| मणिकपूंज
(Manikpunj) |
किल्ल्याची ऊंची : 
2087 |
| किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
|
डोंगररांग: अजंठा सातमाळ |
| जिल्हा : नाशिक |
श्रेणी : मध्यम |
| नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेला व औरंगाबाद जिल्ह्याला लागून असलेल्या अजिंठा-सातमाळ रांगेत मणिकपूंज हा पूरातन व छोटेखानी किल्ला आहे. |
|
|
| पहाण्याची ठिकाणे : |
| गडावर कातळात खोदलेले लेणे आहे. आतमध्ये देवीच्या मुर्तीची स्थापना केलेली आहे. लेण्याच्या वरच्या टप्प्यावर चढून गेल्यावर डाव्या हाताला एक सुकलेले टाके आहे. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर दुसरे सुकलेले टाके व पीर(थडगे) आहे. याशिवाय किल्ल्यावर कुठलेही अवशेष नाहीत. |
| पोहोचण्याच्या वाटा : |
| मनमाड - भुसावळ रेल्वेमार्गावरील नांदगाव स्थानकात उतरुन नांदगाव - औरंगाबाद रस्त्यावरील "कासारबारी" गाव गाठावे. या गावातून "मणिकपूंजला" जाणारा रस्ता आहे. मणिकपूंज गावाच्या मागे किल्ला आहे. |
| राहाण्याची सोय : |
| गडावर रहाण्याची सोय नाही. |
| जेवणाची सोय : |
| गडावर जेवणाची सोय नाही. |
| पाण्याची सोय : |
| गडावर पिण्याचे पाणी नाही. |
| जाण्यासाठी लागणारा वेळ : |
| मणिकपूंज गावातून अर्धातास लागतो. |