मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

अनंतपूर किल्ला (Anantapura Fort) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : कर्नाटक (अथणी) श्रेणी : सोपी
महाराष्ट्राच्या सीमे जवळ असलेल्या डफळापूर गावापासून १०.५ किलोमीटर अंतरावर कर्नाटक राज्यातील अथणी जिल्ह्यात अनंतपूर नावाचा भुईकोट किल्ला आहे. किल्ल्यातील गुप्तधन शोधाण्यासाठी किल्ल्याचे सर्व बुरुज तटबंदी, वास्तू नष्ट करण्यात आलेल्या आहेत. एवढ्या वरच न थांबता किल्ल्याचे दगडही गायब झालेले आहेत. तरीही किल्ल्याचे काही अवशेष आजही उभे आहेत. ते पाहिले की किल्ल्याच्या भव्यतेची कल्पना करता येते.

सांगली जिल्ह्यातील जुना पन्हाळा, रामगड किल्ला, डफळापूरची गढी आणि अंनतपुरचा भुईकोट किल्ला हे किल्ले खाजगी वहानाने एका दिवसात पाहाता येतात.

11 Photos available for this fort
Anantapura Fort
Anantapura Fort
Anantapura Fort
पहाण्याची ठिकाणे :
अनंतपूर गावातून किल्ल्याकडे जाताना किल्ल्याचे पश्चिमाभिमुख बुलंद प्रवेशद्वार आणि त्या बाजूचे दोन भक्कम बुरुज पाहायला मिळतात. किल्ल्याच्या भोवती एकेकाळी खंदक असावा आज तो बुजलेला आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारा समोर एक बुरुज उभारून त्यावर थेट मारा होणार नाही याची काळजी घेण्यात आलेली येथे पाहायला मिळते. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या कमानीवर दोन्ही बाजूला कमळाची फुलं कोरलेली आहेत, तर कामानीच्या मधोमध एक नक्षीदार फुल कोरलेले आहे. प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर पहारेकऱ्यांसाठी असलेल्या देवड्या पाहायला मिळतात.

प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर किल्ल्याची संपूर्ण तटबंदी आणि बुरुज नष्ट झालेले पाहायला मिळतात. किल्ल्यातील वास्तूही नष्ट झालेल्या आहेत. किल्ल्यात एक छोटे देऊळ (समाधी) पाहायला मिळते. या देवळाजवळ एक कोरडी विहीर आहे. किल्ल्याच्या मागे एक मोठा तलाव आहे. किल्ल्याची पाण्याची गरज भागवण्यासाठी हा तलाव खोदलेला असावा.
पोहोचण्याच्या वाटा :
महाराष्ट्राच्या सीमेजवळ असलेल्या डफळापूर गावापासून १०.५ किलोमीटर अंतरावर कर्नाटक राज्यातील अथणी जिल्ह्यात अनंतपूर नावाचा भुईकोट किल्ला आहे. सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ या तालुक्याच्या गावापासुन २८ किलोमीटर अंतरावर अनंतपूर किल्ला आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
जिल्हा karnatak (Athani)
 अनंतपूर किल्ला (Anantapura Fort)