मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
भवानगड (Bhavangad) | किल्ल्याची ऊंची :  165 | ||
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: डोंगररांग नाही | ||
जिल्हा : ठाणे | श्रेणी : सोपी | ||
पश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा मुंबईकरांमध्ये प्रसिध्द आहे. या केळवे गावापासून ३ किमी अंतरावर भवानगड हा छोटेखानी किल्ला आहे. वसई मोहिमेदरम्यान पोर्तुगिजांवर वचक बसविण्यासाठी मराठ्यांनी या किल्ल्याची निर्मिती केली होती. दरवर्षी शिवरात्रीला या गडावर भवानगडेश्वराची यात्रा भरते.
|
|||
|
|||
इतिहास : | |||
इ.स. १५२६ साली पोर्तुगिजांनी वसई किल्ल्याची उभारणी सुरु केली. त्याच बरोबर या भागावर वर्चस्व ठेवण्यासाठी शिरगाव, माहीम, केळवे या परिसरात किल्ल्यांची साखळीच तयार केली. पोर्तुगिजांनी स्थानिक जनतेवर धर्मांतरासाठी अत्याचार केले. या जुलमाच्या तक्रारी पेशव्यांकडे गेल्यावर, इ.स १७३७ मध्ये नरवीर चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली गंगाजी नाइक, शंकराजी फडके, बाजी रेठरेकर इ मातब्बर सरदार पोर्तुगिजांचे समूळ उच्चाटण करण्यासाठी पुढे सरसावले. वसई मोहिमेत १७३७ च्या ऐन पावसाळ्यात २००० मजूरांकडून भवानगडाची उभारणी करण्यात आली. दांडाखाडीच्या रक्षणासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. वसई मोहिमेत या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली |
|||
पहाण्याची ठिकाणे : | |||
भवानगड छोट्या झाडीभरल्या टेकडीवर उभा आहे. पायथ्यापासून १० मिनिटात आपण भवानगडाच्या भग्न प्रवेशद्वारातून माचीवर प्रवेश करतो. माचीची तटबंदी मोठ मोठे दगड एकमेकांवर रचुन केलेली आहे.किल्ल्याची ऊभारणी युध्द पातळीवर केल्यामुळे या बांधकामात चून्याचा वापर केलेला आढळत नाही. गडाच्या माचीवर भवानगडेश्वराचे जिर्णोध्दारीत मंदिर आहे. गडाच्या बालेकिल्ल्याचे पश्चिमाभिमूख प्रवेशद्वार गोमुखी पध्दतीचे आहे. याची कमान ढासळलेली आहे. परंतू बाजूचे बुरुज व तटबंदी शाबूत आहेत. बालेकिल्ल्याच्या प्रवेशव्दाराच्या बांधकामात चुन्याचा वापर केलेला आढळतो. प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूस पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. तेथून पुढे गेल्यावर दुसर्या उध्वस्त प्रवेशद्वारातून आपला बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. समोरच पाण्याचे चौकोनी आकाराचे खडकात बांधलेले टाक दिसते. त्याच्या बाजूने गावकर्यांनी सिमेंटचा कट्टा बांधलेला आहे. टाक्यात भरपूर पाणी साठा आहे. बालेकिल्ल्यांचा परिसर दाट झाडीत लपलेला आहे. टाक्याच्या उजव्या बाजूस असलेल्या तटबंदीवरुन गडफेरी चालू करावी. तटबंदीच्या उत्तर- पूर्व बाजूने एक पायवाट खाली उतरते. या वाटेवर डाव्या बाजूस दगडात खोदलेल्या दोन गुहा दिसतात. त्यांचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असावा, ही पायवाट पूढे दांडपाड्यात जाते. आपण आल्या वाटेने परत तटबंदीवर जाऊन गडफेरी पूर्ण करावी. भवानगडावरुन दांडा खाडी व आजुबाजूचा विस्तृत प्रदेश दिसतो. | |||
पोहोचण्याच्या वाटा : | |||
१) पश्चिम रेल्वेवरील केळवे व सफाळे या स्थानकांवरुन भवानगड सारख्याच अंतरावर आहे. सफाळे स्थानकात उतरुन दातिवरे गावात जाणार्या बसने किंवा ६ आसनी रिक्षाने मधुकरनगर स्टॉपवर उतरावे येथून दिड किमी वर भवानगड आहे. २) केळवे स्थानकात उतरुन ६ आसनी रिक्षाने केळवे गावात यावे. गावातील चौकातून डाव्या हाताचा रस्ता दांडा खाडी ओलांडून दांडा गाव, खटाली गाव या मार्गे भवानगडाला जातो. हे अंतर ३ किमी आहे. या मार्गाने केळवे पाणकोट, फुटका बुरुज, कस्टम किल्ला, दांडा किल्ला पहात भवानगडाला जाता येते. | |||
राहाण्याची सोय : | |||
गडावरील भवानगडेश्वर मंदिरात रहाण्याची व्यवस्था होऊ शकते. | |||
जेवणाची सोय : | |||
गडावर जेवणाची व्यवस्था नाही, पण केळवे गावात आहे. | |||
पाण्याची सोय : | |||
गडावर पाण्याची बारामाही व्यवस्था आहे. | |||
सूचना : | |||
) भवानगड(१५ किमी), दांडा किल्ला, फुटका बुरुज, कस्टम किल्ला (१५किमी), केळवे पाणकोट (१५ किमी) केळवे भुईकोट (३ किमी) माहिमचा किल्ला व (५ किमी) शिरगावचा किल्ला हे सर्व किल्ले एका दिवसात पाहून होतात. परंतु यासाठी समुद्राच्या भरती ओहोटीची वेळ माहित असणे फार महत्वाचे आहे. कारण केळवे पाणकोट केवळ ओहोटीच्या वेळी पाहाता येतो. ओहोटीची वेळ पाहून व्यवस्थित नियोजन केल्यास सर्व किल्ले एका दिवसात आरामात पाहाता येतात. पालघर किंवा केळवेहून दिवसभरासाठी ६ आसनी रिक्षा मिळू शकते. २) केळवे माहिम परिसरातील ६ किल्ले स्वत:च्या वाहनाने किंवा रिक्षाने एका दिवसात पाहाता येतात. त्यासाठी प्रथम भरती ओहोटीचे वेळापत्रक पहावे, कारण केळवे पाणकोट केवळ ओहोटीच्या वेळी पाहाता येतो. जर ओहोटी सकाळी असेल तर प्रथम केळवे पाणकोट पहावा. नंतर दांडा किल्ला, भवानगड पाहून परत केळवेत यावे. जेवण करुन केळवे भुईकोट , माहिमचा किल्ला, शिरगावचा किल्ला पाहून पालघरला जावे. ओहोटी संध्याकाळी असल्यास पालघर स्थानकात उतरुन रिक्षा करुन ५ किमी वरील शिरगाव (५ किमी) वरील माहिमचा किल्ला, महकावती देवीचे मंदीर (४ किमी वरील) केळवे भुईकोट ,(३ कि मी) वरील भवानगड पाहून शेवटी परत केळवे गावात येऊन ओहोटीला केळवे पाणकोट पहावा व ८ किमी वरील केळवे स्थानक गाठावे. ३) दांडा किल्ला, केळवे पाणकोट, केळवे भुईकोट , माहिमचा किल्ला, शिरगावचा किल्ला यांची माहिती साईटवर दिलेली आहे. |
श्रेणी: Easy | अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort) | अग्वाडा (Aguada) | अजिंठा (Ajintha Fort) | अजिंठा सराई (Ajintha Sarai) |
अकलूजचा किल्ला (Akluj Fort) | अंमळनेर (Amalner) | आंबोळगड (Ambolgad) | अमरावतीचा किल्ला (Amravati Fort) |
अनंतपूर किल्ला (Anantapura Fort) | अर्नाळा (Arnala) | औसा (Ausa) | आवाडे कोट (Awade Kot) |
बहादरपूर (Bahadarpur Fort) | बहादूरगड (पेडगावचा किल्ला) (Bahadurgad (Pedgaon Fort)) | बहादूरवाडी गड (Bahadurwadi gad) | बाळापूर किल्ला (Balapur Fort) |
बल्लाळगड (Ballalgad) | बांदा किल्ला (Banda Fort) | बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort) | बेलापूरचा किल्ला (Belapur Fort) |
बेळगावचा किल्ला (Belgaum Fort) | भगवंतगड (Bhagwantgad) | भांगसी गड (भांगसाई गड) (Bhangsigad(Bhangsi mata gad)) | भरतगड (Bharatgad) |
भवानगड (Bhavangad) | चाकणचा किल्ला (Chakan Fort) | चापोरा किल्ला (Chapora Fort) | कुलाबा किल्ला (Colaba) |
डफळापूर गढी (Daflapur Fort) | डहाणू किल्ला (Dahanu Fort) | दांडा किल्ला (Danda Fort) | दासगावचा किल्ला (Dasgaon Fort) |
दौलतमंगळ (Daulatmangal) | देवगडचा किल्ला (Devgad Fort) | धामणगाव गढी (Dhamangaon Gadhi) | धारावी किल्ला (Dharavi Fort) |
धर्मापूरी (Dharmapuri) | धारूर (Dharur) | धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi)) | डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera)) |
दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort) | डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort)) | फर्दापूर सराई (Fardapur Sarai) | फत्तेगड / फतेदुर्ग (Fattegad) |
गाविलगड (Gavilgad) | गोवा किल्ला (Goa Fort) | हिराकोट (Hirakot) | इंदुरीचा किल्ला (गढी) (Induri Fort (Gadhi)) |
जयगड (Jaigad) | जामगावचा किल्ला (Jamgaon Fort) | जंजिरा (Janjira) | काकती किल्ला (Kakati Fort) |
काळाकिल्ला (Kala Killa) | कांबे कोट (Kambe Kot) | कंधार (Kandhar) | करमाळा (Karmala Fort) |
केळवे किल्ला (Kelve Fort) | खारबाव कोट (Kharbao kot) | खर्डा (Kharda) | खारेपाटण (Kharepatan fort) |
खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort)) | कोटकामते (Kotkamate) | लहुगड (Lahugad) | लोंझा (Lonza) |
माचणूर (Machnur) | मढचा किल्ला(वर्सोवा किल्ला) (Madh Fort (Varsova Fort)) | माढा गढी/किल्ला (Madha Fort) | महादेवगड (Mahadevgad) |
माहीमचा किल्ला (Mahim Fort) | माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim)) | मालेगावचा किल्ला (Malegaon Fort) | मांडवी कोट (Mandvi Kot) |
मंगळवेढा (Mangalwedha) | मोहोळ गढी/किल्ला (Mohol Fort) | मोटी दमण किल्ला (Moti Daman Fort) | नगरचा किल्ला (Nagar Fort) |
नगरधन (Nagardhan) | नागलाबंदर किल्ला (Nagla bunder Fort) | नळदुर्ग (Naldurg) | नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri)) |
नांदरुखी कोट (Nandrukhi Kot) | नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) (Nani Daman Fort (St.Jerome Fort)) | नारायणगड (आंबोली) (Narayangad(Amboli)) | नरनाळा (Narnala) |
नस्तनपूरची गढी (Nastanpur) | निवतीचा किल्ला (Nivati Fort) | पाचाड कोट (Pachad Fort) | पाच्छापूर किल्ला (Pachhapur Fort) |
पालचा किल्ला (Pal Fort) | पळशीचा किल्ला (Palashi Fort) | पालगड (Palgad) | पन्हाळगड (Panhalgad) |
परांडा (Paranda) | पारडी किल्ला (Pardi Fort) | पारोळा (Parola) | पिलीवचा किल्ला (Piliv Fort) |
पिंपळास कोट (Pimplas Kot) | प्रतापगड (Pratapgad) | पूर्णगड (Purnagad) | ऱाजापूरची वखार (Rajapur Fort (British warehouse)) |
राजहंसगड (येळ्ळूरचा किल्ला) (Rajhansgad (Yellur Fort)) | राजकोट (Rajkot) | रामदुर्ग (Ramdurg) | रसलपूरचा किल्ला (सराई) (Rasalpur Sarai (Fort)) |
रेवदंडा (Revdanda) | रिवा किल्ला (Riwa Fort) | सामराजगड (Samrajgad) | सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug)) |
सर्जेकोट (मालवण) (Sarjekot(Malvan)) | साटवलीचा किल्ला (Satavali Fort) | शिवडीचा किल्ला (Sewri Fort) | शिरगावचा किल्ला (Shirgaon) |
शिवथरघळ (Shivtharghal) | सिंधुदुर्ग (Sindhudurg) | सिंदखेडराजा (Sindkhed Raja) | सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort) |
सिताबर्डी किल्ला (Sitabuldi fort(Sitabardi Fort)) | सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort) | सोनगिरी (नाशिक) (Songir (Nashik)) | सुभानमंगळ (Subhan Mangal) |
सुधागड (Sudhagad) | सुलतान गढी (Sulatan Gadhi) | तारापुर किल्ला (Tarapur Fort) | तेरेखोलचा किल्ला (Terekhol Fort) |
उदगीर (Udgir) | वज्रगड(वसई) (Vajragad (Vasai)) | वसई (Vasai) | वेहेळे कोट (Vehele Kot) |
विजयदुर्ग (Vijaydurg) | वरळीचा किल्ला (Worli Fort) | यशवंतगड (रेडीचा किल्ला) (Yashawantgad (Redi Fort)) | यशवंतगड(नाटे) (Yashwantgad(Nate)) |
यावल (निंबाळकर किल्ला) (Yawal Fort (Nimbalkar Fort)) |