Print Page | Close Window

गावाकडचे तंत्रज्ञ

Printed From: TreKshitiZ
Category: Historical and Trekking Destinations of India
Forum Name: Trekking Destinations
Forum Description: Visitors can post requests / information of any trekking destination on this globe.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=297
Printed Date: 12 Jan 2025 at 7:42am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: गावाकडचे तंत्रज्ञ
Posted By: Deepali Lanke
Subject: गावाकडचे तंत्रज्ञ
Date Posted: 05 Dec 2014 at 5:02pm
                            गावाकडचे तंत्रज्ञान - वासोटा नागेश्वर ट्रेक

                                        -दीपाली लंके ०३. १२ .२०१४

शहरात तंत्रद्यानाच्या जगात वावरणारे आपण गावाच्या ठिकाणी गेलो कि तेथील लोकांची कला, त्यांचा साधेपणा, राहणीमान,मदत करण्याची वृत्ती आपल्या मनात घर करून जाते. गावाकडील लोकांमध्ये असलेली जगण्याची कला ,माणुसकी हि शहरी माणसाला भुरळ पाडते असंच त्यांचं गावाकडील पण समृद्ध तंत्रज्ञान अनुभवण्याचा योग आला तो ट्रेक क्षितीज संस्थेने आयोजित केलेल्या २२ आणि २३ नोव्हेंबर  २०१४ वासोटा नागेश्वर ट्रेक मूळे.

डोंगरांच्या कुशीत असलेले साताऱ्याजवळील बामणोली गाव पर्यटकांना साद घालते.आणि तिथूनच बोटीची सधनता लाभलेले ,सुंदर टुमदार गाव ,शिवसागर जलाशयामुळे समृध्तता प्राप्त झालेले भटक्यांची वाट पाहत असते. प्रत्येक गडावर पोहोचण्यासाठी तेथील असलेल्या आजू बाजूच्या गावातून वाट हि भटक्यांना आकर्षित करत असते ,त्याच प्रमाणे बामणोली गावातून थेट वासोट्याच्या पायथ्याशी पोहचण्याची एक वाट आहे ,म्हणजेच मेट इंदावली.कुसापूर मार्गे आपण बामणोली या गावी येतो तिथे बोटीची सोय आहे त्यासाठी अगोदर बुकिंग करणे आणि वन विभागाची परवानगी घेणे गरजेचे असते. वासोटा नागेश्वर हा ट्रेक आपण एका दिवसात पूर्ण करू शकतो दुर्गप्रेमिनी अथक चालण्याची आणि जंगलात असणाऱ्या जळू चावल्याच तर खिलाडू वृत्ती दाखविण्याची तयारी ठेवावी. ऐतिहासिक वारसा लाभलेला वासोटा किल्ला दुर्गप्रेमींसाठी खास पर्वणीच आहे.मेट इंदावली या पायथ्यापासून आपण २ ते ३ तासात जंगलातील चढ उतार करत पोहचतो आणि अधून मधून असणाऱ्या जळूंचा सामना करत त्यांच्यावर ताशेरे ओढत आपण प्रवास चालूच ठेवतो.

किल्ल्यावर आपण प्रवेशद्वारामधून प्रवेश करतो आणि मागे वळून पाहिल्यास विहंगम दृश्य नजरेत न कळत सामावून घेतल जात. एक प्रवेशद्वार ढासळलेल्या स्थितीत आहे दुसऱ्या प्रवेशद्वारामधून आपण किल्ल्यावर प्रवेश करतो.प्रवेश केल्याबरोबर आपल्याला बिन छपरचे मारुतीचे मंदिर दिसते. उजवीकडे महादेवाचा मंदिर असून तिथूनच पुढे आपल्याला किल्ल्याच्या एका उद्धवस्त द्वारातून किल्ल्याच्या माचीवर प्रवेश होतो आणि तिथून आपल्याला छोटा नागेश्वर आणि( मोठा )खरा नागेश्वर यांची सुंदर डोंगर रचना पाहायला मिळते तर विरुद्ध दिशेला जलाशय आणि घनदाट अरण्य यांचा संगम साद घालत राहतो. ते पाहून परतून आपण डाव्या दिशेने गेल्यास २ पाण्याचे टाके असून तेथील पाणी पिण्या योग्य आहे.तिथून पुढे आपण बाबू कड्यावर पोहचतो हा रौद्र भीषण बाबू कडा मनाला मोहिनी घालतो आणि सह्याद्रीची श्रीमंती जाणवून देतो. त्यावरच विराजमान असलेला जुना वासोटा किल्ला नजरेतून सुटत नाही घनदाट अरण्य आणि जंगली श्वापद यामुळे तिथे सहसा कुणी फिरकत नाही.जिगरबाज लोकांसाठी हे एक धाडसी आणि साहसी पावूल ठरू शकेल. वासोटा हा ट्रेक नागेश्वर केल्याशिवाय पूर्ण झाला असे म्हणताच येणार नाही.छोट्या नागेश्वराच्या मागे आपल अस्तित्व जतन केलेला मोठा किंवा खरा नागेश्वर आणि तिथपर्यंतच पल्ला हा खरच कसोटी लावणारा आहे.निसर्गाची किमया आणि निबिड अरण्य, रोरावत असणारा वारा, लपाछापी खेळणारा सुर्य,खडी चढण मधेच लागणारा घसारा, आजूबाजूला दिसणाऱ्या दऱ्या जीव टांगणीला लावतात पण जिद्द असेल आणि अथक परिश्रम करायची इच्छा असल्यास तुम्ही हसत खेळत नागेश्वराच्या गुहेत पोहोचताच आडवे पडल्याशिवाय राहत नाही.मागे वळून पाहिल्यास तुम्ही जिंकला हीच तुमच्या चेहऱ्यावर विजयाची भावना क्षणासाठी का होईना पण तरळून जाते. नागेश्वर गुहेत महादेवाची पिंड असून त्यावर नैसर्गिक पणे थेंब थेंब पाणी कातळातून पडत असते.येथे रात्री राहण्यासाठी सोय होऊ शकते पण त्यासाठी वन विभागाची पुर्वपरवानगी काढणे आवश्यक आहे. अथक परिश्रमानंतर परतीचे वेध लागतात आणि सोप्या वाटेने जावूया यावर सगळ्यांचे एकमत होत असते. सोबत असलेले वाटाडे आणि आम्हाला बोटीने मेट इंदावली ला घेवून येणारे मग सांगतील ती पूर्वदिशा असे कधी कुणाचं एकूण न घेणारे आम्ही नियम ऐकत परतीला लागतो. उतरताना नागेश्वराच्या इथून डाव्या बाजूने एक ओढ्याचा रस्ता आहे मळलेली हि पायवाट नसल्यामुळे ओढा हाच दिशादर्शक असून तोच आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरतो. सोबत असलेली वाटाडे मंडळी अगदी मनापासून आम्हाला अंधाराच्या आत घनदाट अरण्यातून निघण्यासाठी प्रवुत्त करत होती तर आम्ही आमची शक्ती पणाला लावून रस्ता काढत जमेल तसं पुढे सरकत होतो. त्यांची तळमळ आम्हाला समजत नव्हती असे नसून नेहमीची हि वाट नसल्या कारणाने नकळत पणे वेळ लागत होता.अरण्यातील श्वापद हि रात्री बाहेर पडत असतात वाटाडे गावकरी ,आम्हा सगळ्यांची जबाबदारी घेतल्यासारखेच आम्हाला हेकेखोरपणे सांगत अधून मधून तर अक्षरश: चालण्याचा वेग वाढविण्यासाठी ओरडत होते. आपली शहरी मंडळी करते का एवढी काळजी परक्या माणसांसाठी??? मनात प्रश्न तरळून गेला. काळोखात ओढ्यातून मार्गक्रमण करत असताना आम्हाला उजव्या हाताला हनुमानाचे मदिर दिसले आणि मनात हुष झाले कारण तीच एक खून होती कि आम्ही बरोबर आलो असून लवकरच मेट इंदावलीत पोहचू आणि तिथून परत २ तासांचा बोटीचा प्रवास आणि मग बामणोली गावात. शेवटी आम्ही मेट इंदवली गाठले तसं काळोखाने आणि गारव्याने सगळेच कसे शहारून गेले होते. पुढे २ तास बोटीने कसे जाणार बोट पाहाल तर अगदी सध्या प्रकारच्या गावकरी मंडळींचा कस पणाला लावणाऱ्या अंधारातून प्रवास चालू झाला तो फक्त जवळ असणाऱ्या टोर्च सोबत एक मेकांना प्रकाश दाखवून आमच्या ४ बोटी मार्गी लागल्या थंड गार वारे आणि पाण्याची नीरव शांतता मनात काहूर माजवत होती शेवटी Handle वर पाय ठेवून हातात असलेल्या टोर्च च्या साह्याने बोट चालवणे हे एक खरच अवगत असलेले तंत्रज्ञान च आहे. मनात असलेली तळमळ, आम्हाला सुखरूप बामणोली गावात पोहचवण्याची जिद्द मानलीच पाहिजे. आयुष्यात अशी माणसे खरच त्यांच्या कडील कौशल्याने आपल्या सारख्या शहरी माणसांवर छाप सोडल्यावाचून राहत नाही. आयुष्यात हेच प्रसंग चिरंतर स्मृतीत कोरले जातात.

 




Replies:
Posted By: Umeshhkarwal
Date Posted: 06 Dec 2014 at 12:08pm
khup chhan aani mast deepaliClapSmile


Posted By: kushal deolekar
Date Posted: 09 Dec 2014 at 1:35pm
उत्तम शाब्दिक वर्णन, त्यासोबत फोटोज ची जोड...
कोणाला हि लावेल वासोटा-नागेश्वर ट्रेक ची ओढ..

खूप छान दिपाली (deeps) 



Posted By: amitsamant
Date Posted: 12 Dec 2014 at 7:04pm
दिपाली , मस्त . 
पण फ़ोटो कुठे आहेत.



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk