मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

पारडी किल्ला (Pardi Fort) किल्ल्याची ऊंची :  200
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा :  श्रेणी : सोपी
पारडी गावातील भरवस्तीत पोस्ट ऑफ़ीसच्या इमारती मागे एका छोट्या टेकडा वरती पारडी किल्ला आहे. या टेकडीच्या खालून वहाणार्‍या पार नदीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली असावी. किल्ल्या जवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा बसवलेला होता.

पारडी किल्ला ते पारनेरा किल्ला अंतर ७ किलोमीटर आहे . पारडी किल्ला ते अर्जूनगड किल्ला अंतर १२ किलोमीटर आहे
7 Photos available for this fort
Pardi Fort
पहाण्याची ठिकाणे :
पारडी किल्ल्यात काळानुरुप अनेक बदल झाले आहेत. किल्ल्यात शिरताना प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला भव्य अष्टकोनी बुरुज आहे. किल्ल्याचे प्रवेशव्दार नव्याने बांधलेले आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर बुरुज पाहून पायर्‍या चढून गेल्यावर डाव्या बाजूला पीर आहे. अजून थोड्या पायर्‍या चढल्यावर डाव्या बाजूला कैद्यांसाठी असलेल्या बॅरॅक्स दिसतात. इंग्रजांच्या काळात किल्ल्याचे रुपांतर जेल मध्ये झाले होते. तर उजव्या बाजूला उध्वस्त वास्तू आहेत. हे पाहून पुढे गेल्यावर किल्ल्यावर असलेल्या पाण्यांच्या टाक्यांपाशी पोहोचतो. पारडी गावाला पाणी पुरवण्यासाठी ह्या टाक्या बांधलेल्या आहेत. हा किल्ल्याचा सर्वोच्च भाग आहे. किल्ला पाहायला १५ मिनिटे लागतात.
पोहोचण्याच्या वाटा :
वापी - सुरत रेल्वेमार्गावर पारडी नावचे स्टेशन आहे. वापीहुन पॅसेंजर ट्रेनने पारडीला जाता येते. पारडी स्थानकातून पारडी किल्ला अंतर ३ किलोमीटर आहे. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत रिक्षाने किंवा चालत जाता येते. रस्त्याने गेल्यास मुंबई - अहमदाबाद महामार्गावर वापी पासून १८ किलोमीटरवर पारडी किल्ला आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पायथ्यापासून ५ मिनिटे लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जुलै ते मार्च

Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...