|  पालचा किल्ला  
                                       (Pal Fort)     | 
 	  किल्ल्याची ऊंची : 
	  	  1302 | 
	
    
		| किल्ल्याचा प्रकार  : गिरीदुर्ग
		 | 
		डोंगररांग: पाल - यावल, सातपुडा | 
	
	
				
				| जिल्हा : जळगाव | 
		श्रेणी : सोपी | 
		
	
		
			पाल हे खानदेशातील थंड हवेचे ठिकाण आहे . येथे वनविभागाचे विश्रांतीगृह आहे . हे विश्रांतीगृह पाल किल्ल्यात आहे. सातपुडा पर्वत रांगेतून जाणाऱ्या घाटमार्गावर (व्यापारी मार्गावर) लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली होती . पाल, यावल, रसलपुर सराई हे किल्ले एका दिवसात पाहाता येतात.
 
  | 
		
	
	
	
        | 
        
         | 
		
	
								
	
	
	| पहाण्याची ठिकाणे : | 
			
	
		
पाल किल्ल्याचे प्रवेशद्वार अजूनही भक्कम स्थितीत उभे आहे . वनविभागाने त्याची रंगरंगोटी केलेली आहे .  या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर वनविभागाचे विश्रांतीगृह आहे . या विश्रांतीगृहाच्या मागे पाल किल्ल्याचे बुरूज कसेबसे तग धरुन उभे आहेत. किल्ल्याचे बाकीचे अवशेष नष्ट झाले आहेत.
  | 
	
	
		| पोहोचण्याच्या वाटा : | 
	
	
		पाल जवळचे सर्वात मोठे गाव आणि रेल्वे स्टेशन भुसावळ येथे आहे . भुसावळ - यावल अंतर ४९ किलोमीटर आहे. 
  | 
	
		| राहाण्याची सोय : | 
		वन विश्रामगृहात राहाण्याची व्यवस्था आहे पण त्याचे बुकींग आधी करावे लागते .
  | 
	
		
| जेवणाची सोय : | 
		वन विश्रामगृहात जेवणासाठी सोय होते .
  | 
	
		
| पाण्याची सोय : | 
		वन विश्रामगृहात पिण्याचे पाणी आहे  .
  | 
	
		
| जाण्यासाठी उत्तम कालावधी : | 
		| वर्षभर |