मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

रिवा किल्ला (Riwa Fort) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : मुंबई श्रेणी : सोपी
इ.स. १६७२ साली जंजिर्‍याच्या सिध्दीने मुंबईवर केलेल्या हल्ल्यानंतर इंग्रजांनी जे नविन किल्ले बांधले त्यात सायनच्या टेकडीवर असणार्‍या रिवा किल्ल्याचा समावेश होतो. माहीमच्या खाडीमुळे मुंबई बेटे, मुख्य जमिनीपासून व साष्टी बेटांपासून वेगळी झाली होती. त्या काळात माहीमच्या खाडीतून व्यापार चालत असे. तसेच साष्टी बेट पोर्तुगिजांच्या ताब्यात होते. त्यामुळे माहीमच्या खाडीतून चालणार्‍या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी व उत्तरे कडून होणार्‍या पोर्तुगिज व मराठ्यांच्या संभाव्य हल्ल्यांना तोंड देण्यासाठी इंग्रज जेरॉल्ड ऑगियरने इ.स. १६७२ मध्ये हा किल्ला बांधला.


Riva Fort
6 Photos available for this fort
Riwa Fort
पहाण्याची ठिकाणे :
रिवा किल्ल्याचा एकमेव अवशेष म्हणजे काळ्या पाषाणात उभा असलेला बुरुज.
पोहोचण्याच्या वाटा :
मध्य रेल्वेच्या सायन स्थानकावर उतरुन पूर्वेकडील डाव्या हाताच्या फुटपाथने चालत गेल्यावर २ मिनिटात आपण शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालयाजवळ पोहोचतो. ह्या महाविद्यालयाच्या परिसरात टेकडीच्या उतारावर आयुर्वेदिक वनस्पतींची बाग केलेली आहे. ह्या बागेतच रिवा किल्ल्याचा साक्षीदार असलेला एकमेव बुरुज उभा आहे.

Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...