मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

पूर्णगड (Purnagad) किल्ल्याची ऊंची :  160
किल्ल्याचा प्रकार : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : रत्नागिरी श्रेणी : सोपी
रत्नागिरी जिल्ह्यात खाड्यातून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी , त्याचे संरक्षण करण्यासाठी मध्ययुगात किल्ले बांधण्यात आले. मुचकुंदी नदीच्या उत्तर काठावर असलेल्या टेकडीवर पूर्णगड किल्ला बांधण्यात आला किल्ल्याचा आकार पाहाता हा किल्ला टेहळणीसाठी बांधण्यात आला होता.

रत्नागिरीहून एका दिवसात पूर्णगड , यशवंतगड (नाटे) आणि आंबोळगड हे किल्ले पाहाता येतात. सर्व किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे .
19 Photos available for this fort
Purnagad
पहाण्याची ठिकाणे :
पुर्णगड गावातून पायर्‍यांच्या मार्गाने १० मिनिटात आपण किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दारा समोर हनुमंताचे मंदिर आहे. प्रवेशव्दार दोन बुरुजांच्या मध्ये लपवलेले आहे. प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूस देवड्या आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर किल्ल्याचा छोटासा आवाका ध्यानात येतो. प्रवेशव्दाराच्या आतल्या बाजूला दग्डावर कमळ फुल कोरलेली आहेत. समोरच एक मोठा चौथरा असून त्याच्या मागे किल्ल्याचा समुद्राच्या बाजूचा दरवाजा आहे. उजव्या बाजूला वाड्याचे अवशेष असून डाव्या बाजूला एक समाधीचे तुळशी वृंदावन आहे .

किल्ल्यात शिरल्यावर उजव्या बाजूला असलेल्या जिन्याने फांजीवर चढून गड प्रदक्षिणेला सुरुवात करावी . एक एक बुरुज ओलांडत आपण समुद्राच्या बाजूला येतो. येथे तटबंदीचा काही भाग ढासळलेला आहे. याठिकाणी फ़ांजी वरुन खाली उतरावे. य्रेथे समुद्राच्या बाजूचे प्रवेशव्दार अजूनही सुस्थितीत आहे. प्रवेशव्दार पाहून परत फांजीवर चढून मुख्य प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. गड पाहाण्यासाठी १५ मिनिटे लागतात.
पोहोचण्याच्या वाटा :
रत्नागिरी ते पूर्णगड अंतर २५ किलोमीटर आहे . एसटी बसने किंवा खाजगी वहानाने पूर्णगड गावात जाता येते. गावातून पाय्र्‍यांच्या वाटेने गडावर पोहोचण्यासाठी १० मिनिटे लागतात.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची व्यवस्था नाही .
जेवणाची सोय :
किल्ल्यावर पाणी नाही .
पाण्याची सोय :
जेवणाची व्यवस्था गावात नाही .
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
जिल्हा Ratnagiri
 आंबोळगड (Ambolgad)  बाणकोट (Bankot)  बारवाई (Barvai)  भवानीगड (Bhavanigad)
 फत्तेगड / फतेदुर्ग (Fattegad)  गोवा किल्ला (Goa Fort)  गोपाळगड (Gopalgad)  गोवळकोट (Gowalkot)
 जयगड (Jaigad)  कनकदुर्ग (Kanakdurg)  कोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi)  महिमतगड (Mahimatgad)
 महिपतगड (Mahipatgad)  मंडणगड (Mandangad)  माणिकदूर्ग (Manikdurg)  पालगड (Palgad)
 पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort)  पूर्णगड (Purnagad)  ऱाजापूरची वखार (Rajapur Fort (British warehouse))  रसाळगड (Rasalgad)
 रत्नदुर्ग ( भगवतीचा किल्ला ) (Ratnadurg)  साटवलीचा किल्ला (Satavali Fort)  सुमारगड (Sumargad)  सूवर्णदूर्ग (Suvarnadurg)
 विजयगड (Vijaygad)  यशवंतगड(नाटे) (Yashwantgad(Nate))