मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

सोंडाई (Sondai) किल्ल्याची ऊंची :  1200
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: माथेरान
जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम
मुंबई - पुणे मार्गावरील कर्जत हे अनेक भटक्यांचे (ट्रेकर्सचे) आवडते गाव आहे. या गावाच्या आजूबाजूच्या असलेल्या राजमाची, पेठ, सोनगिर, पेब, भिवगड, ढाक आणि भिमाशंकर या किल्ल्यांवर भटकून अनेक जणांनी आपल्या भटकंतीची सुरवात केलेली आहे. याच कर्जतच्या जवळ "सोंडाई" नावाचा एक छोटा अपरीचित किल्ला आहे. या किल्ल्याचा विस्तार पहाता याचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा.
15 Photos available for this fort
Sondai
Sondai
Sondai
पहाण्याची ठिकाणे :
सोंडेवाडी व वावर्ले ही दोन किल्ल्याच्या पायथ्याची गाव आहेत. सोंडेवाडी गाव किल्ल्याच्या पाव (१/४) उंचीवर वसलेल आहे. या गावातून मळलेली वाट किल्ल्यावर जाते. या वाटेने १५ मिनिटात आपण एका पठारावर पोहोचतो. या ठिकाणी वावर्ले गावातून येणारी वाट येऊन मिळते. येथून गडमाथ्यावर दोन झेंडे लावलेले दिसतात.(त्यापैकी कातळकड्याच्या टोकाला लावलेल्या झेंड्याच्या खाली गडमाथ्यावर जाण्यासाठी शिडी आहे हि गोष्ट ध्यानात ठेवावी.) पुढे वाटेत कातळात खोदलेल्या काही पायर्‍या लागतात. किल्ल्याचा डोंगर प्रथंम उजव्या बाजूला व नंतर डाव्या बाजूला ठेवत आपण डोंगरसोंडे वरून दुसर्‍या पठारावर पोहोचतो. या ठिकाणी पोहोचण्यासाठी सोंडेवाडीतून पाऊण तास लागतो. येथे कातळात खोदलेली दोन पाण्याची जोडटाकं आहेत. या टाक्यांत १२ महीने पाणी असते. उन्हाळ्यात मात्र टाक्यातील पाणी काढण्यासाठी दोरी लागते. या ठिकाणाहून सोंडाईच्या शेजारील गव्हारी/ गवारी नावाचा सोंडाई पेक्षा उंच डोंगर दिसतो. या डोंगरावर मुख्य डोंगरापासून वेगळा उभा असलेला खडक आपले लक्ष वेधून घेतो.

पठाराच्या वरच्या बाजूस कातळात खोदलेल्या पायर्‍या आहेत. त्या चढून गेल्यावर डाव्या बाजूस एक सुकलेल टाक आहे, तर उजव्या बाजूला गड माथ्यावर जाण्यासाठी लोखंडी शिडी आहे. येथून पुढचा टप्पा चढतांना आपली पादत्राणे काढून वर जावे लागते. (गडावर सोंडाई देवीचे स्थान असल्यामूळे हा गावकर्‍यांच्या श्रध्देचा भाग आहे आणि आपण याचा मान ठेवावा.) या ठिकाणी कातळटप्पा चढण्यासाठी कातळात व्यवस्थित खोबणी बनवलेल्या आहेत. त्यांचा वापर करून किंवा शिडीने हा १५ फूटी कातळकडा सहज चढता येतो. कातळकडा चढून वर आल्यावर उजव्या बाजूस २ पाण्याची टाकी आहेत. त्यातील पहिल टाक मोठ असून त्यात २ दगडी खांब कोरलेले आहेत. या खांबटाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. दुसर टाक लहान आहे. गडमाथा छोटासा आहे. येथे एका झाडाखाली दोन दगडात कोरलेल्या मुर्ती ठेवलेल्या आहेत. त्यापैकी एक मुर्ती सोंडाई देवीची आहे. गडमाथ्यावरून माथेरानचा डोंगर, मोरबे धरण, वावर्ले धरण व आजूबाजूचा विस्तिर्ण परिसर दिसतो.
पोहोचण्याच्या वाटा :
सोंडाई किल्ल्यावर जाण्यासाठी २ वाटा आहेत.
१) सोंडेवाडी मार्गे :- कर्जत रेल्वे स्थानकावर उतरून कल्याणच्या दिशेने जाऊन पूर्वेला बाहेर पडावे. येथून रिक्षाने ९ किमी वरील सोंडेवाडीला जाता येते. (रिक्षाने सोंडेवाडीस जाण्यासाठी 3००/- रुपये लागतात.) किंवा कर्जत -चौक मार्गावर धावणार्‍या सहा आसनी रिक्षा, एसटीने ६ किमीवरील बोरगाव फाट्यावर उतरावे. येथून मोरबे धरणाच्या जलाशयाच्या बाजूने जाणार्‍या रस्त्याने ४ किमी वरील सोंडेवाडी पर्यंत चालत जावे. सोंडेवाडीतून गडावर जाण्यासाठीच्या रस्त्याचे वर्णन वर दिल्या प्रमाणे आहे. सोंडेवाडीतून गडावर जाण्यास १ ते १.५ तास लागतो.

२) वावर्ले मार्गे :- कर्जत रेल्वे स्थानकावर उतरून कल्याणच्या दिशेने जाऊन पूर्वेला बाहेर पडावे. येथून रिक्षाने ४ किमी वरील वावर्ले गावाच्या फाट्या पर्यंत जाण्यासाठी कर्जत -चौक मार्गावर धावणार्‍या सहा आसनी रिक्षा, एसटी आहेत. फाट्यावर असलेल्या कमानी खालून जाणारा रस्ता गावातून, गावामागील वावर्ले धरणापर्यंत जातो. येथे पोहोचण्यास अर्धा तास लागतो. धरणा जवळून समोर सोंडाई किल्ला दिसतो. धरणाच्या भिंतीच्या उजव्या बाजूने जाणारी पायवाट टेकडी वरील वावर्ले ठाकरवाडीत जाते. ठाकरवाडी ओलांडून टेकडी उतरल्यावर एक छोटा ओढा पार करावा लागतो. ओढ्याच्या पुढे सोंडाई किल्ल्याच्या चढाला सुरुवात होते. साधारणत: १५ मिनिटात आपण पठारावर पोहोचतो. येथे सोंडेवाडीतून गडावर जाणारी वाट येऊन मिळते. पुढे गडावर जाण्यासाठीच्या रस्त्याचे वर्णन वर दिल्या प्रमाणे आहे.
या वाटेने नोव्हेबर - डिसेंबर नंतर गडावर जातांना वावर्ले धरणापासून ठाकरवाडीची टेकडी न चढता धरणाच्या जलाशयाच्या मागे असलेल्या ओढ्यातून चालत जावे. त्यामूळे टेकडी चढण्या - उतरण्याचा वेळ वाचतो. वावर्ले गावातून गडावर जाण्यास २ ते ३ तास लागतात.
वावर्ले गावातून जाणारी वाट ही सोंडेवाडीतून गडावर येणार्‍या वाटेपेक्षा कठीण व वेळ खाणारी आहे.

स्वत:च्या वहानाने येणार्‍यांनी मुंबई - पनवेल मार्गे चौक गाठावे. चौक - कर्जत मार्गावर बोरगाव फाटा चौक पासून ६ किमी अंतरावर तर वावर्ले फाटा ८ किमी अंतरावर आहे.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही, पण वावर्ले ठाकरवाडीतील व सोंडेवाडीतील शाळेत रहाण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही, पण कर्जत गावात जेवणाची सोय होऊ शकेल.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
सोंडेवाडीतून गडावर जाण्यास १ तास लागतो. वावर्ले गावातून गडावर जाण्यास २ ते ३ तास लागतात.
सूचना :
१)उन्हाळ्यात टाक्यातील पाणी काढण्यासाठी दोर सोवत बाळगावा.
३) गडावर चढतांना सोंडेवाडीतून चढावे, तर उतरतांना वावर्ले मार्गे उतरावे. कारण गडावरून वावर्ले गाव व आजूबाजूचा परीसर दिसतो, त्यामूळे वाटेचा अंदाज येतो व वाट चुकण्याची शक्यता कमी होते.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: A
 आड (Aad)  आमनेर (Aamner)  अचला (Achala)  अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort)
 अग्वाडा (Aguada)  अहिवंत (Ahivant)  अजिंक्यतारा (Ajinkyatara)  अजिंठा (Ajintha Fort)
 अजिंठा सराई (Ajintha Sarai)  अजमेरा (Ajmera)  आजोबा (आजा पर्वत) (Ajoba)  अकलूजचा किल्ला (Akluj Fort)
 अकोला किल्ला (असदगड) (Akola Fort (Asadgad Fort))  अलंग (Alang)  अंमळनेर (Amalner)  अंबागड (Ambagad)
 आंबोळगड (Ambolgad)  अमरावतीचा किल्ला (Amravati Fort)  अनंतपूर किल्ला (Anantapura Fort)  अणघई (Anghai)
 अंजनेरी (Anjaneri)  अंकाई(अणकाई) (Ankai)  अंतुर (Antoor)  अर्जूनगड (Arjungad)
 अर्नाळा (Arnala)  आसावा (Asawa)  अशेरीगड (Asherigad)  औंढा (अवंध) (Aundha)
 औसा (Ausa)  अवचितगड (Avchitgad)  आवाडे कोट (Awade Kot)