| मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
| रायरेश्वर (Raireshwar) | किल्ल्याची ऊंची :  4000 | ||
| किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: सातारा | ||
| जिल्हा : पुणे | श्रेणी : मध्यम | ||
| शिवरायांनी स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली अशी कथा आहे. मात्र ही घटना काल्पनिक आहे की खरी याबद्दल निश्चित विधान मांडता येणार नाही. रायरेश्वर मंदिर रायरीचे पठारवर आहे. भोरपासून २९ किलोमीटर अंतरावर असणारे हे रायरीचे पठार पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे. रायरेश्वरच्या मंदिरापासून ५ किलोमीटर अंतरावर केंजळगड आहे. खाजगी वाहानाने ही दोन्ही ठिकाणे एका दिवसात पाहून होतात. |
|||
|
|||
| इतिहास : | |||
| शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली ती याच रायरेश्वराच्या डोंगरावर, मात्र ही घटना काल्पनिक आहे की खरी याबद्दल निश्चित विधान मांडता येणार नाही. |
|||
| पहाण्याची ठिकाणे : | |||
| रायरेश्वराचे पठार हे ५ ते ६ किमी पसरलेले आहे. या पठार वर्षाऋतुत भरपूर फ़ुले उगवतात तेंव्हा हे पठार पाहण्यासारखे असते. रायरेश्वरावर शंभुमहादेवाचे मंदिर आहे. मंदिराजवळ गोमुख आहे त्यातून बारमाही पाण्याचा झरा वहात असतो. | |||
| पोहोचण्याच्या वाटा : | |||
| रायरेश्वराला जाण्याचे अनेक मार्ग आहेत कोणत्याही मार्गाने जायचे झाल्यास भोर गावं गाठावे लागते. १) भोर मार्गे :- भोर ते रायरेश्वर अंतर २९ किलोमीटर आहे. रायरेश्वरच्या पायथ्यापर्यंत खाजगी वाहानाने जाता येते. येथून सिमेंटच्या पायर्यांची १५ मिनिटे चढल्यावर शेवटच्या टप्प्यात शिडी लावलेली आहे . ती चढून गेल्यावर आपण रायरेश्वरच्या पठारावर पोहोचतो. पठारावरुन १० मिनिटे चालत गेल्यावर गोमुखी टाक्यापाशी पोहोचतो पुढे ५ मिनिटात रायरेश्वर मंदिराजवळ पोहोचतो. पायथ्यापासून पाऊण तासात आपण रायरेश्वर मंदिरापाशी पोहोचतो. २) केजंळगडावरुन :- केजंळगडावरुन रस्त्याने ५ किलोमीटर अंतरावर रायरेश्वरचा पायथा आहे . येथेपर्यंत खाजगी वाहानाने जाता येते. येथून सिमेंटच्या पायर्यांची १५ मिनिटे चढल्यावर शेवटच्या टप्प्यात शिडी लावलेली आहे . ती चढून गेल्यावर आपण रायरेश्वरच्या पठारावर पोहोचतो. पठारावरुन १० मिनिटे चालत गेल्यावर गोमुखी टाक्यापाशी पोहोचतो पुढे ५ मिनिटात रायरेश्वर मंदिराजवळ पोहोचतो. पायथ्यापासून पाऊण तासात आपण रायरेश्वर मंदिरापाशी पोहोचतो. याशिवाय सूणदर्याने किंवा श्वानदर्याने सुध्दा रायरेश्वरला जाता येते. ३) टिटेधरण कोर्ले बाजूने :- पुण्याहून भोरमार्गे आंबवडे गाठावे. तेथून टिटेधरण कोर्ले बाजूने रायरेश्वरावर जाता येते. साधारणत: ३ तास लागतात. वाट काही ठिकाणी अवघड आहे. ४) भोर - रायरी मार्गे :- भोर गावातून रायरी गावासाठी सकाळी अकरा व सायंकाळी ६ वाजता (मुक्कामाची) गाडी येते. याच वाटेला सांबरदर्याची वाट म्हणून देखील संबोधतात. या वाटेने रायरेश्वर गाठण्यास दोन तास लागतात. | |||
| राहाण्याची सोय : | |||
| रायरेश्वरावर मंदिराच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये १० ते १५ जणांची राहण्याची सोय होऊ शकते. | |||
| जेवणाची सोय : | |||
| जेवणाची सोय आपण स्वत: करावी. | |||
| पाण्याची सोय : | |||
| पिण्याचे पाणी बारामही उपलब्ध आहे. | |||
| जाण्यासाठी लागणारा वेळ : | |||
| पायथ्या पासून पाऊण तास लागतो. | |||
| जाण्यासाठी उत्तम कालावधी : | |||
| सप्टेंबर ते मार्च. | |||
| मुळाक्षरानुसार इतर किल्ले: A | आड (Aad) | आमनेर (Aamner) | अचला (Achala) | अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort) |
| अग्वाडा (Aguada) | अहिवंत (Ahivant) | अजिंक्यतारा (Ajinkyatara) | अजिंठा (Ajintha Fort) |
| अजिंठा सराई (Ajintha Sarai) | अजमेरा (Ajmera) | आजोबा (आजा पर्वत) (Ajoba) | अकलूजचा किल्ला (Akluj Fort) |
| अकोला किल्ला (असदगड) (Akola Fort (Asadgad Fort)) | अलंग (Alang) | अंमळनेर (Amalner) | अंबागड (Ambagad) |
| आंबोळगड (Ambolgad) | अमरावतीचा किल्ला (Amravati Fort) | अनंतपूर किल्ला (Anantapura Fort) | अणघई (Anghai) |
| अंजनेरी (Anjaneri) | अंकाई(अणकाई) (Ankai) | अंतुर (Antoor) | अर्जूनगड (Arjungad) |
| अर्नाळा (Arnala) | आसावा (Asawa) | अशेरीगड (Asherigad) | औंढा (अवंध) (Aundha) |
| औसा (Ausa) | अवचितगड (Avchitgad) | आवाडे कोट (Awade Kot) | |