मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

काकती किल्ला (Kakati Fort) किल्ल्याची ऊंची :  2600
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : बेळगाव श्रेणी : सोपी
बेळगाव या महत्वाच्या शहरावर आणि शहराकडे जाणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी काकती किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती . कित्तुर राणी चेनम्मा यांचे माहेर काकती, कोल्हापूर दिशेला बेळगावपासून ११ किमी अंतरावर आहे त्या ठिकाणी मध्यम उंचीच्या डोंगरावर एक छोटेखानी किल्ला आहे.
4 Photos available for this fort
Kakati Fort
पहाण्याची ठिकाणे :
हा टेहळणीचा किल्ला असल्याने यावर फारसे बांधकाम नसावे . आज या किल्ल्याचा एकमेव बुरुज आणि त्याला लागून असलेली थोडीफार तटबंदी शिल्लक आहे . या बुरुजापर्यंत जाण्यासाठी सिमेंटमध्ये २५१ पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत . किल्ल्यावर वनखात्याने मोठ्याप्रमाणावर वृक्षारोपण केलेले आहे . पाणी अडवण्यासाठी जागोजागी चरही खोदलेले आहेत . त्यामुळे किल्ल्यावर फिरणे मुश्किल झालेले आहे . त्यामुळे किल्ल्यावर इतर काही अवशेष आढळत नाहीत. किल्ल्यावरुन बेळगाव शहर दिसते .
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई बंगलोर महामार्गावर बेळगावच्या अलीकडे ११ किलोमीटर अंतरावर काकती गाव आहे . गावाच्या मागे किल्ला आहे . या किल्ल्याच्या पायऱ्यांपर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही
जेवणाची सोय :
किल्ल्यावर किंवा गावात जेवणाची सोय नाही .
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पाण्याची सोय नाही
जाण्यासाठी लागणारा वेळ :
गडमाथ्यावर जाण्यासाठी पायथ्यापासून १० मिनिटे लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर

Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...