| भिवागड  
                                       (Bhivagad) | किल्ल्याची ऊंची : 
	  	  1446 | 
    
		| किल्ल्याचा प्रकार  : गिरीदुर्ग | डोंगररांग: भिमसेन कुवारा | 
	
	
				
				| जिल्हा : नागपूर | श्रेणी : मध्यम | 
		
	
		
			| भिवागड किल्ला सध्या भिमसेन कुवारा या नावाने ओळखला जातो. भिमसेन कुवारा हे पेंच अभयारण्याच्या परिसरातील प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी भक्त आणि पर्यटकांचा राबता कायम असतो. पेंच धरणाच्या बॅक वॉटरने किल्ल्याला तीन बाजूने विळखा घातलेला आहे. त्यामुळे किल्ल्याच्या आजूबाजूला पसरलेले पाणी आणि दूरवर दिसणारे घनदाट जंगल यामुळे हा परिसर खूप सुंदर दिसतो . | 
	
	
	
        |  | 
								
	
	
	| पहाण्याची ठिकाणे : | 
			
	
		
| भिवागडच्या पायथ्यापर्यंत खाजगी वहानाने जाता येते . वहानतळा जवळ जलाशयाला लागून भिमसेन कुवाराचे मंदिर आहे . आदिवासी दंतकथेनुसार भिमसेन गडा वरील त्याच्या स्थाना वरून ३ पावलात या ठिकाणी येउन बसला . मंदिराच्या थोडे पुढे एक पाण्याची चौकोनी विहीर आहे . या ठिकाणी भिमसेनने दुसरे पाऊल ठेवले होते . येथून मळलेल्या पायवाटेने भिवागड किल्ल्याच्या दिशेने जातांना एक ओढा ओलांडावा लागतो . या ओढ्या जवळ भिमसेनने पहिले पाउल ठेवले होते . ओढ्याच्या पुढे वाट चढत, वळसे घेत किल्ल्याच्या डोंगरा पर्यंत जाते . किल्ल्याच्या डोंगराला भिडलो की खडा चढ चालू होतो . साधारणपणे १५ मिनिटात आपण बुरुजाजवळ पोहोचतो. हा बुरुज दगड एकमेकावर रचून बनवलेला आहे . या किल्ल्यावरील सर्व बुरूज चौकोनी आहेत आणि तटबंदीही रचीव दगडांची आहे . या बुरुजापासून पाच मिनिटात गड माथ्यावर पोहोचतो . इथे एका अनघड दगडाला शेंदूर लावलेला आहे . त्याला भीमसेन कुवारा म्हणतात . इथे एक पिंड सुध्दा आहे . डाव्या बाजूला एका बुरुजाचे अवशेष आहेत . भिमसेनाचे दर्शन घेउन उजव्या बाजूला पुढे चालायला सुरुवात केल्यावर एक खड्डा दिसतो या ठिकाणी एकेकाळी बारमाही पाणी मिळत होते . पण आता तेथे पाणी नाही आहे . या ठिकाणावरून थोडे खाली उतरुन मळलेल्या पायवाटेने सरळ चालत जातांना या पायवाटेला समांतर खालच्या बाजूला चौकनी बुरूज आणि तटबंदी पाहायला मिळतात . या पायवाटेने राणी महालाच्या दिशेने खाली उतरल्यावर किल्ल्याच्या साधारण पाव उंचीवर एक दरवाजा आहे . किल्ल्याच्या खाली राणीमहाल नावाची वास्तू आहे . महालातून किल्ल्यावर जाण्यासाठी हे प्रवेशव्दार होते. ऱाणी महाल सध्या धरणाच्या जलाशयात बुडालेला आहे. तो पाहाण्यासाठी बोटीने जावे लागते . वहानतळा जवळून बोटी सूटतात. माणशी ५०/- रुपये शुक्ल घेतात. 
 किल्ल्याचे प्रवेशद्वार पाहून आल्या मार्गाने पुन्हा किल्ल्यावर आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते . किल्ला पाहाण्यासाठी पाउण तास लागतो .
 
 
 | 
	
	
		| पोहोचण्याच्या वाटा : | 
	
		| नागपूर ते भिवागड (भिमसेन कुवारा) अंतर ४६ किलोमीटर आहे. 
 | 
	
		| राहाण्याची सोय : | 
		| किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात राहाण्याची सोय होवू शकेल. 
 | 
	
		
| जेवणाची सोय : | 
		| किल्ल्यावर जेवणाची सोय नाही . 
 | 
	
		
| पाण्याची सोय : | 
		| किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही . 
 | 
	
		
| जाण्यासाठी लागणारा वेळ : | 
		| पायथ्यापासून अर्धा तास लागतो. | 
	
		
| जाण्यासाठी उत्तम कालावधी : | 
		| सप्टेंबर ते मार्च |