| 
 
 शिवाजी महाराज पोवाडा 2 
 महाराजांची,
शिवाजी महाराजांची कीर्ती,
बेफाम होतीमहाराजांची कीर्तीबेफाम,
भल्या भल्यांना फुटला घाम
 याला कोण घाली वेसण, दरबारी पुसती बेगमबडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं
का...
 नजरेत तिच्या अंगार,
दरबार झाला गपगार
 कुणी घेई ना पुढाकार,
सार्यांनीच मानली हार
 इतक्यात अचानक एक सरदार उठला
 बोलला हम लायेंगे शिवाजी को..
 अन त्याने विडा उचलला,
 
 नाव त्याचे अफझल खान
...                                                                                                             
     
 नाव त्याचे अफझल खानजीता जगत जणू शैतान
 खान बोलला छाती ठोकून,
 शिवबाला टाकतो चिरडून..
 मरहब्बा.. सुभानल्लाह..
 कौतुक झालं दरबारात
 खान निघाला मोठ्या गुर्मीत
 त्याचं घोडदळं पायदळं
 फौजा फाटा लई बक्कळं
 अंगी दहा हत्तींच बळ
 पाहणारा कापे चळचळ
 वाटेल भेटेल त्याला चिरडीत,
 ठेचीत,
खानची सेना निघाली
 गावं लुटली,
देवळं उद्वस्त केली
 आया बहिणींची अब्रू लुटली
 कोण,
कोण रोखणार हे वादळ
 आता शिवबाचे काही खरं नाही
 इकडे निजाम,
तिकडे मुघल
 पलीकडे इंग्रज,
जो तो हेच बोलू लागला
 राजाची सेना मुठभर,
खानाला कसा थोपणार
 काय लढवावा हुन्नर,
चिंतेत पंत सरदार...
 ...अश्या वाघिणीचा तो छावा
... (2)
 गनिमाला कसा ठेचावा,
डोक्यात गनिमी कावा
 भेटीचा धाडला सांगावा... प्रतापगडावर,
 प्रतापगडावर आमने सामने
 भेटीचा सांगावा खानानं
 हसत हसत काबुल केला... दिवस ठरला
....
 दिवस ठरला,
अन ठरल्या प्रमाणे
 प्रतापगडाच्या पायथ्याशी खान हा हा हा हा...
 हा प्रतापगडाच्या पायथ्याशी खान... (3)
 आला बेगुमान त्याला नाही जाण
 शिवाजी राज्यांच्या करामतीची...
(3)
 
 अन त्यासी नाही जाणीव शक्तिचीत्यासी नाही जाणीव शक्तिची
 त्यासी नाही जाणीव शक्तिची
 अन करील काय कल्पना युक्तीची
 हा जी जी जी... (3)
 खानच्या भेटीसाठी महाराजांनी
 एक शानदार शामियाना उभारला होता
 भेटीसाठी छान उभारला...
(2)
 नक्षीदार शामियानाला...
(2)
 अन अशा या शामियानात
 खान डौलत डुलत आला...
(2)
 सय्यद बंडा त्याच्या संगतीला...
(2)शिवबाच्या संगती महाला...
(2)
 राजाला पाहून,
राजाला  पाहून
 खान म्हणतो कसा,
हा हा हा...आओ आओ शिवाजी आओ
 हमारे गले लग जा ओ, आओ हा
... हा
... हा
...
 खान हाक मारितो हसरी
...(2)
 रोखून नजर गहिरी
 जी रं
... हा जीरंजी जी जी
...(2)
 खाननं राजाला आलिंगन दिलं
 अन दगा केला,
 खान दाबी मान मान्येला...
(2)
 कट्यारीचा वार त्याने केला
...(2)
 खर खर आवाज झाला
...(2)
 चिलखत व्हतंय अंगाला
...(2)
 खानाचा वार फुका गेला,
खान येडबडला,
 इतक्यात महाराजानं,
पोटामधी बिचुवा ढकलला,
 
 पोटामधी बिचुवा ढकललावाघ नखाचा मारा केला
...(2)
 टरा टरा फाडलं पोटाला
 तडा गेला खानाचा कोथळा
 बाहीर आला जी,
जी,
जी,
...(3)
 
 अज्ञात दास,गुरु ठाकूर
 
 |