Forum Home Forum Home > Historical and Trekking Destinations of India > Trekking Destinations
  New Posts New Posts RSS Feed - Vasota - Nageshwar Trek
  FAQ FAQ  Forum Search   Events   Register Register  Login Login


Vasota - Nageshwar Trek

 Post Reply Post Reply Page  <12
Author
Message Reverse Sort Order
dipali View Drop Down
Newbie
Newbie


Joined: 21 Nov 2014
Location: mumbai
Status: Offline
Points: 18
Post Options Post Options   Thanks (0) Thanks(0)   Quote dipali Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Posted: 02 Dec 2014 at 2:51pm
वासोटा – नागेश्वर : एक विस्मरणीय प्रवास

वासोटा किल्ला ते नागेश्वर गुहा असा आमचा ट्रेक होता. राहुल मेश्राम आमचा ट्रेक लीडर. रोज राहुलला फोन : नाव कनफेर्म झाल की नाही. प्लीझ कर ना काही तरी आणि माझ नाव कनफेर्म कर ना म्हणून रोज त्याला मेसेज आणि फोन. एक दिवस आचानक डोम्बिवली स्टेशनवर असताना राहुलचा फोन आला तुझ नाव कनफेर्म झाल म्हणून, ट्रेकच्या ८ ते १० दिवस आधीच. आता मग काय, पहिला नाईट स्टेय ट्रेक आणि नाव कनफेर्म म्हटल्यावर तयारी एकदम जोरात सुरू झाली. लगेच ट्रेकच्या आधीच्या शनिवारी ट्रेकच्या काही फ्रेंड्स सोबत शोप्पिंग केली. स्लीपिंग बँग, हंड सौक्स, कॅप, वोटर बॉटल etc. फायनली शोप्पिंग झाली.

सोमवार उजाडल्यापासून रोज वाट बघायची ती दिवस संपायची आणि कधी एकदाचा शुक्रवार उजाडतो याची. असे करता–करता आला रे बाबा शुक्रवार पण एवढी एक्साईटमेंट ट्रेकिंगला जायची की शुक्रवारी दुपारी लंचच्या आधी ऑफिस मधून निघाले- बर नाही म्हणून कारण बँग पेक करायची होती म्हणून आणि रात्री ११.०० ला बस निघणार होती.  उगीच संध्याकाळी ६.०० ला ऑफिस मधून निघाले आणि ट्रेनचा प्रोब्लेम झाला, मला लेट झाल किंवा ट्रेकला जाता नाही आल तर !!! म्हणून दुपारीच निघाले, नको रिस्क कशाला घ्यायची ट्रेकच्या बाबतीत!

चला घरी येऊन मस्त बँगपण पेक झाली.  फक्त दुपारचे ३.०० वाजले रात्रभर प्रवास करायचा आहे म्हणून थोडा वेळ झोपून घेऊयात असा विचार केला. पण झोप येते कुठे. जर मला जाग नाही आली आणि लेट झाले तर !!! म्हणून झोपलेच नाही.

दोन दिवसाचा ट्रेक म्हटल्यावर जेवण काय न्यायचं, अजून काय–काय खायला नेता येईल, किती न्याव लागेल याचे मोजमाप आणि तयारी सुरू झाली.  मस्त पैकी बिस्किट्स आणि ड्राय स्नेक्स घेतले आणि जेवायला पराठे आणि ठेचा.  अशी पूर्णतः ट्रेकची बँग तयार झाली फायनली ९.३० झाले. १०.१४ च्या ट्रेनने जाऊ म्हणजे वेळेवर पोहोचेल असे ठरवले. त्यानुसार आंबिवली स्टेशनला पोहोचले. आणि मग थोडा लेट पण ११.०० ला पोहोचले डोंबिवलीत टिळकांच्या पुनळ्याजवळ सगळे बसच्या बाहेर उभे राहून वाटच बघत होते.

नीताची मोठी मस्त जांभळ्या रंगाची छानशी आमची बस होती.  बसच्या मागेच सामानासाठी जागा होती.  तिथेच सगळ्यांच्या बँगा टाकून आम्ही पटापट बसमध्ये आपल्या सीटवर जाऊन बसलो. सगळे आलेत की नाही त्यासाठी एकदा counting झाली आणि मग गणपती बाप्पाचे नाव घेऊन बस सुरू झाली. या ट्रेकची अकाउंटन्ट असल्यामुळे चढताच आधी बसचे किलोमीटर चेक केले आणि मग लीडर सोबत जो काही पैशाचा हिशोब होता तो केला आणि मग माझ्या जागेवर जाऊन बसले.  तोपर्यंत बाकीच्यांनी छान अशी गाणी म्हणायला सुरुवात केली होती. आम्ही टोटल ४८ जण होतो.  त्यातले काही पुण्याहुन तर काही डायरेक्ट साताऱ्याहून येणार होते.  आम्ही जवळपास एक ते दीडच्या सुमारास पुण्यात पोहोचलो आणि ६ जणांना घेऊन पुन्हा बस पुढच्या प्रवासाला निघाली.

पुणे गेल्यानंतर जवळपास सगळेच निद्रेच्या स्वाधीन झाले होते.  मग जवळपास पाच ते सव्वापाचला आम्ही साताऱ्यात पोहोचलो तेथून एका मेंमबरला घेऊन बस पुन्हा पुढच्या प्रवासाला निघाली.  असे करता – करता आम्ही फायनली सात ते सव्वा सातच्या सुमारास बामणोली गावात येऊन पोहोचलो.  बस  मधून उतरल्या उतरल्या समोर छान अस शिवसागर जलाशय.  वातावरणात एकदम प्रसन्नता, निसर्ग अगदी स्वत:हून गुड मोर्निंग बोलत आहे अस वाटत होते.

तिथेच फ्रेश होऊन नष्टा वगेरे करून लगेच आम्ही पावणे आठच्या सुमारास वासोटयाला भेट दयायला निघालो.  वासोट्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला बोटीने प्रवास करायला लागणार होता व त्यासाठी तिथे असलेल्या फोरेस्ठ ऑफिसर्सची परमिशन घेऊन आम्ही १२-१२ जणांचा ग्रुप करून बोटीने निघालो.

                

बोटीचा प्रवास जवळपास २ तासांचा होता.  या प्रवासात आजूबाजूला फक्त आणि फक्त सुंदर असे एकमेकांच्या बाजूला निसर्गाने रचलेले सुंदर असे हिरवे डोंगर दिसत होते.  जशीजशी बोट पुढे चालली होती तसे तसे ते आम्हाला निरोप देत लपत होते.  त्यांना निरोप देत आम्ही पण किनाऱ्याजवळ पोहोचलो.


तिथे छान असा इंट्रोडकशन राउंड घेऊन आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली.  किल्ल्याची चढण थोडी उभीच होती त्यामुळे चढण्याचा वेगही कमी होता.  किल्ला साधारणत: ३८०० ते ४००० फुट उंचीचा असावा अंदाज लावला.  आम्ही जवळपास दोन ते दीड तासात वासोटा गाठला.  पण वासोटा गाठणेही काही सोपे नव्हते.  महाराजांच्या किल्ल्यावर वाटेत असणाऱ्या जळू जणूकाही मराठ्यांचे रक्त तपासूनच वर जाण्याची परवानगी देत होत्या.  आणि थकू नये किव्हा सतत चालत रहा हे सांगण्यासाठी त्या आम्हाला एका ठिकाणी १-२ मिनीटांच्यावर उभ्यापण राहू देत नव्हत्या.  जणू त्या आमची महाराजांणपर्यंत आणि किल्ल्यावर पोहोचण्याची इच्छा बघत होत्या.  त्यांच्या परीक्षेत पास होऊन अखेर किल्ल्यावर पोहोचलो.


वासोटा – वरती पोहोचल्यावर छानपैकी शिवसागर जलाशय दिसत होता.  किल्ल्यावर सुरुवातीलाच मारुतीचे मंदिर आहे आणि त्याच्या मागे अगदी दोन मिनीटांच्या अंतरावर पाण्याचे टाके आहे.  मंदिराच्या द्वारासमोर अगदी थोड्याच अंतरावर महादेवाचे ही मंदिर आहे.  त्या मंदिरात छान अशी पुरनकालीण दगडी शिवलिंग आहे.  आणि महादेवाच्या मंदिरापासून अगदी अर्ध्या मिनीटांच्या अंतरावर बुरुज आहे.  तेथून पुढे खोटा आणि मागे खरा असे दोन्ही नागेश्वर दिसतात.

                      

पाण्याच्या टाकीच्या बाजूला बसून आम्ही जेवण वगैरे केले.  पाण्याचे टाके हे दोन भागात विभागले गेले होते ते दगडी भिंतीने अस म्हणतात पहिल्या टाकीत डोंगरावरचे पाणी पडते व त्यातील वरचे पाणी भिंत ओलांडून पुढच्या टाक्यात पडते.  त्यामुळे ते पाणी आपोआप शुद्ध होते. जेवण करून अगदी वीस मिनीटांमध्ये आम्ही नागेश्वराला भेट दयायला निघालो.

   

नागेश्वर गुहा – नागेश्वराची वाट ही पूर्णतः झाडाझुडपातून असल्यामुळे आम्हाला उन्हाचा त्रास झाला नाही व अगदी दीड ते दोन दासातच आम्ही नागेश्वराच्या गुहेत त्याच्या दर्शनस पोहोचलो. ती गुहा अगदी ४० ते ५० जण सहज मावतील एवढी मोठी होती.  तिथेही छान असे शिवलिंग होते. मग थोडावेळ तिथे घालवून आम्ही परतीच्या प्रवासाला लगेचच सुरुवात केली.  साधारणतः पाच ते साडे पाचला आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.  पण हा प्रवास काही साधा नव्हता कारण नागेश्वर किव्हा वासोटा येथे राहण्याची सोय/परमिशन नसल्यामुळे व वन्य प्राण्यांच्या भीतीपोटी हा प्रवास आम्हाला लवकरात लवकर आणि सुर्यास्तीच्या आधी संपवायचा होता.


रात्री वन्य प्राण्यांना त्रास देत जाण्यापेक्षा ओढ्याच्या मार्गाने जाव असा ग्रुपचा निर्णय ठरला.  मग तसे आम्ही प्रवासाला सुरुवात केली.  ओढ्यातून चालताना फक्त दगड आणि दगड दुसरे काही दिसतच नव्ह्ते. आमच्या सोबत वाटाडी होते दोन पुढे दोन मागे असे. ते अक्षरश: गुरांनसारखे आम्हाला हाकलत पटापट चालवत होते. 

  

जोपर्येंत उजेड होता तोपर्येंत खूप मज्जा वाटत होती दगडातून चालायला उडया मारायला, पण जसजसा सूर्यास्त झाला तसतसे आजूबाजूची झाडे, पाणी, प्राणी, पक्षी सगळेच दिसेनासे झाले.  फक्त मी, माझी टोर्च आणि दगड. अधूनमधून जळू कंपनी देतच होत्या.  काही ठिकाणी तर अगदी स्वतःच्या उंचीचा दगड चढून चालावे लागत होते.  जे पहिल्यांदाच ट्रेकला आले होते ते चालण्यापेक्षा दगडांना जास्त नमस्कार घालत म्हणजे पडत होते.  आम्ही चालत होतो दोन तास झाले अडीच तास झाले चालतच होतो.  पण कुठेही रस्ता संपताना दिसत नव्हता.  मनात तर हे पण आल की हा रस्ता बरोबर आहे न? आपण या जंगलातून बाहेर तर पडू ना? हा ओढा संपेल ना?  असे अनेक प्रश्न मनात उड्या मारत होते. कधी स्वप्नातसुद्धा विचार नव्हता केला की एवढ्या रात्री अंधारातून जंगलातून असा प्रवास करावा लागेल.

बघता बघता मधेच कोणी तरी बोलले अरे आलो रे जमिनीवर म्हणजे दागडामधून बाहेर.  तेव्हा असं वाटल अरे मी “स्वप्न बघत होते की काय”!!!.  पण असो एकदाचे बाहेर आलो त्या दगडांमधून.  तेव्हा दोन मिनिटे मनात विचार आला पुन्हा याच मार्गाने वर चढत जावे आणि सगळ्या दगडांना sorry म्हणून यावे.  त्यांना एवढा त्रास दिला, त्यांना पायथळी तुडवले आणि पडून पडून त्यांची रचना पण खराब केली कारण ते अगदी एकापुढे एक असे रस्ता दाखवण्यासाठी उभे होते.

तुम्हाला काय वाटल संपल आता?  नाही अजून महत्त्वाचे म्हणजे पुन्हा एकदा तो बोटीचा प्रवास, दिवसा दिसणारे सुंदर डोंगर रात्री अगदी एखाद्या राक्षसाप्रमाणे  उभे असल्यासारखे भासत होते.  त्यांच्यातून पूर्ण अंधारातून नावाडयाने टोर्चच्या आधारे बोट चालवली कशी ते त्यालाच माहित.  कारण आम्ही तर चांदण्या रात्री पाण्यातून बोटीतून अगदी गुलाबी थंडीत प्रवासाच आनंद घेत होतो.

पाहता पाहता दीड ते दोन तासात पुन्हा आम्ही बामणोली गावाच्या किनाऱ्याजवळ अगदी आमच्या बस समोर येऊन पोहोचलो. मग तिथेच जेवणाची सोय होती आणि मोठी महादेवाचे मंदिर होते.  अगदी १०० लोक झोपतील एवढ्या आवाराचे होते ते.  तिथेच आम्ही आमचा बिछाना टाकून निद्रेच्या स्वाधीन झालो.

पण कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही बोलतात ना तसंच काहीस झाल आमच्या झोपेचे.  सगळे थकले होते की घोरण्याची स्पर्धा सुरू होती.  “बिचाऱ्या महादेवाची पण झोप नसेल झाली त्या रात्री”!!!.

असो, तर असा हा सुंदर वासोटा आणि नागेश्वर आम्ही एका दिवसात पूर्ण केला.

(फोटो : शेवटचे २ (नागेश्वर मंदिर) - महेंद्र गोवेकर)                                                               

-- दिपाली विलास पाटील | 2.12.2014



Edited by dipali - 02 Dec 2014 at 2:52pm
Back to Top
Sponsored Links


Back to Top
 Post Reply Post Reply Page  <12
  Share Topic   

Forum Jump Forum Permissions View Drop Down

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd.

This page was generated in 1.203 seconds.