मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

पेमगिरी(शहागड) (Pemgiri(Shahagad)) किल्ल्याची ऊंची :  2772
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: बाळेश्वर रांग
जिल्हा : नगर श्रेणी : मध्यम
पेमगिरी उर्फ शहागड उर्फ़ भीमगड हा नगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात येणारा किल्ला आडबाजूला असल्यामुळे फारसा परिचित नाही. पण मराठ्यांच्या इतिहासातला एक महत्वाचा प्रसंग या किल्ल्यावर घडला होता.आज वनखात्याने किल्ल्याचे सुशोभिकरण केले आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी गाडी मार्ग तसेच पायी जाणार्‍यांसाठी शिड्या बसवलेल्या आहेत.

किल्ल्यापासुन २.५ किमीवर असलेला प्राचिन अवाढव्य वटवृक्षही पाहाण्यासारखा आहे.
6 Photos available for this fort
Pemgiri(Shahagad)
Pemgiri(Shahagad)
Pemgiri(Shahagad)
इतिहास :
इ.स. 1632 च्या अखेरीस मोगल सरदार महाबतखानाने निजामाची राजधानी असलेल्या दौलताबाद किल्ल्याला वेढा घातला आणि जिंकुन घेतला. त्याने खुद्द हुसेन निजामशहा आणि त्याचा वजिर फत्तेखान याना तुरुंगात टाकल. निजामशाहीची अखेर झाली.

त्यावेळी शहाजी राजे निजामाकडे सरदार होते. त्यानी पेमगिरी किल्ल्यावर अटकेत असलेल्या निजामाच्या अल्पवयीन मुलाला मुर्तिजा निजामशहाला सोडवल आणि त्याला गादीवर बसवुन शहाजी राजानी स्वत:ला निजामाचा वकील जाहीर करुन राज्य चालवायला सुरुवात केली. मोगल आणि आदिलशहाच्या संयुक्त सैनाशी शहाजी राजानी 6 मे 1636 रोजी तह केल्यावर निजामशाहीची अखेर झाली.
पहाण्याची ठिकाणे :
बाळेश्वर या मुख्य डोंगररांगेपासून वेगळ्या झालेल्या डोंगरावर पेमगिरी हा पुरातन किल्ला वसलेला आहे. वनखात्याने किल्ल्यावर जाण्यासाठी गाडी मार्ग बांधल्यामुळे खाजगी वाहानाने थेट किल्ल्यावर जाता येत. किल्ल्यावर पेमादेवीची दोन मंदिर आहेत. जुन्या छोट्या मंदिरा समोर ४ सातवहान कालिन टाकी आहेत. त्यात मधली दोन खांबटाकी आहेत. टाकी पाहुन डाव्या बाजुंने पुढे गेल्यावर खालच्या बाजुस एक लांबलचक टाक आहे त्याला "बाळंतीणीच टाक" म्हणतात. ते टाक पाहुन किल्ल्याच्या दक्षिण टोकापर्यंत जाता येते. या ठिकाणी कुठलेही अवशेष नाहीत. पण किल्ल्याच नैसर्गिक संरक्षण करणारी किल्ल्या मागची बाळेश्वर डोंगररांग इथुन पाहायला मिळते. टोकावरुन परत फिरुन किल्ल्यावर नविन बांधलेल्या पेमादेवी मंदिराकडे जाताना डाव्या बाजुला दोन कोरडी टाक आहेत. पेमादेवी मंदिरात देवीची नविन मुर्ती बसवलेली आहे. या मंदिराचा कळस दुरवरुनही सहज दृष्टीस पडतो. देवीच दर्शन घेउन किल्ल्याच्या उत्तरेला असलेल्या टेहळणी बुरुजाकडे जावे. येथे बुरुज आज अस्तित्वात नाही पण येथुन दुरवरचा परीसर दृष्टीस पडतो. याठिकाणी वनखात्याने लोखंडी शिडी बसवलेली आहे. पायथ्या पासून चालत आल्यास या मार्गानेच आपला प्रवेश होतो. टेहळणी बुरुज पाहुन झाल्यावर आपली गड फेरी पूर्ण होते. गडावर वनखात्याने सुशोभित करायला सुरुवात केलेली आहे. रस्ता बनवण्यात आला आहे त्यातही गडाचे बुरुज आणि तटबंदीचे अवशेष दिसतात.
पेमगिरी गावात किल्ल्यापासुन २.५ किमीवर एक प्राचिन वडाचे झाड आहे. या झाडाने एक एकरहुन अधिक परीसरात व्यापलेला आहे. ग्रामस्थानी हा परीसर सुशोभित आणि स्वच्छ ठेवलेला आहे. मुळ वट वृक्षाखाली काही वीरगळी आहेत. त्यावर खंडोबा आणि त्याच्या दोन पत्नींच शिल्प कोरलेल आहे. पेमगिरीच्या भेटीत हा वटवृक्ष आवर्जुन पाहावा असाच आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
पेमगिरी किल्ला नगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात आहे. मुंबईहुन मुंबई - कल्याण - मुरबाड - माळशेज घाट मार्गे ओतुर गाठावे (अंतर १५९ किमी). ओतुर एसटी स्टॅंडच्या बाजूने एक रस्ता बामणवाडा मार्गे - कोतुळ गावात जातो. कोतुळ गावातून संगमनेरला जाणार्‍या रस्त्यावर सावरकोळ - निमगाव मार्गे (अंतर २० किमी ) थेट पेमगिरी किल्ल्यावर जाता येते.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावरील मंदिरा समोरील शेड मधे १० जणांची राहाण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय स्वत: करावी.
पाण्याची सोय :
किल्ल्यावरील टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ :
पायथ्यापासुन चालत जाण्यास पाउण तास लागतो.

Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...