मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
राजकोट (Rajkot) | किल्ल्याची ऊंची :  0 | ||
किल्ल्याचा प्रकार : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले | डोंगररांग: डोंगररांग नाही | ||
जिल्हा : सिंधुदुर्ग | श्रेणी : सोपी | ||
छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदूर्ग किल्ला बांधल्यावर त्याचे रक्षण करण्यासाठी पद्मगड, राजकोट, सर्जेकोट हे किल्ले बांधले. मालवणच्या किनार्यावर उत्तरेकडे खडकाळ व काहीसा उंच भाग आहे. या मोकळ्या जागी राजकोटचा किल्ला बांधण्यात आला. राजकोट किल्ल्यामुळे सिंधुदूर्ग किल्ल्याचे जमिनीवरील हल्ल्यापासून संरक्षण करणे तसेच नैसर्गिक उंचवट्यामुळे सिंधुदूर्गाच्या उत्तरेकडील समुद्रावर लक्ष ठेवणे सहज शक्य झाले. |
|||
|
|||
इतिहास : | |||
राजकोट किल्ल्याची उभारणी शिवाजी महाराजांनी इ.स १६६४ ते १६६७ च्या दरम्यान केली. सन १७६६ मध्ये इंग्रज व करवीरकर यांच्यात झालेल्या तहानुसार राजकोट किल्ल्यात इंग्रजांनी वखारीसाठी व मोठ्या जहाजांना उभे रहाण्यासाठी परवानगी मागितली होती. १८६२ मध्ये किल्ल्यात काही इमारतींचे अवशेष, तुटलेली तटबंदी व एक तोफ असल्याचा उल्लेख आहे. |
|||
पहाण्याची ठिकाणे : | |||
समुद्रामध्ये घुसलेल्या एका खडकावर राजकोट किल्ला बांधलेले होता. तीन बाजूंनी पाणी (समुद्र) व एका बाजूला जमिन असलेल्या ह्या किल्ल्यावर एक बुरुज व तटबंदीचे अवशेष सोडल्यास मुळ किल्ल्याचे कोणतेही अवशेष नाहीत. इसवीसन ०४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनाचे औचित्य साधून या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे. त्या भोवती नव्याने किल्ल्यासारखे बांधकाम केलेले आहे. त्यात मुख्य प्रवेशव्दार, बुरुज आणि तटबंदी बांधण्यात आलेली आहे. प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या हाताला महापुरुषाचे मंदीर व त्यासमोर बनवलेले तुळशी वृंदावन आहे. पुढे एका उंच चौथर्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे. चौथर्याच्या तीन बाजूला माहिती फ़लक लावलेले आहेत. त्यावर शिवकालिन बोटी, शिवमुद्रा आणि सागरी किल्ले यांची माहिती दिलेली आहे. पुतळ्याच्या मागे समुद्राकडे असलेला दर्या दरवाजा आहे. या दर्या दरवाजातून बाहेर पडल्यावर आपण राजकोट किल्ल्याच्या उरलेल्या भागात फ़िरु शकतो. राजकोट किल्ल्यावरुन सिंधुदूर्ग किल्ला व आजुबाजुचा परिसर दिसतो. राजकोट परिसरात पाहाण्यासारखी इतर ठिकाणे :- मौनी महाराज मंदिर: शिवाजी महाराजांनी उभारलेले जांभ्या दगडातील मौनी महाराजांचे मंदिर मेढा राजकोट या भागात आहे. गणेश मंदिर: मालवणहून राजकोट किल्ल्यावर जाताना वाटेत सुवर्ण(सोन्याच्या) गणेशाचे मंदिर आहे. रॉक गार्डन:- राजकोटच्या आसपास असलेल्या खडकाळ भागात रॉक गार्डन बनवण्यात आले आहे. येथील खडकावर आपटून फूटणार्या लाटा पहातांना वेळेचे भान राहत नाही. येथून समुद्रात होणारा सूर्यास्त अप्रतिम दिसतो. | |||
पोहोचण्याच्या वाटा : | |||
१) सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाणार्या बोटी मालवण जेट्टीवरुन सुटतात. त्या जेट्टी पासून उत्तरेकडे किनार्याने चालत गेल्यास १५ मिनिटात राजकोट किल्ल्यावर जाता येते. २) मालवण एस टी स्टँडवरुन सुटणार्या सर्व बसेस बाजारातून फिरुन जातात या बसेसनी वडाच्या पारावर उतरुन राजकोटला १० मिनीटात चालत जाता येते. सुवर्ण(सोन्याच्या) गणपती मंदिरापासून फुटणार्या डाव्या हाताचा रस्ता राजकोटला व उजव्या हाताचा रस्ता रॉक गार्डनला जातो. | |||
राहाण्याची सोय : | |||
गडावर नाही, मालवणात रहायची सोय आहे | |||
जेवणाची सोय : | |||
गडावर नाही, मालवणात जेवणाची सोय आहे | |||
पाण्याची सोय : | |||
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. | |||
सूचना : | |||
१) मालवणहून सकाळी निघून भरतगड, भगवंतगड, सर्जेकोट हे किल्ले पाहून संध्याकाळी सिंधुदूर्ग व राजकोट हे किल्ले स्वत:च्या / खाजगी वहानाने (एस टी ने नव्हे) एका दिवसात पाहाता येतात. २) भरतगड, भगवंतगड, सर्जेकोट,सिंधुदूर्ग या किल्ल्यांची माहीती साईटवर दिलेली आहे. |