मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

पालगड (Palgad) किल्ल्याची ऊंची :  1328
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : रत्नागिरी श्रेणी : सोपी
छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. इतिहासात फारस काही न घडलेला हा किल्ला पालगड गावाच्या मागे दाट झाडीत उभा आहे. खेड - दापोली रस्त्यावर असलेले हे गाव साने गुरुजींच जन्मस्थान आहे. या किल्ल्याचे स्थान पाहाता याचा उपयोग टेहळणीसाठी केला गेला असावा

28 Photos available for this fort
Palgad
Palgad
Palgad
पहाण्याची ठिकाणे :
किल्लेमाची या पालगडच्या पायथ्याशी असलेल्या गावात पोहोचल्यावर गावातूनच एक डांबरी रस्ता गडाकडे जातो. रस्ता जिथे संपतो तिथून 10 मिनिटात आपण गडावर पोहोचतो. वाटेत पायऱ्या जिथे सुरु होतात तिथे दोन बाजूला दोन तोफा ठेवल्या आहेत. पायऱ्या चढून गेल्यावर दोन बुरुज्यांच्या मध्ये उत्तराभीमुख प्रवेशद्वार लागते. प्रवेशद्वारासमोरच एक उ्दध्वस्त वास्तू व तिच्यावर ठेवलेली एक तोफ दिसते. प्रवेशद्वारातून डाव्या बाजूला वळल्यावर उजव्या बाजूला एका ध्वजाखाली 2 तोफा ठेवलेल्या दिसतात. त्यांच्या समोरच एक सुकलेलं टाकं दिसतं. इथून पुढे पश्चिम दिशेला गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर व एक उ्दध्वस्त वास्तू लागते. इथून पुढे गेल्यावर पश्चिम बुरुज लागतो. इथून मागे फिरून दक्षिण दिशेला जात असताना एक उ्दध्वस्त वास्तू लागते. इथून पुढे गेल्यावर किल्ल्याचा दक्षिण बुरुज लागतो. या बुरुजाच्या बाजूला रामदुर्ग (रामगड ) कडे जाणारा रस्ता व उ्दध्वस्त दरवाजा दिसतो. ते पाहून परत मुख्य प्रवेशद्वारापाशी यावे. किल्ल्याचा पसारा आटोपता असल्याने किल्ला पहाण्यासाठी फक्त अर्धा तास पुरतो. किल्ला पाहून झाल्यावर आपण गावात असलेली वैशिष्ट्यपूर्ण समाधी पाहू शकतो. गावकरी ती किल्लेदाराची आहे असं सांगतात.
पोहोचण्याच्या वाटा :
१) खेड - मंडणगड रस्त्यावर किल्ले माची या पालगड किल्ल्याच्या पायथ्याशी जाणारा फाटा आहे. या फाट्यावरून अर्ध्या/पाऊण तासात आपण किल्ले माची या गावात पोहोचतो. किल्ले माची गावात उतरल्यावर १० मिनिटात आपण गडावर पोहोचतो.
२) पालगड गाव मंडणगड - खेड रस्त्यावर आहे. पालगड माची पर्यंत गाडी रस्ता आहे. तेथून हनुमान मंदिराजवळून किल्ल्यावर जाणारी वाट जाते. सध्या ह्या रस्त्याने कोणीही जात नाही.

राहाण्याची सोय :
गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही. परंतू किल्ले माची गावात पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पालगड माचीवरून ३० मिनिटं लागतात व किल्ले माची गावातून १० मिनिटं लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर

Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...