                                                माहिती स्त्रोत: - विश्वकोश, विकिपीडिया,

                                                                                                                         पक्षी - संदर्भ ग्रंथ.
                                                फोटो : -
श्री अमित सामंत

           

 

 

 

 

 

 

 




Replies:
Posted By: amitsamant
Date Posted: 22 Jan 2015 at 12:37pm
आरती लेख चांगला आहे. ऑफिसच्या खिडकी पासुन सुरु झालेला लेख गुगल विकीपिडीयात गेल्यामुळे शास्त्रिय माहिती उत्तम आलीय .

पण तुझ एखाद निरीक्षण किंवा किस्सा असता तर लेखाला पर्सनल टच आला असता.

पुढच्या लेखाला शुभेच्छा


Posted By: AARTI
Date Posted: 23 Jan 2015 at 11:07am

Thank You Amitda! Smile



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk