मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
इंद्राई (Indrai) | किल्ल्याची ऊंची :  4490 | ||||||
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: अजंठा सातमाळ | ||||||
जिल्हा : नाशिक | श्रेणी : मध्यम | ||||||
नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीची एक डोंगररांग सुरगणा पासून चालू होते आणि चांदवड पर्यंत येऊन संपते. पुढे तीच मनमाडच्या जवळ असणार्या अंकाइ किल्ल्यापर्यंत जाते. याच रांगेला अजंठा - सातमाळ रांग म्हणतात. चांदवड तालुक्यात ४ किल्ले येतात, राजधेर, कोळधेर, इंद्राई आणि चांदवड . राजधेरवाडी हे राजधेर व इंद्राई किल्ल्यांच्या पायथ्याचे गाव आहे. त्यामुळे येथे २ दिवस मुक्काम करून दोनही किल्ले पाहाता येतात. तसेच तिसर्या दिवशी राजधेर ते कोळधेर हा ट्रेक करता येतो. त्यासाठी गावातून वाटाड्या घेणे आवश्यक आहे. राजधेर - कोळधेर - राजधेरवाडी हा ट्रेक करण्यास साधारणतः १० ते १२ तास लागतात. |
|||||||
|
|||||||
पहाण्याची ठिकाणे : | |||||||
राजधेरवाडी किंवा वडबारे मार्गे गड चढतांना आपण कातळ भिंतीपाशी येऊन पोहोचतो. या कातळकड्यापाशी कातळात खोदलेल्या २ गुहा आहेत. यापैकी एका गुहेत पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. हि कातळभिंत कोरुन गडावर जाण्याचा मार्ग बनविलेला आहे. याची रचना एका बाजूने कापलेल्या नळी सारखी आहे. या मार्गावरून चालतांना आपल्या माथ्यावर कातळभिंतीचे छत असते. या मार्गाने ५० पायर्या चढून गेल्यावर वाट काटकोनात वळते. येथे कातळ फोडून खिंडी सारखी रचना केलेली आहे. या मार्गाने अंदाजे १०० पायर्या चढून गेल्यावर प्रवेशद्वाराच्या अलिकडेच डाव्या बाजूच्या कातळात कोरलेला फारसीतील शिलालेख पाहायला मिळतो. गडाच्या प्रवेशद्वाराचे अवशेष केवळ आजमितिस शिल्लक आहेत. प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश केरुन पुन्हा थोडी चढाई केल्यावर समोरच्या बाजूस व उजवीकडे कातळात खोदलेल्या गुहा दिसतात. याच ठिकाणी तीन वाटा फूटतात. प्रथम उजवीकडची वाट पकडावी थोड्याच अंतरावर कातळात खोदलेल्या गुहांची रांग दिसते. येथून समोर राजधेर व डावीकडे कोळधेर किल्ला दिसतो. दूरवर धोडप, इखारा, कांचना, रवळ्या-जावळ्या इत्यादी किल्ले दिसतात. या सर्व गोष्टी पाहून परत मागे फिरावे. नंतर वर जाणारी वाट पकडावी. थोडे अंतर चढून बुजलेले पाण्याचे टाक आणि वास्तुचे अवषेश पाहायला मिळतात. येथून सरळ वर चढत जाणारी वाट गडाच्या सर्वोच्च टोकावर जाते. तर वास्तुच्या बाजुने खाली उतरणारी वाट पकडून गेल्यास कातळात खोदलेले महादेवाचे मंदिर लागते. मंदिरासमोर दगडात बांधून काढलेला तलाव आहे. मंदिराच्या बाजूला कातळात खोदलेली अरुंद गुहा आहे. मंदिरावरुन पुढे जाणार्या वाटनेही गडाच्या सर्वोच्च टोकावर जाता येते .महादेवाचे दर्शन घेऊन गुहेच्या वर चढून गेल्यावर एक मोठा तलाव आहे. तलावात उतरण्यासाठी पायर्या कातळात कोरलेल्या पायर्या आहेत, तलाव पाहून परत मागे फिरावे आणि महादेव मंदिराकडे यावे. आता डावीकडची वाट पकडावी. थोडे पुढे गेल्यावर कातळात कोरलेल्या पायर्या उतरुन गेल्यावर उजव्या बाजूला पाण्याचे टाक आहे. डाव्या बाजूला कातळात खोदलेल्या १८ ते २० गुहांची रांग दिसते. या गुहांमध्ये कोणत्याही प्रकारचे कोरीवकाम आढळत नाही. या गुहांमध्ये बराच राडारोडा जमलेला असल्याने गुहा राहण्यासाठी योग्य नाहीत. गुहेंच्या रांगेच्या शेवटी बारमाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. येथून समोर २ शिखरे असलेला डोंगर दिसतो, त्याला साडेतीन रोडग्यांचा डोंगर असे म्हणतात. या डोंगराच्या मागे नाशिक - धुळे महामार्ग आणि त्याच्या मागे चांदवड किल्ला दिसतो. येथून किल्ल्याच्या प्रवेशव्दारा जवळ आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. इंद्राई किल्ला पाहाण्यासाठी २ तास लागतात. | |||||||
पोहोचण्याच्या वाटा : | |||||||
१) राजधेरवाडी मार्गे :- चांदवडहून राजधेरवाडी कडे जाणारी बस पकडावी आणि राजधेरवाडीत उतरावे. वडबारे गावाच्या पुढे राजधेरवाडी आहे. राजधेरवाडी हे राजधेर व इंद्राई किल्ल्यांच्या पायथ्याचे गाव आहे. राजधेरवाडी गावामागे इंद्राई किल्ला आहे. गावातून एक रस्ता इंद्राई किल्ल्याच्या डोंगराकडे जातो. मळलेल्या पायवाटेने सुमारे अर्धा तास चढाई केल्यावर एक पठार लागते. येथून कातळ भिंतीच्या डाव्या टोकापर्यंत पोहोचण्यास सुमारे १ तास लागतो. किल्ल्याच्या कातळकड्यापाशी वडबारे गावातून येणारी वाट येऊन मिळते. कातळकड्यापाशी पोहोचल्यावर त्याला वळसा घालून राजधेरवाडी गावाच्या विरुध्द दिशेला गेल्यावर, कातळात खोदलेल्या पायर्यांची वाट आपल्याला गडावर घेऊन झाते. या वाटेने किल्ला गाठण्यास २ ते ३ तास लागतात. राजधेरवाडी गावाच्या पुढे धरण आहे. या धरणापर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे. धरणाच्या भिंतीजवळ इंद्राई किल्ल्याच्या डोंगराची सोंड उतरलेली आहे. या सोंडेवरुन तास भर चढल्यावर आपण कातळभिंती पाशी पोहोचतो. कातळ भिंतीच्या डाव्या टोकापर्यंत पोहोचण्यास सुमारे अर्धा ते पाउण तास लागतो. येथून कातळकड्याला वळसा घालून राजधेरवाडी गावाच्या विरुध्द दिशेला गेल्यावर, कातळात खोदलेल्या पायर्यांची वाट आपल्याला गडावर घेऊन झाते. या वाटेने किल्ला गाठण्यास २ ते ३ तास लागतात. २) वडबारे मार्गे :- चांदवडहून राजधेरवाडी कडे जाणारी बस पकडावी. चांदवड पासून ६ किंमी अंतरावर असणार्या वडबारे गावात उतरावे. वडबारे गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी एक ठळक पायवाट आहे. या वाटेने किल्ल्यावर जातांना एक झाप लागतो. ही वाट किल्ल्याच्या कातळकड्यापाशी राजधेरवाडीतून येणार्या वाटेला येऊन मिळते. गावातून किल्ल्यावर पोहचण्यास ३ तास लागतात. | |||||||
राहाण्याची सोय : | |||||||
किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहेत, तसेच महादेव मंदिरात ५ जणांची राहण्याची सोय होते. | |||||||
जेवणाची सोय : | |||||||
राजधेरवाडीत जेवणाची सोय होते. | |||||||
पाण्याची सोय : | |||||||
किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे. | |||||||
जाण्यासाठी लागणारा वेळ : | |||||||
वडबारे गावातून ३ तास लागतात. राजधेरवाडी गावातून २ ते ३ तास लागतात. | |||||||
सूचना : | |||||||
१) राजधेरवाडी हे राजधेर व इंद्राई किल्ल्यांच्या पायथ्याचे गाव आहे. त्यामुळे येथे २ दिवस मुक्काम करून दोनही किल्ले पाहाता येतात. तसेच तिसर्या दिवशी राजधेर ते कोळधेर हा ट्रेक करता येतो. त्यासाठी गावातून वाटाड्या घेणे आवश्यक आहे. राजधेर - कोळधेर - राजधेरवाडी हा ट्रेक करण्यास साधारणतः १० ते १२ तास लागतात. २) राजधेर किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे. |
श्रेणी: Easy | अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort) | अग्वाडा (Aguada) | अजिंठा (Ajintha Fort) | अजिंठा सराई (Ajintha Sarai) |
अकलूजचा किल्ला (Akluj Fort) | अंमळनेर (Amalner) | आंबोळगड (Ambolgad) | अमरावतीचा किल्ला (Amravati Fort) |
अनंतपूर किल्ला (Anantapura Fort) | अर्नाळा (Arnala) | औसा (Ausa) | आवाडे कोट (Awade Kot) |
बहादरपूर (Bahadarpur Fort) | बहादूरगड (पेडगावचा किल्ला) (Bahadurgad (Pedgaon Fort)) | बहादूरवाडी गड (Bahadurwadi gad) | बाळापूर किल्ला (Balapur Fort) |
बल्लाळगड (Ballalgad) | बांदा किल्ला (Banda Fort) | बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort) | बेलापूरचा किल्ला (Belapur Fort) |
बेळगावचा किल्ला (Belgaum Fort) | भगवंतगड (Bhagwantgad) | भांगसी गड (भांगसाई गड) (Bhangsigad(Bhangsi mata gad)) | भरतगड (Bharatgad) |
भवानगड (Bhavangad) | चाकणचा किल्ला (Chakan Fort) | चापोरा किल्ला (Chapora Fort) | कुलाबा किल्ला (Colaba) |
डफळापूर गढी (Daflapur Fort) | डहाणू किल्ला (Dahanu Fort) | दांडा किल्ला (Danda Fort) | दासगावचा किल्ला (Dasgaon Fort) |
दौलतमंगळ (Daulatmangal) | देवगडचा किल्ला (Devgad Fort) | धामणगाव गढी (Dhamangaon Gadhi) | धारावी किल्ला (Dharavi Fort) |
धर्मापूरी (Dharmapuri) | धारूर (Dharur) | धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi)) | डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera)) |
दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort) | डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort)) | फर्दापूर सराई (Fardapur Sarai) | फत्तेगड / फतेदुर्ग (Fattegad) |
गाविलगड (Gavilgad) | गोवा किल्ला (Goa Fort) | हिराकोट (Hirakot) | इंदुरीचा किल्ला (गढी) (Induri Fort (Gadhi)) |
जयगड (Jaigad) | जामगावचा किल्ला (Jamgaon Fort) | जंजिरा (Janjira) | काकती किल्ला (Kakati Fort) |
काळाकिल्ला (Kala Killa) | कांबे कोट (Kambe Kot) | कंधार (Kandhar) | करमाळा (Karmala Fort) |
केळवे किल्ला (Kelve Fort) | खारबाव कोट (Kharbao kot) | खर्डा (Kharda) | खारेपाटण (Kharepatan fort) |
खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort)) | कोटकामते (Kotkamate) | लहुगड (Lahugad) | लोंझा (Lonza) |
माचणूर (Machnur) | मढचा किल्ला(वर्सोवा किल्ला) (Madh Fort (Varsova Fort)) | माढा गढी/किल्ला (Madha Fort) | महादेवगड (Mahadevgad) |
माहीमचा किल्ला (Mahim Fort) | माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim)) | मालेगावचा किल्ला (Malegaon Fort) | मांडवी कोट (Mandvi Kot) |
मंगळवेढा (Mangalwedha) | मोहोळ गढी/किल्ला (Mohol Fort) | मोटी दमण किल्ला (Moti Daman Fort) | नगरचा किल्ला (Nagar Fort) |
नगरधन (Nagardhan) | नागलाबंदर किल्ला (Nagla bunder Fort) | नळदुर्ग (Naldurg) | नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri)) |
नांदरुखी कोट (Nandrukhi Kot) | नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) (Nani Daman Fort (St.Jerome Fort)) | नारायणगड (आंबोली) (Narayangad(Amboli)) | नरनाळा (Narnala) |
नस्तनपूरची गढी (Nastanpur) | निवतीचा किल्ला (Nivati Fort) | पाचाड कोट (Pachad Fort) | पाच्छापूर किल्ला (Pachhapur Fort) |
पालचा किल्ला (Pal Fort) | पळशीचा किल्ला (Palashi Fort) | पालगड (Palgad) | पन्हाळगड (Panhalgad) |
परांडा (Paranda) | पारडी किल्ला (Pardi Fort) | पारोळा (Parola) | पिलीवचा किल्ला (Piliv Fort) |
पिंपळास कोट (Pimplas Kot) | प्रतापगड (Pratapgad) | पूर्णगड (Purnagad) | ऱाजापूरची वखार (Rajapur Fort (British warehouse)) |
राजहंसगड (येळ्ळूरचा किल्ला) (Rajhansgad (Yellur Fort)) | राजकोट (Rajkot) | रामदुर्ग (Ramdurg) | रसलपूरचा किल्ला (सराई) (Rasalpur Sarai (Fort)) |
रेवदंडा (Revdanda) | रिवा किल्ला (Riwa Fort) | सामराजगड (Samrajgad) | सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug)) |
सर्जेकोट (मालवण) (Sarjekot(Malvan)) | साटवलीचा किल्ला (Satavali Fort) | शिवडीचा किल्ला (Sewri Fort) | शिरगावचा किल्ला (Shirgaon) |
शिवथरघळ (Shivtharghal) | सिंधुदुर्ग (Sindhudurg) | सिंदखेडराजा (Sindkhed Raja) | सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort) |
सिताबर्डी किल्ला (Sitabuldi fort(Sitabardi Fort)) | सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort) | सोनगिरी (नाशिक) (Songir (Nashik)) | सुभानमंगळ (Subhan Mangal) |
सुधागड (Sudhagad) | सुलतान गढी (Sulatan Gadhi) | तारापुर किल्ला (Tarapur Fort) | तेरेखोलचा किल्ला (Terekhol Fort) |
उदगीर (Udgir) | वज्रगड(वसई) (Vajragad (Vasai)) | वसई (Vasai) | वेहेळे कोट (Vehele Kot) |
विजयदुर्ग (Vijaydurg) | वरळीचा किल्ला (Worli Fort) | यशवंतगड (रेडीचा किल्ला) (Yashawantgad (Redi Fort)) | यशवंतगड(नाटे) (Yashwantgad(Nate)) |
यावल (निंबाळकर किल्ला) (Yawal Fort (Nimbalkar Fort)) |