मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

इंद्रगड (Indragad) किल्ल्याची ऊंची :  1000
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : वलसाड (गुजरात) श्रेणी : मध्यम
गुजरात आणि दमणच्या सीमेवर इंद्रगड किल्ला आहे. दमणगंगा नदीव्दारे होणार्‍या व्यापारावर लक्ष ठेवण्ण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती.
14 Photos available for this fort
Indragad
पहाण्याची ठिकाणे :
गडाच्या डोंगरावर भरपूर झाडे असल्याने गड चढतांना उन्हाचा त्रास होत नाही. गडाच्या तटबंदीला लागून चेडू मातेचे मंदिर बांधलेले आहे. त्यात एक साधू राहातो. या गडाचे प्रवेशव्दार एका अर्धवर्तुळाकार भिंतीमागे लपवलेले आहे. प्रवेशव्दारावर थेट हल्ला करता येऊ नये यासाठी अशाप्रकारे भिंतीची रचना केलेली आहे. या भिंतीत जंग्या आहेत. किल्ल्याचे प्रवेशव्दार शाबूत आहे. पूर्वाभिमुख प्रवेशव्दारातून आपला किल्ल्यात प्रवेश होतो. प्रवेशव्दाराच्या आत पाहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. किल्ल्याच्या आत अनेक इमारतींचे अवशेष आहेत. तटबंदीत आणि बुरुजा खाली खोल्या आहेत. एक पाण्याची टाकी आहे. किल्ल्याच्या उत्तरेला एक दरवाजा आहे. या प्रवेशव्दारासमोर सुध्दा संरक्षणासाठी भिंत बांधलेली आहे. किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज बर्‍यापैकी सुस्थितीत आहेत. त्यावरुन किल्ल्याला प्रदिक्षिणा मारता येते. किल्ल्यावरुन दरोथा आणि दमणगंगा या नद्यांची खोरी दिसतात. या परिसरातला हा सर्वात उंच डोंगर असल्याने खूप मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो.
पोहोचण्याच्या वाटा :
इंद्रगडच्या पायथ्याचे पाली करंबेली गावाचे ते वापी अंतर ११ किलोमीटर आहे. या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर आहे. मंदिरा पासून एक कच्चा रस्ता इंद्रगडावर जातो. या रस्त्याने इंद्रगडावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो. दमणहून इंद्रगडच्या पायथ्याचे पाली करंबेली गाव ६ किलोमीटर अंतरावर आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पायथ्यापासून अर्धा तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जुलै ते मार्च

Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...