| रसलपूरचा किल्ला (सराई)
(Rasalpur Sarai (Fort)) |
किल्ल्याची ऊंची : 
0 |
| किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले
|
डोंगररांग: डोंगररांग नाही |
| जिल्हा : जळगाव |
श्रेणी : सोपी |
रसलपूर सराई उर्फ़ रसलपूरचा किल्ला हा रावेर पासून ३ किलोमीटर व बुर्हाणपूर पासून २५ किलोमीटरवर आहे. मुघल काळात अशाप्रकारे बांधलेल्या सराई औरंगाबाद जिल्ह्यातही पाहायला मिळतात. पाल, यावल, रसलपुर सराई हे किल्ले एका दिवसात पाहाता येतात.
|
|
|
| पहाण्याची ठिकाणे : |
रसलपूर सराईला ४ बुरुज आणि २ दोन दरवाजे आहेत. बुरुजांमधील तटबंदी शाबूत आहे. सराईत दाट वस्ती असल्याने इतर ऐतिहासिक अवशेष काळाच्या ओघात नष्ट झालेले आहेत.
|
| पोहोचण्याच्या वाटा : |
रावेर हे मोठे गाव रसलपूर पासून ३ किलोमीटर अंतरावर आहे. रावेरहुन एसटीने आणि रिक्षाने रसलपूरला जाता येते.
|
| राहाण्याची सोय : |
किल्ल्यावर राहाण्याची व्यवस्था नाही .
|
| जेवणाची सोय : |
रावेर गावात जेवणासाठी हॉटेल्स आहेत .
|
| पाण्याची सोय : |
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही .
|
| जाण्यासाठी उत्तम कालावधी : |
| वर्षभर |